जलद वाचनाची कला

पुनश्च    रा. वा. उपळेकर    2018-05-23 06:00:40   

अंक- मनोहर;  वर्ष-जून १९६६ वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वाचनाचे आपल्याशी असलेले नाते बदलत असते. आधी ती गरज असते आणि पुढे ती आवडही बनते. परंतु वाचन ही कलासुध्दा असते याचा आपण कधी विचार करत नाही आणि म्हणूनच  'वाचावे कसे?' या प्रश्नाशीही आपण सहसा कधी अडखळत नाही.  प्रत्यक्षात आपल्यापैकी अनेकांमध्ये ही कला असते आणि ज्यांच्यात ती नाही त्यांना ती साध्य करता येते. वाचन ही कला आहे ती कशी, आणि ती साध्य करावी कशी, याचे रसाळ वर्णन करणारा तब्बल ५२ वर्षांपूर्वी प्रसिध्द झालेला हा प्रवाही लेख- ******** दैनिके, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके, निबंध, प्रबंध!  अनेकविध विषयांवरील, निरनिराळ्या भाषांतील छापलेल्या मजकुरांचे अक्षरश: खच पडतात रोज. हे सगळे ज्ञानभांडार कशासाठी निर्माण केले जात आहे, असे विचार माझ्या मनात येऊ लागतात आणि लगेच मला ह्युएन्त्संग या चिनी प्रवाशाने सांगितलेली जुनी गोष्ट आठवते. स्वत:ला अतिशय ज्ञानी समजणारा एक माणूस नेहमी आपल्या सर्व शरीराला तांब्याच्या पट्ट्या गुंडाळून आणि हातात एक ज्वलंत मशाल घेऊन लोकात फिरत असे. त्याला याबद्दल विचारले असता तो म्हणाला, ‘‘माझे ज्ञान आता इतके वाढले आहे की ते कोणत्या क्षणी शरीराच्या बाहेर येईल हे सांगता येत नाही - आणि म्हणूनच मी सर्व शरीराला तांब्याच्या पट्ट्या गुंडाळल्या आहेत. हातातल्या मशालीबद्दल म्हणाल तर तो ज्वलंत ज्ञानदीप असून त्याच्या सहाय्याने मी तुमच्या अज्ञानांधकाराचा नाश करण्यासाठी फिरत आहे.’’ ही गोष्ट आठवून मला स्वत:ला तर फार हसू येते. स्वत:ला अतिज्ञानी म्हणवणार्‍या त्या माणसाची कीव वाटते. कारण माझ्या मते ज्ञान हे विश्वाएवढे अफाट आहे आणि विश्वाला जसा अंत नाही, तसाच ज्ञानालाही नाही. आज सगळीक

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मनोहर , रा. वा. उपळेकर
चिंतन

प्रतिक्रिया

  1. Sanjay Bhat

      3 वर्षांपूर्वी

    छान माहिती

  2. Mukund Deshpande

      3 वर्षांपूर्वी

    उपयुक्त विषय, मार्गदर्शक लेख, छान

  3. Savita Upadhye

      3 वर्षांपूर्वी

    जलद वाचन कसे करावे छान मार्गदर्शन आहे.वाचन करतांना खुप उपयोग होईल.

  4. Renkoji Dahe

      3 वर्षांपूर्वी

    विषय समजून घ्यायचा की नुसतीच नजर टाकायची, यावर वाचनाची गती अवलंबून असते..सगळे वाङ् मयप्रकार एकाच मोजपट्टीने नाही मोजता येणार..खूप छान, उद् बोधक लेख..✍👌👌

  5. Swapna Patwardhan

      3 वर्षांपूर्वी

    जलद वाचन कसे करावे ह्या साठी अत्यंत उपयोगी

  6. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    खूपच छान मार्गदर्शन केले आहे . आवश्यक काय आनावश्यक काय समजले . लेख आवडला आता हे आपल्या ऊँपवर वाचावे लागते . अक्षरांचा फॉन्ट कमी जास्त करण्याची आपण सोय करावी अशी आपणास विनंती . स्किन रोटेड करण्याची सोय असावी ही विनंती . लेख वाचताना अक्षरे खूप लहान दिसतात . ( मला दृष्टीचा प्रॉब्लेम नाही पण हा फरक जाणवतो ) दिवसात मोबाईलवर चार पाच लेख वाचायचे म्हटले म्हणजे त्रासदायक काम होऊन बसते . असो .

  7. Sanjay Pulate

      3 वर्षांपूर्वी

    एका उपयुक्त विषयावर आभ्यासपूर्ण आणि आभ्यासपूर्वक अशी माहिती दिल्याबद्दल लेखकांचे व आयोजकांचे आभार.....

  8. Roshan Ramesh Khurge

      4 वर्षांपूर्वी

    Shaleya abaskramat vidhyarti mitransathi kay technical wapravi

  9. [email protected]

      4 वर्षांपूर्वी

    खूपच छान मार्गदर्शन केले आहे

  10. mhaskarmv

      4 वर्षांपूर्वी

    लेख फारच छान आणि त्यावर अजित पाटणकर यांचा अभिप्राय ही छान

  11. prashasnt

      6 वर्षांपूर्वी

    *SUPERB ARTICLE*

  12. sureshjohari

      6 वर्षांपूर्वी

    अतिशय सुंदर आणि उद्बोधक . धन्यवाद

  13. nishab

      6 वर्षांपूर्वी

    अत्यंत उपयुक्त आणि जलद वाचन कला आत्मसाद करताना योग्य दिशादर्शक.....

  14. ajitpatankar

      6 वर्षांपूर्वी

    लेख उत्तम आहे. एक महत्वाचा विषय मांडल्याबद्दल आपले अभिनंदन.... मी फक्त ललित साहित्याविषयी लिहितोय हे कृपया लक्षात घ्यावे... मी वयाच्या दहाव्या वर्षापासून आजपर्यंत वाचतोच आहे.. कुठच्याही क्षणी माझ्या घरी मराठी-इंग्रजी मिळून, शंभर-दीडशे पुस्तके तरी असतातच. त्यामुळे जलद वाचनाबाबत माझा अनुभव सांगण्याचा हा प्रयत्न. मी स्वत: मराठी पुस्तके मिनिटाला सातशे ते आठशे शब्द या गतीने वाचतो.. सोप्या भाषेत सांगायचे तर शंभर पानांचे पुस्तक साधारण ४०-४५ मिनिटात वाचून होते... इंग्रजी पुस्तक वाचायला थोडा अधिक वेळ लागतो... जलद वाचन ही एक कला आहे.. आणि त्यासाठी नियमितपणे वाचन करणे हा एकच उपाय आहे.. वरील लेखात एक उल्लेख आहे... “पहिली ओळ संपली की दृष्टी दुसऱ्या ओळीच्या सुरुवातीला आणण्यासाठी मागे घेतली पाहिजे. यावेळी दृष्टी दोन छापील ओळींच्या मधील ‘पांढऱ्या’ जागेवरून मागे येणे आवश्यक असते. यासाठी वरचे व खालचे छापील शब्द मनात गोंधळ निर्माण करणार नाहीत यासाठी दृष्टीपुढे फक्त ‘पांढरीच’ ओळ आणावी.” यासाठी सुरवातीस ओळींवरून बोट फिरवत वाचन करावे.. त्यामळे वाचन जलद गतीने होते हे सहज लक्षात येईल... नियमितपणे वाचन केल्याने एक गोष्ट साध्य होते, ती म्हणजे परिच्छेदाची सुरुवात वाचल्यास पुढे काय असणार आहे याचा अंदाज येतो.. काही वेळेस अनावश्यक असे तपशील असतात.. उदा. “ तो उठला. त्याने आळस झटकला.. काय करावे याचा विचार करू लागला...... वगैरे.. सरावाने असे तपशील skip करता येतात.. पुस्तके वाचताना आणखी एक गोष्ट करावी.. पुस्तक पूर्ण वाचून झाले नसले तरी पुस्तकात खुण ठेवू नये... पुन्हा सुरवात करताना पुस्तक चाळावे व कुठपर्यंत वाचले होते ते शोधावे... दुसरे असे की एका वेळी चार पाच पुस्तके वाचायला घ्यावीत. प्रत्येक पुस्तक थोडे थोडे वाचावे.. याने स्मरणशक्तीचा विकास होतो.. हि गोष्ट मी स्व. इंदिराजी गांधी याच्या चरित्रात वाचली आहे.. पं. नेहरुंनी त्यांना हा सल्ला दिला होता.. एक वेगळा विषय मांडल्याबद्दल संपादकांचे पुन्हा एकदा अभिनंदन ...

  15. vasantdeshpande

      6 वर्षांपूर्वी

    फार महत्त्वाच्या पण तितक्याच दुर्लक्षित विषयावरील हा लेख नव्या वाचकांना अत्यंत उपयुक्त आहे. समजावून सांगण्याची पद्धतही चांगली आहे. पाश्चिमात्य देशांत यावर खूप संशोधन झाले आहे. आपल्याकडेही थोडे फार प्रयत्न झाले आहेत, पण आपल्या शाळांनी या विषयाकडे अधिक लक्ष द्यायला हवे.

  16. Raju Bodle

      6 वर्षांपूर्वी

    चांगले आहे

  17. bookworm

      6 वर्षांपूर्वी

    वाचायचे कसे याचे फारच छान मार्गदर्शन केले आहे. इतक्या सविस्तर व तपशीलवार माहिती पहिल्यांदा वाचताना थक्क झालो.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen