येरे येरे पावसा...अपडेटेड!

पुनश्च    तंबी दुराई    2018-06-24 06:00:16   

येरे येरे पावसा तुला देतो पैसा पण आता कारभार नाही पहले जैसा. लोकशाही रात्रंदिवस जागते आहे, आणि देशाला आर्थिक शिस्त लागते आहे. कुणाला काय द्यायचं ते दे, पण थेंबा थेंबाचा नीट  हिशेब मात्र घे. मला सांग, तुला कॅश चालेल का? नाही तर तुझा अकाउंट नंबर दे, ब्रँचचे नावही पुढे जोड आणि अर्थातच आयएफएससी कोड, मग करतो तुला पैसे ट्रान्सफर. पण यात बरेच आहेत जर आणि तर! ऑनलाईन दिले, तर जीएसटी लागेल आणि इन्कमटॅक्सचे झेंगटही मागे लागेल कॅश घेशील, तर मात्र बिना पावतीचे भागेल. काय म्हणालास? पडण्याआधीच तुला बरेच प्रश्न पडले? तुझे थेंब त्यामुळे ढगातच अडले? तुला सांगतो, तुझे नशीब थोर आहे म्हणून तुझ्यात अजून जोर आहे बरे झाले, तुझ्या रथाला चार चाके नाहीत आणि तुझ्या मार्गात टोलनाके नाहीत नाही तर तुला पडायला परवडले नसते, आणि आमचे सारेच अडले असते, हवामान खाते तर पुरे कोलमडले असते आधीच बिचारे अंदाजपंचे पाढे मोजतात आणि दरवर्षी नव्याने तोंडघशी पडतात. आणि यावेळी आणखी एक काम नक्की कर या फॉर्ममध्ये तुझी माहिती भर आणि एक मस्त फ्लॅश मार तुझा एक चांगला फोटो देऊन जा जाताना आठवणीनं आधारकार्ड घेऊन जा कारण अंदमान टू केरळ आणि केरळ टू महाराष्ट्र रस्त्यात कोणीतरी नक्कीच टोकेल आणि तुझ्याकडे आधारकार्ड मागेल. तू फार भोळा आहेस, फार साधेपणानं वागतो इकडे कान दे जरा, शहाणपणाच्या चार गोष्टी सांगतो. तू आलास की लोक घरोघरी कांदा भजी करतात त्यामुळे कांद्याची विक्री होते किलोच्या किलो बेसन आणि तेल विकले जाते आणि लाखोंची उलाढाल होते. त्यातला एक पैसा तरी कोणी कधी दिला का तुला? तू पडू लागलास की भूट्टे भाजले जातात विस्तवावर आणि त्याला चोपडले जाते मीठ लिंबू वर ताडपत्री खाली चार ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


तंबी दुराई , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

 1. Mangesh Nabar

    3 वर्षांपूर्वी

  इंग्रजी शब्द टाळून कविता लिहायला कविवर्यांनी जर सुरूवात केली नाही तर इतरेजन काय करणार ? मंगेश नाबर

 2. तंबी दुराई

    3 वर्षांपूर्वी

  अर्थात काहीच हरकत नाही. पुनश्र्चचा उल्लेख मात्र अवश्य करा म्हणजे आपल्या या साहित्य कुटुंबात आणखी काही लोक सामिल होतील.

 3. shilpa1952

    3 वर्षांपूर्वी

  हकविता मैत्रिणींना वाचून दाखवली तर चालेल ना कव

 4. shilpa1952

    3 वर्षांपूर्वी

  छानच आहे आजच्या काळात साजेशी काळात साजेशी ्आणि सर्व

 5. rajendrakadu

    3 वर्षांपूर्वी

  "रोजच्या व्यवहारातलेही खटकायलाच हवेत. तिथून ते गेले की कवितेतूनही जातील." हे महत्वाचे.

 6. puruawate

    3 वर्षांपूर्वी

  उत्तम कविता

 7. तंबी दुराई

    3 वर्षांपूर्वी

  त्याची आर्थिक समज वाढेल तसा मागेलही कदाचित...काय सांगावं? :):)

 8. तंबी दुराई

    3 वर्षांपूर्वी

  धन्यवाद

 9. तंबी दुराई

    3 वर्षांपूर्वी

  धन्यवाद. तोच हेतू होता. पाऊस सुध्दा काही घेतल्याशिवाय काही देत नाही,असं लहाणपणीच सांगतात आपल्याला.

 10. तंबी दुराई

    3 वर्षांपूर्वी

  आभारी आहे

 11. तंबी दुराई

    3 वर्षांपूर्वी

  आभारी आहे, लिहिणे सत्कारणी लागले

 12. तंबी दुराई

    3 वर्षांपूर्वी

  धन्यवाद

 13. तंबी दुराई

    3 वर्षांपूर्वी

  रोजच्या व्यवहारातले म्हणूनच वापरले. पण खटकले तेही योग्यच. रोजच्या व्यवहारातलेही खटकायलाच हवेत. तिथून ते गेले की कवितेतूनही जातील.

 14. suresh johari

    3 वर्षांपूर्वी

  खूप सुंदर . आवडली .

 15. kiran.kshirsagar

    3 वर्षांपूर्वी

  व्वा! मजा अाली.

 16. Rajesh Deshpande

    3 वर्षांपूर्वी

  मस्त

 17. amolss

    3 वर्षांपूर्वी

  मस्तच.वर्तमान राजकीय व सामाजीक परीस्थितीच चित्रच उमटलय यात.

 18. yaman5

    3 वर्षांपूर्वी

  कविता कवीच्या लौकिकाला साजेशी आहे. कवितेत कित्येक अनावश्यक किंवा टाळता येण्यासारखे इंग्रजी व हिंदी शब्द आले आहेत. आज आपण रोजच्या व्यवहारात जरी असंख्य इंग्रजी तसेच हिंदी शब्द वापरत असलो तरी या कवितेत ते टाळून कविता देता आली असती असे प्रांजळपणे सांगावेसे वाटते. उदाहरणे द्यायची झाली तर ---- [ कवितेतील खटकलेला शब्द :- पर्यायी शब्द ] (१) पहले जैसा :- पहिल्यासारखा (२) कॅश :- रोख (३) अकाउंट नंबर :- खाते क्रमांक (४) ब्रँचचे :- बँक शाखेचे (५) फॉर्म :- अर्ज (६) अंदमान टू केरळ :- अंदमान ते केरळ (६) भुट्टे :- मक्याची कणसे (७) गिल्टी :- अपराधी माझे मत आपल्याला किंवा कवीला पटणार नाही पण देतो बापडा ! मंगेश नाबर

 19. bookworm

    3 वर्षांपूर्वी

  फारच छान! मजा आली!

 20. Meenal Ogale

    3 वर्षांपूर्वी

  खूप छान.तरी बिचारा अजून पैशावरच खूष होऊन पडत असतो, रूपये डाॅलर्स ॲानलाईन पेमेंट मागत नाहीं.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen