इंजिनियरिंगचे कटू सत्य


इंजिनियर्सचा तुफान सप्लाय हा नियंत्रणात आला नाही तर ती एक सामाजिक समस्या होणार आहे, किंबहुना झालीच आहे.

पालक आपल्या मुलासाठी कष्टाने मिळवलेले पैसे खर्च करतात आणि त्याला इंजिनियर बनवतात. त्यांना वाटतं की इंजिनियर साठी ढीगभर जॉब पडले आहेत. बरं या पालकांना आपण हेही सांगू शकत नाही की तुमच्या मुलाला वा मुलीला फर्स्ट क्लास वा डिस्टींक्शन मिळालं म्हणजे फक्त मार्क आले आहेत. अदरवाईज त्यांना इंजिनियरिंग चं अगदी बेसिक नॉलेज पण नाही आहे.

या इंजिनियरिंग नावाच्या मृगजळामागे धावू नका हे माझं पालकांना आणि त्यांच्या मुलांना कळकळीचं आवाहन आहे. अमेरिकेत वार्षिक १ लाख इंजिनियर्स बाहेर पडतात आणि त्यांच्या इकॉनॉमी ची साईझ आहे १५ ट्रिलियन डॉलर्स. भारताची इकॉनॉमी आहे २ ट्रिलियन डॉलर्स, आणि तिथे बनतात १५ लाख इंजिनियर्स.

पूर्वी मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला घाऊक भावात इंजिनियर्स लागायचे. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल या कोअर ब्रँच च्या मुलामुलींना इथे जॉब मिळायचे. गेल्या काही वर्षात मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र हे ज्या वेगाने वाढलं त्याच्या कैक पटीने इंजिनियर्स मुलं मुली भारतात तयार झाले. आणि मग आय टी सेक्टर ने भरमसाठ मुलं मुली घ्यायला सुरुवात केली.

ज्या वेगाने त्यांनी इंजिनियर्स घेतली त्याने एके काळी तुटवडा तयार झाला होता. पण अलीकडच्या काही काळात हा वेग मंदावला. आणि जसं हे क्षेत्र विकसित होत गेलं, आय टी क्षेत्रात त्या स्ट्रीमची गरज भासू लागली. एके काळी मिळेल त्या ब्रॅन्चचे इंजिनियर्स नोकरीला ठेवणाऱ्या आय टी कंपन्या आता सिलेक्टिव्ह बनल्या. भारतात रोजगार उत्पन्न करणाऱ्या बहुतांश क्षेत्रात इंजिनियर्सची गरज नाही.

पर्यटन क्षेत्र, फायनान्स, व्यापार, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स, हॉस्पिटल्स आणि शेती या क्षेत्रात इंजिनियर्स लागत नाही. जीडीपीच्या ६०% उत्पादन देणाऱ्या क्षेत्रात इंजिनियर्स लागत नाहीत तरीही आज बऱ्याच युवक युवतींना इंजिनियर व्हायचं आहे. हे भविष्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. मागणी कमी आणि सप्लाय जास्त. बरं जो माल बाहेर पडतोय त्याची क्वालिटी चांगली नाही. टॉपची शंभर दीडशे कॉलेजेस सोडली तर बाकी आनंद आहे. आपण कशासाठी इंजिनियर होत आहे त्याचा या पोरापोरींना पत्ता नाही.

माझ्या तरुण मित्र मैत्रिणींनो आणि त्याच्या पालकांनो, इंजिनियरिंग पदवी ही स्वस्त नाही आहे. तिथले मार्क्स जरी आजकाल स्वस्त झाले असले तरी दहा बारा लाखाचा चुराडा करून ते मिळतात. आणि जेव्हा गरीब पालक हे पैसे खर्च करतात तेव्हा त्यांनी पोटाला चिमटा काढला असतो हे ध्यानात असू द्या. त्यांच्या या कष्टाच्या कमाईला जेव्हा पाय फुटतात त्याला न्याय मिळणार का, यावर सखोल अभ्यास करून निर्णय घ्या. एक समाज म्हणून आपण जर सरधोपटपणे हा मार्ग निवडत असू तर वर्षाला हा देश पैशाचा अपव्यय तर करत आहेच, वर एक ताकदीचं मनुष्यबळ निष्क्रिय करत चाललो आहोत.

(हे लिहिताना श्री सुनील जेजीत यांच्या इंग्रजी लेखाची मदत घेतली आहे)

लेखक- राजेश मंडलिक 



प्रतिक्रिया

  1. Anant Tadwalkar

      3 वर्षांपूर्वी

    आजच्या घडीला हे पटणारे आहे..

  2. Anant Tadwalkar

      3 वर्षांपूर्वी

    आजच्या घडीला हे पटणारे आहे..

  3. Anant Tadwalkar

      3 वर्षांपूर्वी

    आजच्या घडीला हे पटणारे आहे..

  4. Anant Tadwalkar

      3 वर्षांपूर्वी

    आजच्या घडीला हे पटणारे आहे..

  5. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    सावध ऐका पुढच्या हाका .

  6. Tp

      6 वर्षांपूर्वी

    भारतात प्रत्येक क्षेत्रात ही बोंब आहे। शेती क्षेत्रात कुणी लक्ष घालायला तयार नाही।

  7. Vasant

      6 वर्षांपूर्वी

    सुंदर लेख इंजिनीअरिंगला पर्याय यावरही लेख हवा

  8. arush

      6 वर्षांपूर्वी

    जे सत्य आज प्रत्येकालाच कळलय तेच उधृत करण्यापेक्षा इतर सोपे चांगले पर्याय लेखात मांडले जायला हवे होते

  9. bhushanpathak

      6 वर्षांपूर्वी

    उत्तम अंजन घालणारा लेख. आपण समस्यांचा नकारात्मक विचार न करून त्यावर उत्तर शोधायला हवं। अभियांत्रिकी शिक्षण वाईट नसून, आपली एकूण शिक्षण पद्धतच नोकरीभिमुख आहे, त्या ऐवजी मुलांना लहान पण पासूनच संशोधन , व्यवसाय किंवा फ्री लांसिंग अथवा स्टार्ट अप बद्दल सांगणे उत्तम। मुलं 8 वी मध्ये आल्यापासून हे बाळकडू द्यायला हवं।

  10. किरण भिडे

      6 वर्षांपूर्वी

    शैलेश जी, काही स्पेसिफिक डोक्यात आहे की कोणी काही करत असेल तर मदत करण्याची इच्छा आहे?

  11. Shailesh Deshpande

      6 वर्षांपूर्वी

    राजेशजी मला बऱ्याचदा aimless शिक्षण हा सर्वात मोठा issue आहे असं वाटत, आपण उत्कृष्ट विषय चर्चेत आणला, ह्या विषयी मी काही करू इच्छितो ....

  12. Swarup Deshmukh

      6 वर्षांपूर्वी

    सर तुम्ही अतिशय महत्त्वाचा विषय मांडला आज मुलांना व्यवसायीक व प्रॅक्टीकल शिक्षणाची गरज आहे .नाशिक येथील E & G INNOVATIVE EDUCATION कंपनी आहे . ज्यामध्ये E3 कोस॔च्या मध्यमातुन याविषयी मार्गदर्शन केले जाते .मला स्वतः याचा खूप फायदा झाला आपण पुढील क्रमांकावर माहिती घेऊ शकता.+919422212149

  13. amoldipali

      6 वर्षांपूर्वी

    बँकिंग क्षेत्रात आले तर त्यांना Economy समजत नाही जशी एखाद्या Commerce च्या विद्यार्थ्यांना समजते अवजड आहे हे सर्व ?

  14. Dr Mukund Karambelkar , Chalisgaon

      6 वर्षांपूर्वी

    डॉक्टर, इन्जीनीअर, सनदी अधिकारी या पलीकडे मध्यमवर्गीय पालक विचारच करायला तयार नाहीये. या क्षेत्रात आता तितकीशी सुखावह परिस्थिती राहिलेली नाही. सरकारी धोरणांमुळे आणि पैसा, वशिला या गोष्टींच्या वर्चस्वामुळे, गुणवत्ता (ज्याला खरं तर प्राथमिकता द्यायला पाहिजे) मागे पडल्यामुळे सुमार दर्जाची केवळ तांत्रिक ज्ञान (तेही अर्धवट) असलेली "पदवीधर" माणसंं तयार होत असलेली आपल्याला सर्वच क्षेत्रात दिसत आहेत. पालक, शिक्षण संस्था आणि नेतृत्वात असलेली माणसे या सगळ्याचा खोलवर विचार करायला तयारच नाहीत. कुठल्याही क्षेत्रात गेलं तरी यशस्वी होतील अशी संवेदनशील, नाविन्याचा शोध घेवू शकणारी (Innovative ) कल्पक, विचारपूर्वक नेतृत्व करू शकणारी, धाडसी माणसंं घडवणं ही आपली प्राथमिकता असली पाहिजे . पण लक्षात कोण घेतो ?

  15. Smita Mirji

      6 वर्षांपूर्वी

    अगदी खरयं . मध्यमवर्गीय पालकांनी सजगपणे याचा विचार करावा. आज कर्ज काढून शिकवण्याची प्रथा वाढिस लागली आहे. त्याचा भार खरतर पालकांनाही सहन होत नाही आणि मुलांनाही. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यानिर्भेळ आनंदही हरवला आहे.

  16. Anjali Markale

      6 वर्षांपूर्वी

    अगदीच त्रोटक वाटला लेख. टेक्नॉलॉजीची गरज कधीच न संपणारी आहे. त्यामुळे इंजिनियर्सची गरज नाही हे पटत नाही. चांगले ज्ञान देणारी काॅलेज नसणे,अभ्यासू वृत्तीचा अभाव ,केवळ डिग्रीला महत्त्व ,गल्लाभरु काॅलेजात येन केन प्रकारेण डिग्रीसाठी प्रवेश घेणे यात तंत्रज्ञान शिकणे बाजूला राहतेय. अशा काॅलेजांना सरसकट बंद न करता शिक्षणसम्राटांसाठी ती चालू ठेवलेली असतात. तिथे पैसे घालून जाणे अयोग्यच.

  17. Babaakt

      6 वर्षांपूर्वी

    Very nice.

  18. ShantanuTathe

      6 वर्षांपूर्वी

    त्यामुळे आता इंजिनीरिंग करून स्पर्धा परीक्षा, बँकिंग कडे वळण्याचा ट्रेंड आला आहे. बरं इतके तरुण इंजिनीअर्स आपल्याकडे असूनही संशोधन आणि तंत्रज्ञानात तरी आपण कुठे पुढे आहोत? संशोधनात कॉपी पेस्ट संस्कृती फोफावली आहे. बहुतांश सगळ्या क्षेत्रात आपण तंत्रज्ञान आयात करत आहोत. हा दोष सगळा या विद्यार्थ्यांचा आहे का? त्यांना योग्य संधी मिळते का शिक्षण पूर्ण झाल्यावर? माझ्या मते आपली व्यवस्था याला कारणीभूत आहे. गुणवत्तेला आपल्याकडे किंमत नाही. पैसा आणि अधिकार महत्वाचा मानला जातो. दादाजी खोब्रागडे यांचं उदाहरण पुरेसं बोलकं आहे. जे मोठमोठ्या संशोधन केंद्रांना, विद्यापीठांना नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं. किती प्रोत्साहन मिळाल त्यांना आपल्या व्यवस्थेत? शेवटी हलाखीत त्यांचा शेवट झाला. लाल फितीचा फटका डॉ. जयंत नारळीकर यांच्या सारख्या जेष्ठ संशोधकानाही बसला आहे. तिथे इतर पामरांची काय कथा? एवढे IT आणि COMPUTER इंजिनीअर्स आहेत आपल्याकडे, का नाही आपण एखादी गूगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट उभी करू शकलो? कारण व्यवस्थाशून्यता ही आपली खासियत आहे. आज आपण चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर उभे आहोत पण इथेही आपली बस चुकली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आगमनानंतर तर परिस्थिती अजून बिकट होणार आहे. याचा पहिला फटका जरी इंजिनीअर्स ना बसणार असला तरी कृत्रिम बुद्धिमत्तेला कुठलेही क्षेत्र वर्ज्य नाही. येणाऱ्या काळात अफाट लोकसंख्येच्या आपल्या देशात हे कडवे सत्य फक्त इंजिनीअरिंग पुरते मर्यादित राहणार नाही हे नक्की.

  19. subodh74

      6 वर्षांपूर्वी

    तुम्ही इंजिनिअर होऊ नका म्हणता मग काय vyache त्याला पर्याय दिला नाही



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen