स्वतंत्र भारताचे अधुरे स्वप्न म्हणजे अटल बिहारी वाजपेयी


काल दुपारपासून अटलबिहारींची तब्येत अतिगंभीर असल्याच्या बातम्यांमुळे पुनश्च मध्ये देखील अस्वस्थता होती. गुरुवार संध्याकाळी येणारा 'सोशल मिडीया' सदरातला लेखही आम्ही २४ तास पुढे ढकलायचा निर्णय घेतला. संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेली कटू बातमी कधीही येऊ शकेल अशी स्थिती असताना, आपला लेख समयोचित असावा अशी त्यामागची भावना होती. आणि शेवटी ती बातमी आलीच. आज पुनश्चचे एक खंदे वाचक आणि लेखक श्री. देवेंद्र राक्षे यांनी 'मैत्री २०१२ '  या ब्लॉगसाठी  अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर लिहिलेला लेख, आपण सोशल मिडीया सदरात घेतला आहे. - ********** अटलबिहारी वाजपेयी यांना पंतप्रधानपदी पाहणे हे एकच स्वप्न माझ्या वडिलांनी पहिले. ते पुरे झाले १६ मे १९९६ रोजी. केवळ १३ दिवसांचे पंतप्रधानपद, पण या अपूर्व क्षणी ‘लोकसत्ता’च्या संपादकीय पानावर एक विशेष लेख प्रसिद्ध झाला होता अटलबिहारी वाजपेयी यांच्या मुंबईतील काळबादेवी येथील सभेच्या नि त्यांच्या पहिल्यावहिल्या मुंबई भेटीचा वृत्तांत होता तो. पण त्या लेखातून व्यक्त झालेले वाजपेयी हे आधुनिक भारताच्या आदर्श नेतृत्वाचेच जणू स्वप्न होते. तो प्रसंग थोडक्यात असा – दीनदयाळ उपाध्याय यांनी एका तरुण मुलास व्याख्याता म्हणून पाठवले आहे, असे पत्र काळबादेवी स्थित यजमानांना मिळाले. ते यजमान बोरीबंदर स्थानकावर त्या तरुण मुलाला घ्यायला म्हणून आले. गाडीतून तो तरुण उतरला व दीनदयाळ उपाध्याय यांनी दिलेले पत्र व दहा रुपये त्या तरूणाने यजमानांकडे सुपूर्द केले. पत्रात यजमानांसाठी संदेश होता की ‘अटलबिहारी वाजपेयी’ या तरुणास पाठवित आहे व त्याच्या कडे गाडीचे तिकीट आणि खर्चाकरिता दहा रुपयेसुपूर्द केले आहे. यजमान थक्क झाले, छत्तीस तासांचा प्रवास या तरुणाने उपाशी पोटी केला की काय. तरुणाने ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


सोशल मिडीया , मैत्री अनुदिनी , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

 1. udayshevde

    3 वर्षांपूर्वी

  अप्रतिम लेख

 2. Bhagwat

    3 वर्षांपूर्वी

  उत्तम।

 3. vilasrose

    3 वर्षांपूर्वी

  लेख सुंदर आहे.वाजपेयींविषयी व संघाविषयी वाचायला आवडते.

 4. ajaygodbole

    3 वर्षांपूर्वी

  सुंदर लेख

 5. Sharadmani

    3 वर्षांपूर्वी

  छान लेख आहे. एकच दुरुस्ती सुचवावीशी वाटते. पांचजन्य हे हिंदी साप्ताहिक आहे इंग्रजी नाही. शरद मणी मराठे

 6. sugandhadeodhar

    3 वर्षांपूर्वी

  ?????वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen