ठणठणपाळांनीही हातोडा फेकून दिला असता!

पुनश्च    तंबी दुराई    2018-11-25 22:10:36   

मराठी साहित्याच्या क्षेत्रात आता कोणी कोणाची फिरकी घेत नाही. मराठी साहित्याच्या क्षेत्रात आता कोणी कोणावर टीका करत नाही. एकही मराठी साहित्यिक दुसऱ्या साहित्यिकाच्या प्रतिभेविषयी शंका घेत नाही. एकही मराठी साहित्यिक मीच कसा थोर आणि तो कसा चोर असं म्हणत नाही. रात्रीच्या बसण्याच्या मैफलीत एखाद्या साहित्यिकाने दुसऱ्या साहित्यिकाला, किमानपक्षी एखाद्या संपादकाला तरी हातातला मद्याचा ग्लास गेल्या कित्येक वर्षात फेकून मारलेला नाही. (याचा अर्थ कोणे एके काळी फेकून मारला होता. शोधा म्हणजे सापडेल.) कुठलाही मराठी समीक्षक कुठल्याही लेखकाचे लिखाण फालतू आहे, असं म्हणत नाही. कोणताही प्रकाशक दुसऱ्या प्रकाशकाकडे पाहून छद्मी हसत नाही. मुळात छद्मी हसायचे म्हणजे काय हेच मराठी साहित्य विश्वातले लोक विसरले आहेत. कोणत्याही कवीला कोणताही दुसरा कवी आणि त्याची कविता रद्दी वाटत नाही.

अशा सुस्त वातावरणात वर्षातून किमान एकदा तरी वादाचा धुरळा उठत असे. एकदा तरी उखाळ्या पाखाळ्या काढल्या जात, एकदा तरी कोणीतरी कोणासमोर तरी उभे ठाकत असे. एकदा तरी एखाद्याविषयी तरी कोणी तुच्छतेने बोलत असे...काय त्या श्रीपाद जोशींना आणि साहित्य महामंडळाला अवदसा आठवली आणि त्यांनी साहित्य संमेलनाध्यक्षाची निवडणूक रद्द करून त्या ऐवजी सर्वसमंतीने निवडण्याची सपक योजना आणली. साहित्य संमेलन निवडणूक म्हणजे कसा झणझणीत रस्सा होता. जोशींनी त्याचा पार वरणभात करून टाकला. विदर्भाला सगळे काही झणझणीत  लागते हा समजच त्यांनी खोटा ठरवून टाकला. त्यांचा त्रिवार निषेध. अहाहा काय ते दिवस होते, गेले ते ! साहित्याच्या क्षेत्रात सध्या तर एवढे सगळे गोड गोड वातावरण आहे की मराठी साहित्यालाच मधुमेह होतो की काय, अशी भीती वाटू लागली आहे. ‘लेखक तो दिसे ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


तंबी दुराई , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.