पण एकूण मजा आली....

पुनश्च    तंबी दुराई    2018-12-02 06:00:40   

‘जय महाराष्ट्र...’ ‘जय महाराष्ट्र!’ ‘अरे थांब थांब, 'जय महाराष्ट्र' ला उत्तर देण्याची घाई करू नकोस. आता आपल्याला जय महाराष्ट्र नंतर 'जय श्रीराम' सुध्दा म्हणायचं आहे.’ ‘हे कधी ठरलं?’ ‘कधी ते महत्वाचं नाही. ठरलं हे महत्त्वाचं. आदेश आहे.’ ‘कोण? बांदेकर? ते तर हल्ली सिद्धिविनायक मंदिरात बसतात ना?’ ‘हे बघ, एक तर मी तुला आदेश आहे म्हणजे, साहेबांचा आदेश आहे, असं सांगितलं होतं...’ ‘आदेश साहेबांचा आहे हे वेगळं सांगायची गरज नाही,आदेशची आणि साहेबांची जवळीक माहिती आहे मला.’ ‘आता काय बोलू मी? तुझी गाडी सतत भलतीकडेच वळते आहे. हे बघ, जय महाराष्ट्र नंतर जय श्रीराम सुध्दा म्हणायचं अशी ऑर्डर आहे. आता कळलं?’ ‘कळलं, कळलं.’ ‘आणि काय रे, आदेश म्हटल्यावर तू आधी बांदेकरांचं नाव घेतलंस ते ठिक आहे, पण ते सिद्धिविनायक मंदिरात ‘बसतात’ म्हणजे काय ? असतात म्हण की!’ ‘बरं, असतात तर असतात. पण असतात तेव्हा ते बसतात हे खरं की नाही?’ ‘हल्ली तू फार किस पाडतोस शब्दांचा.’ ‘शब्दांचा किस हाच तर आता आपला मुख्य अजेंडा आहे ना?  असं करू आणि तसं करू, असं आपलं म्हणत रहायचं. म्हणायला कुणाचं काय जातं? लोकांना हल्ली काही लक्षात ठेवायची सवय नाही आणि लक्षात ठेवायला सवडही नाही, ते बरं आहे. लोकांना मालिका पहायच्या असतात, फेसबुकवर अंगठे टाकायचे असतात, व्हाट्सअप ग्रूप्सवर आलेले मेसेज पहायचे असतात, सेल्फी काढायचे असतात. केवढी कामं आहेत लोकांना. पण असो. पुन्हा एकदा पूर्ण अभिवादन करतो. जय महाराष्ट्र...जय श्रीराम सुद्धा... ‘सुद्धा नाही म्हणायचं. फक्त जय श्रीराम. परत बोल...’ ‘जय महाराष्ट्र...जय श्रीराम’ ‘शाब्बास... बोल आता पुढे.’ ‘म्हटलं,एकूण आपलं मस्तच झालं, नाही का?’ ‘अ ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


विनोद , तंबी दुराई

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen