का नको मराठी शाळा?

पुनश्च    शुभदा चौकर    2018-05-28 18:00:51   

आज बहुतांश शहरी मराठी सुशिक्षित मध्यमवर्गीय व उच्चभ्रू पालक आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालत आहेत. मराठी शाळा हा पर्यायच त्यांच्या मनात डोकावत नाही. आणि डोकावला तरी तो स्वीकारण्याचे धारिष्ट्य त्यांच्यात नाही, ही वस्तुस्थिती आहे. मातृभाषेतून शिकण्याचे फायदे दूर सारून त्यांना इंग्रजी माध्यम का स्वीकारावेसे वाटते, मराठी शाळा कुठे कमी पडतात, याचा परामर्श घेतलाय शुभदा चौकर यांनी. २००३ साली लिहिलेला त्यांचा हा लेख आजही तितकाच ताजा आणि कालसुसंगत वाटतो - बहुविध डॉट कॉम वरील पुनश्च विभागातील हा लेख वाचा. चिंतन सदरातील हा लेख अतिशय वाचकप्रिय आहे. पुनश्च विभागात याप्रमाणे इतर 26 सदरात ( अनुभवकथन, चिंतन, रसास्वाद इ. ) जुन्या नियतकालिकातील ( सत्यकथा, माणूस, किर्लोस्कर, दीपावली इ.) असेच छान छान लेख असतात. आजच रुपये २५० भरून पुनश्च चे वार्षिक सभासद व्हा आणि अशाच शेकडो लेखांचा आनंद लुटा. सभासद होण्यासाठी ९८३३८४८८४९ या क्रमांकावर miss call द्या. आम्ही आपल्याशी संपर्क साधू... ******** आज बहुतांश शहरी मराठी सुशिक्षित मध्यमवर्गीय व उच्चभ्रू पालक आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालत आहेत. मराठी शाळा हा पर्यायच त्यांच्या मनात डोकावत नाही, डोकावला तरी तो स्वीकारण्याचे धारिष्ट नाही, ही वस्तुस्थिती आहे. मीही गेल्याच वर्षी या सर्व प्रकियेतून गेले. पूर्ण विचारांती या सार्वत्रिक स्थितीकडे पाठ फिरवून अपवाद केला. मुलीला मराठी शाळेत घालण्याचा हा निर्णय घेताना मनात चाललेली विचारप्रकिया, काही सुज्ञ, विचारी मित्र, शिक्षणतज्ञ इत्यादींशी मुद्दाम केलेल्या चर्चा यातून मराठी शाळांची स्थिती, पालकांचे विचार आणि मुलांच्या भवितव्याविषयीची त्यांची धारणा याबाबत अनेक विचारार्ह म ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चिंतन , शुभदा चौकर

प्रतिक्रिया

  1. rsrajurkar

      6 वर्षांपूर्वी

    Lekh aavadla. Mulana Marathi tun shikshan denyacha aamcha nirnay yogya vat to mazi donhi mula marathi bhashe tun shikshan ghet aahet

  2. किरण भिडे

      6 वर्षांपूर्वी

    संतोष जी, आपण इग्यान कि चे सभासदत्व घेतले आहे. तुम्हाला जो लेख वाचायचा आहे तो अवांतर या नियतकालिकातील आहे. तुम्ही login असाल तर सभासद विभागातून अवांतर चे सभासदत्व घेता येईल. ते निःशुल्क आहे.

  3. [email protected]

      6 वर्षांपूर्वी

    पुर्ण लेख वाचायला मिळत नाही

  4. Shrikant Arvind Athavale

      6 वर्षांपूर्वी

    सुंदर व वास्तव लेख

  5. Shandilya

      6 वर्षांपूर्वी

    शाळेतील शिक्षक आणि परिस्थितीचे अचूक वर्णन..

  6. Sameer

      6 वर्षांपूर्वी

    छान. मला वाटते लोक जाणीवपूर्वक मराठी माध्यमाच्या शाळांना कमी लेखतात. शासकीय, महापालिकेच्या शाळांची मुद्दाम वाट लावली जात आहे.

  7. mugdhabhide

      6 वर्षांपूर्वी

    आज शुभदा चौकर यांचा लेख वाचला. थोडा उशीराच वाचला पण प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहवत नाही म्हणून ...... मी माझी दोन्ही मुले इंग्रजी माध्यमातून काढून मराठी माध्यमाच्या शाळेत घातली. त्यावेळी ती अनुक्रमे ४ थी व १ ली मध्ये होती. मोठ्या मुलाला इंग्रजी माध्यमातूनच ४ थीची scholarship देखील मिळाली होती . थोडक्यात मुले शालेय शिक्षणात कुठेही मागे पडत नव्हती. तरीही आम्ही हा निर्णय घेतला. आणि त्यावेळी ज्या ज्या नामवंतांचे मातृभाषेतून शिक्षण विषयक विचार वाचले होते त्यात शुभदाजी देखील होत्या. शुभदाजींनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांवर मी व माझ्या यजमानांनी विचार केला होता. मुलांना अभ्यास सोपा असेल तर त्यांचे बालपण छान जपले जाईल, त्यांना खेळाबरोबरच अवांतर वाचन करता येईल व स्वत:ची वैचारिक बैठक असलेला एक प्रगल्भ नागरिक ते बनू शकतील या मुद्द्यांना आम्ही जास्त महत्व दिले. मुले शाळेत फारतर ५ तास असतात बाकीचा वेळ आपल्याबरोबरच असतात त्यामुळे शाळेच्या crowd चा व शिक्षकांच्या भाषेचा विचार थोडा बाजूला सारला. माझी मुले इंग्रजी माध्यमात जात असताना आमच्या इमारतीत राहणाऱ्या डॉ मोघे यांचा मुलगा मात्र डोंबिवलीच्या टिळकनगर शाळेत शिकत होता. आमच्यासमोर तो १० मध्ये गुणवत्ता यादीत तर झळकलाच पण १२ नंतर IIT पवई येथे शिकायला गेला. त्यामुळेही आम्हाला हा निर्णय घेणे सोपे गेले. सर्वात महत्वाचे होते माझ्या मोठ्या मुलाचे मत परिवर्तन. एका posh इंग्रजी शाळेतून मराठी माध्यमाच्या aided school मध्ये जाणे हा बदल त्याच्यासाठी मोठा होता. तिथे रुळायला २ वर्षे लागली पण आता त्याला हे मनापासून पटले आहे की त्याचा अभ्यास सोपा झालाय. उगाचच सगळे विषय इंग्रजीतून शिकण्याची गरज नाहीये. आणि येथेच आमचा निर्णय योग्य असल्याची आम्हाला पावती मिळाली आहे.

  8. Padmashree Upale

      6 वर्षांपूर्वी

    वडिलांच्या बदलीमुळे आमच्या दोन्ही मुली मराठी माध्यमाच्या शाळेत शिकल्या. लहान गावात मराठी माध्यमाची चांगली शाळा मिळते, इंग्रजी माध्यमाची मिळतेच असे नाही. धाकटीला पहिलीपासुन इंग्रजी विषय होता. सुदैवाने दोघींनाही पाचवीपासुन सेमी इंग्लिश होते, त्याचा उपयोग झालाच. मोठी M. S. होऊन परदेशात नोकरी करत आहे. धाकटी M. S. करत आहे. दोघींचंही मराठी, इंग्लीश वाचन भरपुर आहे.

  9. Prakash Kholgade

      6 वर्षांपूर्वी

    लेख आणि मांडालेले विचार मुद्दे फार महत्वाचे आहेत.प्रत्येक पालकाने चिंतन करावे.परंतू गरज आणि आवड यांचा मेळ घालावाच लागतो.तसेच पाहता घराबाहेरील जगात पाश्चात्त्य भाषा गरजेची असली तरी घरातील भाषा मातृभाषा असणे तितकेच गरजेचे आहे.

  10. शुभदा चौकर

      6 वर्षांपूर्वी

    मी हा लेख लिहून आता १५ वर्षे झाली. आजही हा लेख समयोचित आणि उपयुक्त वाटतो, त्यावर चर्चा होते, याचा लेखक म्हणून आनंद आहे. मात्र एक सुजाण नागरिक म्हणून १५ वर्षांत या स्थितीत सुधारणा होऊ नये, याचा विषाद वाटतो. शासन, प्रशासन, पालक सर्वानी तीव्र इच्छाशक्ती दाखवली तर मातृभाषेतून शिक्षणाचा ट्रेंड रुजेल का? त्याचे फायदे मुलांना मिळतील का? मी माझ्या मुलीला मराठी माध्यमाच्या शाळेत, बालवाडीत घातले आणि मगच हा लेख लिहिला. आता ती १८ वर्षांची आहे. UDCT मध्ये Chemical technology चे पहिले वर्ष उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. ती मराठी, इंग्रजी दोन्ही पुस्तके वाचते, इंग्रजी सिनेमे आवडीने बघते. इंग्रजीत किंवा एकंदर विकासात कमी पडलेली नाही. हे एवढ्यासाठी सांगितले, कारण मराठी माध्यमाची हट्टाग्रही पालक असले तरी आई म्हणून काही क्षणी हुरहूर वाटायची की, माझा निर्णय तिला त्रासदायक तर ठरणार नाही? पण प्रत्येक टप्प्यावर पटत जातेय, की तो निर्णय बरोबर होता, सुखाचा होता- तिच्यासाठीही! आपण जरूर चर्चा करूया, मार्ग शोधूया. आणि मुलांना आनंदाने, विना-त्रास शिकू देऊ या... शुभदा चौकर

  11. Shubhada

      6 वर्षांपूर्वी

    मी हा लेख लिहून आता १५ वर्षे झाली. आजही हा लेख समयोचित आणि उपयुक्त वाटतो, त्यावर चर्चा होते, याचा लेखक म्हणून आनंद आहे. मात्र एक सुजाण नागरिक म्हणून १५ वर्षांत या स्थितीत सुधारणा होऊ नये, याचा विषाद वाटतो. शासन, प्रशासन, पालक सर्वानी तीव्र इच्छाशक्ती दाखवली तर मातृभाषेतून शिक्षणाचा ट्रेंड रुजेल का? त्याचे फायदे मुलांना मिळतील का? मी माझ्या मुलीला मराठी माध्यमाच्या शाळेत, बालवाडीत घातले आणि मगच हा लेख लिहिला. आता ती १८ वर्षांची आहे. UDCT मध्ये Chemical technology चे पहिले वर्ष उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. ती मराठी, इंग्रजी दोन्ही पुस्तके वाचते, इंग्रजी सिनेमे आवडीने बघते. इंग्रजीत किंवा एकंदर विकासात कमी पडलेली नाही. हे एवढ्यासाठी सांगितले, कारण मराठी माध्यमाची हट्टाग्रही पालक असले तरी आई म्हणून काही क्षणी हुरहूर वाटायची की, माझा निर्णय तिला त्रासदायक तर ठरणार नाही? पण प्रत्येक टप्प्यावर पटत जातेय, की तो निर्णय बरोबर होता, सुखाचा होता- तिच्यासाठीही! आपण जरूर चर्चा करूया, मार्ग शोधूया. आणि मुलांना आनंदाने, विना-त्रास शिकू देऊ या... शुभदा चौकर

  12. Sumukh Joshi

      6 वर्षांपूर्वी

    लेख वाचला ह्या विषयावर आम्ही घरात या पूर्वी चर्चा केली होती पण घरातील स्त्री हे मानायला तयार नाही माझी मोठी मुलगी इयत्ता 3 ला आहे आणि छोटी आता पुढील वर्षी प्लेस्कुलला जाईल छोटीला मराठी शाळेत घालू असा प्रस्ताव मांडल्यावर घरातले 6 विरुद्ध मी एकटा अशी वेळ माझ्यावर आली. मी स्वतः मराठी मिडीयम मधून शिकलोय व्यवसाय करतोय परदेश दौरे करून आलोय पण इंग्रजी भाषेमुळे माझ्या आयुष्यात फार काही फरक पडला नाही निदान मला मराठी उत्कृष्टपणे बोलता येते लिहिता येते ह्याचा मला अभिमान आहे. घरातील लोकांचा असा समज आहे की मी मराठी शाळेसाठी हट्ट करतोय म्हणजे मला पैशाचा प्रॉब्लेम आहे कारण मला त्याविषयी घरच्यांनी आम्ही मदत करतो असेही सांगितले हा विषय हाताळताना प्रचंड तारांबळ होते शेवटी एकमत ना होऊन हा विषय संपला आणि अर्थातच 1 विरुद्ध 6 मतांनी घरच्यांचा विजय झाला

  13. किरण भिडे

      6 वर्षांपूर्वी

    सुरेश जी, तुमचा मुद्दा बरोबर आहे. पण इथे ज्यांनी सांगितलंय त्या शुभदा चौकर यांनी त्यांची मुलगी मराठी माध्यमातच घातली. त्यांनी लेखातच लिहिलंय तसं. इतकेच काय मी आणि माझ्या बायकोने पण इंग्रजी माध्यमातील आमची मुले काढून मराठी माध्यमात घातली. आज त्याचे चांगले परिणाम आम्ही पाहत आहोत. आम्हीच फक्त नाही, सगळेच हे करू शकतात. फक्त 'लोक काय म्हणतील?' याकडे लक्ष न देता आपल्या बुद्धीला पटेल तेच करावे. खूप जण हा लेख वाचून 'आता काय उपयोग? उशीर झाला.' असे म्हणतील. पण आपण एवढे तर करू शकतो की जे आज हा निर्णय घेण्याच्या वयोगटात आहेत त्यांच्यापर्यंत हा लेख पोचवू शकतो. तेव्हढ नक्की करा.

  14. SURESH DEODHAR

      6 वर्षांपूर्वी

    लेख उत्तम. जोपर्यंत चांगल्या मराठी शाळा उपलब्ध होतनाहीत तोपर्यंत पालक इछा असूनही आपल्या मुलांसाठी धोका कसा पत्करनार? सांगणे सोपे असते. आचरणात आणणे कठीण.

  15. ajitpatankar

      6 वर्षांपूर्वी

    या संदर्भात “एबीपी माझा” या वाहिनीवरील “माझा कट्टा : रिअल लाईफ 'फुनसुक वांगडू' अर्थातच सोनम वांगचुक यांच्याशी मनमोकळ्या गप्पा” हा कार्यक्रम पाहावा.. व्हिडीओ लिंक : https://www.youtube.com/watch?v=ojSbHrSJ3bA

  16. Manisha Kale

      6 वर्षांपूर्वी

    शुभदा चौकर यांचा लेख अतिशय आवडला . त्यांनी प्रत्येक मुद्दा सविस्तर मांडला आहे. शासनाचे उदास धोरण याला कारणीभूत आहे. आज मराठीची फार बिकट अवस्था झाली आहे. शिक्षण धोरण बदलल्या शिवाय आणि मराठी शाळेचा दर्जा सुधारुन लोकांनमध्ये विश्वास निर्माण केल्याशिवाय पुन्हा मराठी शाळा माध्यमातून शिक्षण घेणे हे खरंच अवघड काम आहे. तरीही शुभदा चौकर आणि या क्षेत्रातिल मान्यवर लोकांना शासनानी बरोब्बर घेऊन मराठी आणि इंग्लिश दोन्ही कसे ठेवता येईल किंवा semi इंग्लिश कधी पासून सुरु करणे योग्य याची चर्चा केली तर आणि तरच यातून मार्ग निघू शकतो. आजच्या काळात पूर्ण मराठी माध्यमातून शिक्षण घेणे कठीण आहे .तेव्हा semi इंग्लिश हा एक चांगला पर्याय वाटतो. आजच्या घडीची सर्वात मोठी समस्या आहे व यावर अत्यंत सखोल प्रकाश टाकला आहे. लेख अप्रतिम.

  17. Makarand Deshpande

      6 वर्षांपूर्वी

    Sadar lekh chan aahe .Marathi shalanchya sadyastithiche varnan yathayogya ahe. Lekh motha zala ahe thoda lahan asta tar parinam ankhin changala zala asta.

  18. vinay samant

      6 वर्षांपूर्वी

    1, 2, 4, 8, 9 अगदी बरोबर मुद्दे आहेत जीथे प्रत्येक मराठी भाषाभीमानी व्यक्तीला माघार घ्यावीच लागते. माझी बायको, आइ व बहीण ह्यांच्यात विशेष जमत नाही. पण इंग्रजी शाळा ह्या मुद्द्यावर त्यांची अभेद्य एकी आहे आणि समर्पक मुद्दे आहेत.. ८वी नंतर सेमी इंग्रजी हा पर्याय खरेच खूप चांगला आहे. मी स्वत: ८वी नंतर सेमी इंग्रजीचा विद्यार्थी आहे. आणि मला खरेच त्याचा इंजीनिअरींगला खूप फायदा झाला. आठवीपासून Science, Maths (if possible Geography) इंग्रजीत असायला हवे म्हणजे मुलांचे कुठे काही अडणार नाही..

  19. bookworm

      6 वर्षांपूर्वी

    आमच्यात झालेेल्या एका कडाक्याच्या भांडणानंतर माझ्या पत्नीने माझ्या मुलीला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकण्याचा निर्णय घेतला. वर उल्लेख केलेल्या कारणांपैकी २,३,८ चा विचार करताना मी फारसे समाधानकारक स्पष्टीकरण मला देता आले नव्हते आणि मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेल्या पत्नीच्या प्रवाहपतित होण्याचे सखे आश्चर्यही वाटले होते. दुर्दैवाने इंग्रजी माध्यमाचा एकूण आवाका पाहता माझ्या मुलीला इतक्या पटापट आकलन होत नाहीये, अर्थात ती तिची व्यक्तिगत मर्यादा असेलही...पण मला माझ्या पत्नीला न समजावता आल्यामुळे म्हणा वा अजून कशामुळे मुलीला अभ्यासाची गोडी अजून लागली नाहीये. लोकरंग पुरवणीत आलेला हा लेख मला त्यावेळी पुरेपूर पटला होता पण आज पुन्हा वाचताना एका चळवळीचा भाग बनू न शकल्याबद्दल माझे मन खेद व विषादाने भरून गेले.

  20. amruta215

      6 वर्षांपूर्वी

    अतिशय मुद्देसूद, परिपूर्ण लेख. एकूणएक मुद्द्यांशी सहमत. मुख्य म्हणजे नुसतेच प्रश्न उपस्थित न करता उपायही सुचवले आहेत. खूप आवडला.

  21. Suresh Johari

      6 वर्षांपूर्वी

    लेख खूप छान आणि उद्बोधक आहे. आजच्या काळात मुलांची शैक्षणिक प्रगती साठी लेखिकेच्या विचारांशी मी सहमत आहे.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen