शिवचरित्राचे गाढे अभ्यासक इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे

पुनश्च    संतोष शेलार    2018-12-27 19:00:38   

आज ग. भा. मेहेंदळे यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म १९ - १२ - १९४७ चा. महाराष्ट्रात मराठा इतिहासात उग्र ज्ञानसाधना करणाऱ्या इतिहासकारांची एक मोठी परंपरा इतिहासाचार्य वि. का. राजवाडे ते ग. ह. खरे यांच्या पर्यंत आहे. आजच्या घडीला अशी ही परंपरा समर्थपणे कुणी पुढे नेत असेल तर ते म्हणजे गजानन मेहेंदळे ! शिवचरित्र हा महाराष्ट्रात भावनेचा विषय आहे. अभ्यासाचा नाही. मेहेंदळे यांनी मात्र तो विषय अभ्यासाला घेतला. त्यांनी या विषयाच्या अभ्यासाला सुरुवात केली ती सुमारे १९६९ साली. तेंव्हापासून आज पर्यंत अखंडपणे त्यांचा हा ज्ञानयज्ञ सुरु आहे. त्यातून आजवर त्यांनी दोन मराठी व एक इंग्रजी भाषेतील इतिहासग्रंथ सिद्ध केला आहे. त्यांनी मराठीत लिहिलेले शिवचरित्र दोन खंडात प्रकाशित झालं आहे. हे दोन खंड मिळून मासिक आकाराची सुमारे अडिच हजार पाने भरतात. तरीही ते शिवचरित्र अपुरे आहे. यात ते शिवकालीन इतिहास सांगत अफजलखान प्रकरणापर्यंत आले आहेत. आणि इतर काही परिशिष्ठं ! मराठीत त्यांचा अजून एक ग्रंथ प्रकाशित झाला आहे तो म्हणजे 'शिवछत्रपतींचे आरमार' ! त्यांनी इंग्रजी भाषेतूनही एक शिवचरित्र लिहिले आहे. ते सुमारे एक हजार पृष्ठांचे आहे. त्यात शिवपूर्वकाळापासून ते शिवरायांच्या मृत्युपर्यंत पूर्ण इतिहास आला आहे. काटेकोरपणा हे त्यांच्या लेखनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ! आपल्याला त्यांच्या ग्रंथात एकही विधान पुराव्याशिवाय केलेले दिसणार न ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , सोशल मिडीया , व्यक्ती विशेष , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen