स्पष्टच बोलतो, राग अवश्य माना....


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्टच्या भाषणासाठी लोकांकडून सूचना मागवल्या आहेत. पत्र लिहून त्यांना केलेल्या या काही सूचना...

प्रिय प्रधान सेवक, पंधरा ऑगस्टच्या भाषणात मी काय बोलू? असं तुम्ही विचारलंच आहे म्हणून मी हे पत्र पाठवत आहे. पंधरा ऑगस्टच्या भाषणात काँग्रेसच्या काळात गरीबी, महागाईवर प्रवचन असे आणि त्यानंतर सर्वधर्मसमभावाचे, सामाजिक सलोख्याचे डोस पाजले जात. शेवटी पाकिस्तानला इशारा देण्याची आणि आम्ही कोणतीही आगळीक सहन करणार नाही वगैरे ठणकावून सांगण्याची स्वीट डिश असे. त्या प्रवचनांचा, डोसांचा आणि स्वीट डिशांचा अगदीच कंटाळा आला म्हणून आम्ही त्यांना हाकलले आणि तुम्हाला आणले. पण सेवकसाहेब, खुद्द तुम्ही, तुमच्या सरकारमधले उपसेवक, राज्यसेवक, पालिकासेवक म्हणजे, काँग्रेसच्या हिरव्या शिमला मिरची ऐवजी तुमची केशरी रंगाची शिमला मिरची विकत आणावी, तसे निघालात हो. तीच चव, तशाच आणि तेवढ्याच बिया आणि तेवढाच आकार. फक्त रंग वेगळा. स्वीट डिशसह सगळा मेन्यू तोच आहे, फक्त थाळी बदलली. स्पष्टच बोलतो, राग अवश्य माना.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


विनोद , उपरोध

प्रतिक्रिया

  1. Diwakar Ganjare

      3 वर्षांपूर्वी

    सुंदर . . .नेहेमी प्रमाणे मार्मिक. . . वस्तुस्थिती ची जाणीव करून देणारं पण विनोदी शैली आवडली . . .Yes Prime Minister ची आठवण करून देणारे सदर . . .

  2. Vinesh Salvi

      3 वर्षांपूर्वी

    मी तंबी दुराई सुरूवातीपासून वाचत होतो..लोकसत्तेमध्ये सदर असेपर्यंत...पण ही शैली अनोळखी आहे..माझ्यासारख्या सामान्य वाचकाला...

  3. Jayashree patankar

      3 वर्षांपूर्वी

    दुसर्‍यावर टीका करण्यापूर्वी आधी स्वतः आत्मपरीक्षण करावे .असे आमचे सर म्हणत.

  4. Abhinav Benodekar

      3 वर्षांपूर्वी

    मोदी तेच ते बोलतात तसें त्यांच्याविरुद्ध बोलून -भलेही उपहासाने -तेच ते बोलतात /लिहितात. 3वर्षानी 15लाख -जे येऊ शकतील एव्हडेच बोलले होते -फुकट, बिना मेहनतीचे आम्हा लोकांना फा ---र हवे हवेसे वाटतात! आता आमच्या बाजूची गल्ली मोदींनीच झाडून स्वच्छ करायला पाहिजे!

  5. arjas

      6 वर्षांपूर्वी

    अति उत्तम

  6. Aaidada

      6 वर्षांपूर्वी

    नटसम्राट मोदींच्या समोर मोठे प्रश्न नसतात कारण मनकी बात मध्ये ते त्यावर मीठाची गुळणी धरतात. इतक्या वर्षात काँग्रेसच्या राज्यात फक्त भ्रष्टाचार च झाला बाकी काही नाही हा मोदींनी भक्तांच्या मनात निर्माण केलेला भ्रम आहे आणि त्याचे गारूड मोठे आहे. सब घोडे बारा टक्के ह्या नुसार ते डायरेक्ट घास तोंडात घालायचे हे मागून वळवून घालतात इतकेच. आता प्रधान सेवक म्हणाले सांगा कुठे कमतरता आहे म्हणून सांगायला गेलो तर भक्तांचे हल्लाबोल मुसंडी मारून शिंगावर घेते.हं... वेगळी पोचपावती देण्याची गरज नाही तंबी तुम्हांला. लिहित रहा मांजराच्या गळ्यात घंटा बांधायला धाडसच लागते ?? ? स्वाती काळे

  7. kaustubhtamhankar

      6 वर्षांपूर्वी

    सामान्य माणसाचे खरेखुरे चित्र वरवर मोदींना चिमटे असे वाटते पण खरेतर सामान्य माणूस स्वत: तक्रारी शिवाय कांहीही करत नाही हेच तंबिंना बिंबवायचे असावे.पण ते कळेल कसे? कारण सामान्यांचा महासागर नुसत्याच लाटा पुढे जायचा नुसताच भास!

  8. Sachinkachure

      6 वर्षांपूर्वी

    गुगल प्ले स्टोअर वर जा आणि Government of India टाईप करा... आणि बघा किती उपयुक्त Apps सर्व सामान्य जनतेसाठी आहेत.. Umang Epfo Rail sarathi I kar यामुळे सामान्य जनतेला नक्कीच फायदा झाला आहे... स्वछता वाढली आहे... स्वचतेचा आग्रह वाढला आहे... हजारो किलोमीटरचे रस्ते तयार झाले आहेत... होत आहेत... आणि तुमच्या शेजारी हरवल्याची तक्रार पोलिसात केली का? अक्कल नसताना उगाच गळा काढून कशाला बोंबलताय?? शेअर मार्केट अत्युचावर आहे.. Income tax payer वाढले आहेत.. घरांच्या किमती कमी झाल्या आहेत... महारेरा लागू झाल्यापासून लोकांना चांगली आणि रास्त दरात घरे मिळत आहेत... पण तुम्हाला काय??? तुम्ही दोन टक्क्याचे मोदींविरोधी लेखक... फक्त पुराव्याशिवाय बोंबलायच सोडून काहीही येत नाही...

  9. justtypeashu

      6 वर्षांपूर्वी

    मस्तच

  10. vaishalichavan

      6 वर्षांपूर्वी

    मला इतक्या वर्षांत पहिल्यांदाच तंबी आवडला नाही .. याचे मलाच आश्चर्य वाटते आहे.. मी मोदीधोरणांची विरोधी असूनपण हे विशेष..

  11. Sadhana

      6 वर्षांपूर्वी

    सध्यातरी मोदींना योग्य पर्याय नाही हे आपले दुर्दैव

  12. asmitapatil

      6 वर्षांपूर्वी

    लेख आवडला, छानच आहे. मार्मिक आणि उपरोधीक. मोदी व्यवस्था बदलु पहात आहेत हे उत्तम आहेच, पण हे सर्व साधारण आणि मध्यमवर्गीय लोकांना भेडसावणारे प्रश्न आहेत तेव्हा ते ही तितकेच महत्वाचे आहेत.

  13. rajashreejoshi

      6 वर्षांपूर्वी

    लेखात मांडलेल्या गोष्टी अगदीच काही चुकीच्या नाहीत कारण सर्वसामान्य माणसाला याच गोष्टींचा सामना करावा लागतो. पण ज्यांनी 60 वर्षांपेक्षा जास्त वर्षे राज्य केलं त्यांना नाही आपण कधी जाब विचारला. एखादी गोष्ट विस्कटायला थोडा वेळ पुरतो पण घडी बसवायला त्यापेक्षा किती तरी जास्त वेळ लागतो. इथे तर 60 वर्षांची व्यवस्था बदलायची आहे

  14. ATULGODBOLE

      6 वर्षांपूर्वी

    अत्यंत बकवास लेख

  15. maheshbapat63

      6 वर्षांपूर्वी

    छिद्रान्वेषण! पंतप्रधान प्रामाणिकतेने विचारतात ही त्यांची चूक झाली म्हणायची।

  16. khadikarp

      6 वर्षांपूर्वी

    चांगला प्रयत्न. त्यांनी हेच विचारले आहे. अवश्य कळवावे.

  17. Vasant

      6 वर्षांपूर्वी

    मनिषा काळे याच्यांही अभिप्रायाशी सहमत

  18. Vasant

      6 वर्षांपूर्वी

    सुंदर

  19. Chayakishor

      6 वर्षांपूर्वी

    खूप छान. खरेच वरपर्यंत हा लेख जायला हवा.

  20. ambarishk

      6 वर्षांपूर्वी

    लेख टिकेसाठी टीका करणारा वाटतो. खांग्रेस च्या महाभ्रष्टाचारी कारभरापेक्षा भारताला बरेच असाच दिन आले आहेत. मी मनीषा काळे यांच्या प्रतिक्रियेशी सहमत आहे.

  21. asmitaph

      6 वर्षांपूर्वी

    मस्त !

  22. [email protected]

      6 वर्षांपूर्वी

    खूप छान खुसखुशीत, लक्ष्यवेधी आहे. नेहमीप्रमाणे चिमटे छान काढले आहेत. पण मनात प्रश्न पडतो की हे लेख तर आम्हीच वाचतो फारतर त्यांच्याच पक्षांतर्गत मंडळी वाचतील. ज्यांनी राग मानावयास हवा त्याच्यापर्यंत ह्या भावना पोहोचणार का? कोणीच चांगले नाहीत म्हणून आम्हीच आहोत अशी भावना प्रत्येक सत्ताधारी नेत्यांची असते. भाजपापूर्वीही होती व नंतरही राहीलच. जनतेचा अणुकुचीदार अंकूश मदमस्त सत्ताधारींवर, नोकरशहांवर रहाणार असेल तरच जन सामान्यांचे आयुष्य सुखकर होईल. तंबी दुराईंचे लेख वाचून आपल्या मनाचे मनोरंजन होते आणि आपल्या मनातील भावना व्यक्त झाल्याचे मानसिक समाधान लाभते.

  23. drvyankatesh

      6 वर्षांपूर्वी

    आत्ताच अभिप्राय लिहला मिळाला कसा नाही छान ऊपरोधीक आहे ठणठणपाळ आठवण झाली डिजिटल झाली तर पुन्हा कॅशन पेमेंट का करा हा चान्गला प्रश्न आहे अंबानीची आठवण लायटली घ्यावी उगाच मोदी अंबानीला ज्यास्त फेवर करतात असा अर्थ लावू नये असो

  24. drvyankatesh

      6 वर्षांपूर्वी

    तंबी दुराई म्हटल की सशुल्क रू 50 मध्ये असावा म्हणून काल वाचला नाही फारच विनोदी छान वाटला जयवंत दळवी ठणठणपाळ नावाने छान टोप्या आवडायचे त्यान्ची आठवण झाली सगळ डिजिटल मग रोख पैसे भरा म्हणून अंबानीची आठवण ग्रेटच नाहीतरी सध्या जीवो जोरात आहेच पण अति जाहिरातीमुळे जीवोचा वेग मंदावला हे खर

  25. Mahesh Khare

      6 वर्षांपूर्वी

    नेहमीप्रमाणेच चुरचुरीत ! तुमच्या काल्पनिक मित्र याकूबबद्दल वाचून वाईट वाटलं. आमच्या घराशेजारी खऱ्याखुऱ्या मुसलमानाचे सलून आहे. एकदम जोरात चाललं आहे. नुकतच भरपूर खर्च करून रिनोव्हेशन केलाय आणि जोरदार उद्घाटनही केलाय. बहुधा काही मुसलमानांचा बरं चाललं असावं या जुमलेबाज मोदींच्या राजवटीत. असो. मी काही मोदी समर्थक नाही. भक्त तर नाहीच नाही.

  26. manisha.kale

      6 वर्षांपूर्वी

    टीका करण सोपं आहे. आतापर्यंत पाहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी सामान्य लोकांशी इतका चांगला संवाद साधला. उज्वला योजना, स्वच्छता अभियान, बिमा योजना, strat up India अशा योजना राबवण्याचा प्रयत्न केला. आता लगेच सर्वच योजना यशस्वी नसतील झाल्या पण प्रयत्न तर दिसले. महागाई म्हणाल तर कमी होणं कठीण कारण सर्व फुकट वा कमी पैशात हवे. देशातील 125 करोड पैकी आतापर्यंत फक्त 1. 5% जनता टॅक्सपायर्स आहे. आणि त्यांच्यावर देश चालतो आहे. यावर्षी प्रथम 3%म्हणजे income tax payers झाले. म्हणजे atleast दुप्पट झाले. आहो आपल्याला एक सोसायटीची मीटिंग घेणं किती कठीण आहे ते माहित आहे. तेव्हा 125करोड लोकांचा देश चालवणं किती महा कठीण आहे ही कल्पना केलेलीच bari. मोदी आणि फडणवीस खरे कामसू लोक प्रतिनिधी आहेत पण आपल्या सारख्या व माध्यमांना प्रामाणिक लोकांचे वाव डे आहे त्याला कोण काय करणार? असो असे चांगले मुख्यामंत्री आणि पंतप्रधान deseve करत नाही हेच खरे.

  27. gondyaaalare

      6 वर्षांपूर्वी

    फार छान ! प्रत्येक शब्द खराच आहे . मोदी व्यक्तीशः दोषी नसतीलही पण जे चालू आहे ते पूर्वीच्या सरकारपेक्षा काही निराळे नाही .

  28. Sharadmani

      6 वर्षांपूर्वी

    हा उपरोधिक लेख आहे की अग्रलेख आहे?

  29. [email protected]

      6 वर्षांपूर्वी

    THIS ARTICLE IS NOT AT ALL GOOD. RUBBISH COMMENTS

  30. Dr Nagesh Tekale

      6 वर्षांपूर्वी

    Tambi is always excellent...but Iam not going to change my opinion about our PM.What India stands in world is because of him only

  31. वैशाली गुणे

      6 वर्षांपूर्वी

    हा विनोदी लेख असेल तर खाली टीप द्या आता हसा अशी !!!हा हा हा !

  32. [email protected]

      6 वर्षांपूर्वी

    I cannot my comment in Marathi? Any reason. I am using Google typing and can type with same app of face book, why not here?

  33. vyp13392

      6 वर्षांपूर्वी

    अत्यंत टुकार लेख आहे हा. धड ना राजकीय ना विनोदी !

  34. Namratadholekadu

      6 वर्षांपूर्वी

    वा सर, अत्यंत मार्मिक टिप्पणी . खूप मजा येते वाचताना पण त्याचबरोबर वस्तुस्थितीची बोचरी जाणीव देखील होते. थाळी आणि शिमला मिरची ची उपमा मनापासून आवडली. अगदी मनातलं बोललात.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen