आणीबाणी कधी लादतात आणि भारतीय आणीबाणीचे परिणाम

आणीबाणी    संकलन    2018-06-14 18:00:25   

आणीबाणी कुठल्या स्थितीत लागू करता येते व इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीचे अंतिमतः परीणाम  काय झाले याचे वर्णन करणारा  प्रत्येकी एक लघुलेख वाचा. पहिला माहितीवजा लेख महाराष्ट्र टाईम्स तर दुसरा लेख ऐसी अक्षरे या वेबपोर्टलच्या सौजन्याने साभार सादर करीत आहोत.-   १) आणीबाणी कधी लादतात    ४३ वर्षांपूर्वी २५ जून रोजी भारतात आणीबाणी लागू झाली होती. ही आणीबाणी लादण्याचा अधिकार कोणाला आहे, ती कधी, केव्हा, कोणत्या परिस्थितीत लादता येते, हे जरा जाणून घेऊ या. २५ जून १९७५ रोजी देशात पहिल्यांदा आणीबाणी लादण्यात आली होती. यासंदर्भात पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केलेल्या शिफारशीनुसार राष्ट्रपती फक्रुद्दिन अली अहमद यांनी आणीबाणीच्या आदेशाला रात्री ११ च्या सुमारास मंजुरी दिली. विशेष म्हणजे इंदिरा गांधींचा हा निर्णय त्यांच्या काही विश्वासू सहकाऱ्यांनाच माहिती होता. मंत्रीमंडळातील सर्व सहकाऱ्यांनाही त्याची कल्पना नव्हती. आणीबाणी लादण्यास पंतप्रधानांची मंजुरी असल्यास मंत्रीमंडळाची संमतीची गरज नाही, असा निर्वाळा कायदेतज्ञ आणि पश्चिम बंगालचे तत्कालीन राज्यपाल सिद्धार्थ शंकर यांनी दिल्यानंतर राष्ट्रपतीही आणीबाणी लादण्यास तयार झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी बीबीसीवरून देशातील नागरिकांना ही बातमी कळली.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


राजकारण , सोशल मिडीया , महाराष्ट्र टाईम्स , आणीबाणी , ऐसी अक्षरे

प्रतिक्रिया

 1. Rdesai

    2 वर्षांपूर्वी

  छान! माहितीपूर्ण लेख.

 2. shubhada.bapat

    3 वर्षांपूर्वी

  १९७५ ला आणिबाणी काय हे कळत नव्हते. फक्त काहीतरी भितीचे वातावरण होते. आता पुन्हा गतकाळ आठवला. ठळकपणे आठवते ते किशोरकुमारची गाणी रेडिओवर लावायला बंदी होती

 3. vasant deshpande

    4 वर्षांपूर्वी

  छोटापण माहितीपूर्ण लेख आवडला.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen