व्यास कथिती, गणेश लिहिती, संगणकी...

पुनश्च    तंबी दुराई    2018-04-22 06:17:19   

महर्षी व्यासांनी आपला लेखनिक गणेश शंकर याचे त्यांच्या गुहेत स्वागत केले. त्याचा मूड प्रसन्न व्हावा म्हणून त्याच्यासमोर मोदकाची थाळी ठेवली. बुध्दीवंत आणि प्रज्ञावंत म्हणून गणेश शंकर यांची त्रिखंडात ख्याती होती. व्यास यांना काही तरी महत्त्वाचे निवेदन करायचे होते परंतु लिहिणे आणि विचार करणे या दोन्ही क्रिया एकत्र करणे त्यांच्या तत्वात बसणारे नव्हते म्हणून त्यांनी गणेश शंकर यांना पाचारण केले होते. मोदक भक्षण करता करता प्रसन्न मुद्रेने गणेश शंकर म्हणाले, ‘महर्षी, श्रीफळातील मधूर गर आणि काकवी यांचे एवढे एकजीव मिश्रण मी यापूर्वी मोदकात कधी चाखले नव्हते आणि असे एकाच आकाराचे सूबक मोदकही कधी पाहिले नव्हते.’ ‘गणेशा, अरे हा आधुनिक तंत्राचा आविष्कार आहे. श्रीफळातील गर आणि काकवीचे खडे एका यंत्रात घालून त्यावर बसवलेले पात्र यंत्राद्वारे फिरवले की त्यातील जीन्नस हा असा एकजीव होतो.’ ‘परंतु गुरूजी ते पात्र फिरते कसे?’ ‘आकाशात वीज चमकते तेव्हा निर्माण होणारी उर्जा साठवून ठेवता येते. ती उर्जा ताम्रतंतूमधून प्रवाहीत करून या यंत्राला पुरवली की हे यंत्र फिरते आणि सोबत पात्रही फिरते. आकाराचे म्हणशील तर हल्ली एका साध्याशा तंत्राचा वापर करून मी धातूचे मोदकपात्र तयार केले आहे, त्यातून एकाच आकाराचे मोदक करता येतात.’ गणेश शंकर यावर मिश्कील हसले आणि त्यांनी आपल्या झोळीतून एक भलेमोठे सपाट असे चौकोनी यंत्र काढले आणि समोर ठेवले. सोबत आणखी एक छोट्या आकाराची वर्तुळाकार वस्तू काढून पुढ्यात ठेवली. महर्षी व्यास म्हणाले, ‘अरे मी तुला जे निवेदन करणार आहे ते लिहिण्यासाठी भूर्जपत्रे आणण्याऐवजी हे तू भलतेच काय आणले आहेस? या पाटीवर फक्त धुळाक्षरे गिरवता येतील तुला.’ त्यावर गणेश शंकर अधिकच म

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


तंबी दुराई , ललित , मुक्तस्त्रोत
ललित

प्रतिक्रिया

 1. Shriram Bhide

    3 महिन्यांपूर्वी

  मूषक? मूषकाशिवाय गजानन कसा?

 2. Sangeeta Joshi

    3 महिन्यांपूर्वी

  बिल्वद्वार, मेघराज छानच शब्द योजना. मुषक कसा राहीला?

 3. Rdesai

    3 वर्षांपूर्वी

  लेख आवडला.

 4. TINGDU

    4 वर्षांपूर्वी

  लेख नेहमी प्रमाणे छानच आहे. बिल्व द्वार हे नाव कल्पक आहे.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen