एका मनस्वी प्रतिभावंताचे प्रयाण

पुनश्च    भानू काळे    2018-08-06 18:00:27   

लेखक- भानू काळे आपले आवडते लेखक लक्ष्मण लोंढे आता आपल्यात नाहीत. प्रकृतीच्या दृष्टीने गेले वर्ष तसे यांना वाईटच गेले. एक बायपास पूर्वीच झाली होती, आता श्वसनाला खूप त्रास होत होता, पाच मिनिटे चालले तरी धाप लागत होती. सतत रुग्णालयात जा-ये चालू होती. पण तरीही यांचे सत्तराव्या वर्षी, गुरुवार, ६ ऑगस्ट २०१५ रोजी, मुंबईत झालेले निधन मनाला खूप चटका लावून गेले. त्यांचे पहिले पुस्तक हॉन डॉट (अभिनव प्रकाशन) म्हणजे व्हिएतनाममधील अमेरिकन सैनिकांविरुद्ध सामान्य गावकऱ्यांना दिलेल्या लढ्याची उज्ज्वल कहाणी होती. हे अनुवादित पुस्तक ३५२ पानी होते. नंतरदेखील भूतकथांपासून कवितांपर्यंत आणि कादंबरीपासून नाटकांपर्यंत विविध प्रकारचे लेखन त्यांनी केले. पण तरीही कुठलीही वैज्ञानिक पार्श्वभूमी नसलेला हा प्रतिभावंत विज्ञानकथाकार म्हणूनच रसिकांना अधिक परिचित झाला. त्यांच्या प्रतिभेला तसे कुंपण घालणे, तिला सीमित करणे हा एक अन्यायच होता. ICICI ह्या वित्तसंस्थेली उत्तम कायमस्वरूपी नोकरी त्यांनी एकदा तडकाफडकी सोडली होती. संस्थेतील राजकारणाला वैतागून. कशावरूनतरी भांडण झाले आणि बॉसच्या टेबलावर राजीनामा ठेवून लोंढे संध्याकाळी सरळ घरी निघून आले. ते असे काही करतील अशी घरीदारी कोणाला कल्पनाही नव्हती. सगळ्यांनी खूप समजावल्यावर मग कसाबसा त्यांनी तो राजीनामा परत घेतला; पण अल्पकाळासाठीच. हा मनस्वीपणा त्यांचा एक स्वभावविशेष होता. पन्नाशीनंतर मात्र ते पूर्णवेळ लेखन करू लागले. दुसरा आइन्स्टाइन, नव्या शतकाच्या उंबरठ्यावर, लक्ष्मणझुला, वाळूचे गाणे, रिमोट कंट्रोल आणि वसंत पुन्हा बहरला, निसर्गलेणी वगैरे त्यांची पुस्तके वाचकांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळतील. 'सायन्स टुडे' ह्या बाळ फोंडके संपादित करत असलेल्या प्रतिष्ठ ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


भानू काळे , लक्ष्मण लोंढे , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

 1. arush

    3 वर्षांपूर्वी

  कविता खूपच भावली साधे सोपे सरळ शब्द पण परतीच्या प्रवासाला लागलेल्या माणसाच्या भावना खूप छान मांडल्या आहेत

 2. Neela Apte.

    3 वर्षांपूर्वी

  अत्यत स्तुत्य उपक्रम !! वाचन sanskruti tikun rahanyasathi upyukt hoilach shivay Vachanachi Abhiruchi nishchit vrudhhingat hovu shakel ase vatate .

 3. bookworm

    3 वर्षांपूर्वी

  कविता ह्रुद्य, दुर्गा भागवतांच्या देहोपनिषद कवितेची आठवण झाली....मनाला चटका लावून गेला हा लेख!

 4. Asmita

    3 वर्षांपूर्वी

  हृदयस्पर्शी लेख

 5. prakash

    3 वर्षांपूर्वी

  सुंदर कविता Link पुन्हा टाकतो आहे, कारण लेखातील link पुढे जात नाही. https://maitri2012.wordpress.com/2016/08/05/भेटीगाठीतून-दिसलेले-लक्ष/

 6. shailesh71

    3 वर्षांपूर्वी

  लेख छान व कविता सुद्धा मनस्वी !

 7. aradhanakulkarni

    3 वर्षांपूर्वी

  हृदयस्पर्शी लेख व काव्यही

 8. arya

    3 वर्षांपूर्वी

  सुंदर, अत्यंत प्रासादिक ,थेट हृृदयाला भिडला!

 9. वैशाली गुणे

    3 वर्षांपूर्वी

  ???सुंदर कविता

 10. Manjiri

    3 वर्षांपूर्वी

  अप्रतिम

 11. asiatic

    3 वर्षांपूर्वी

  झकास. कविता तर अप्रतिम.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen