पु. शि. रेगे : एक तरल प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्व

पुनश्च    रा. भि. जोशी    2019-03-09 06:00:44   

कथा, कविता आणि कांदबरी या तिनही साहित्यप्रकारातून व्यक्त झालेले पुरूषोत्तम शिवराम उर्फ पु.शि. रेगे हे मराठीतले या प्रकारचे फार दुर्मिळ उदाहरण आहे. स्त्री आणि पुरूषांना एकमेकांविषयी असलेल्या आदिम आकर्षणाचा त्यांनी या सर्व माध्यमांतून घेतलेला वेध हे मराठी साहित्यातले अक्षरलेणे आहे. सावित्री, मातृका या  कांदबऱ्या, दोला, गंधरेखा हे काव्यसंग्रह आणि मनवा सारखा कथासंग्रह रेग्यांच्या अनवट शैलीचा, मुलायम शब्दकळेचा प्रत्यय देतात. रेग्यांनी ही सौंदर्यदृष्टी प्रत्यक्ष जगण्यातही जपली होती. प्रस्तुत लेखाचे लेखक रा.भि. जोशी हे मराठी, उर्दूसह पाच भाषांचा व्यासंग असलेले समीक्षक साहित्यिक. सूक्ष्म निरीक्षणशक्ती हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य. व्यक्तिचित्रणाची त्यांची एक खास शैली होती. जोशींनी  रेगे यांचे व्यक्तिचित्र रेखाटताना, त्यातून जसे रेगे दिसून येतात तसे जोशीही प्रकटतात. साहित्यक-समीक्षक यांच्यातील स्नेहाचा आणि त्या स्नेहातून शब्दांत उतरलेल्या भावनांचा हा लेखाजोखा- ********** अंक- ललित जानेवारी १९६९ ‘‘कवि तो आहे कसा आननी?’’ हे पाहण्याची इच्छा माणसाच्या ठिकाणी स्वाभाविक असते. सर्वच ललित लेखक, पण त्यातल्या त्यात कवी हे त्यांच्या प्रतिभागुणांमुळे आणि निर्मितीमुळे इतर सर्वसामान्य माणसांपेक्षा काहीतरी वेगळे असतात हे जाणवत असते. आणि हे वेगळेपण त्यांच्या बाह्यदर्शनातही प्रतिबिंबित होत असावे अशी स्वाभाविक समजूत असते. आणि काही कवींच्या बाह्यवेषात, त्यांच्या एकंदर बोलण्या-चालण्याच्या पद्धतीत असा वेगळेपणा दिसतोही. पु.शि. रेग्यांच्या कवितेतवरून ‘कवि तो आहे कसा आननी?’ ह्याची कोणी कल्पना करू पाहील तर तो पुरताच फसेल. कारण पु. शि. रेगे हे इतर चारचौघांसारखेच दि ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ललित , भाषा , व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

  1. asmitaph

      6 वर्षांपूर्वी

    छान परिचय. सावित्रीचे लेखक एवढेच माहीत होते.

  2. arush

      6 वर्षांपूर्वी

    छान...



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen