श्री शिवरायांची विविध चित्रें


अंक : श्रीसरस्वती, श्रीशिवराज विशेषांक, १९६१ छत्रपती शिवाजीराजे भोसले हे महाराष्ट्राचे दैवत आणि प्रजेचे खरे रक्षणकर्ते. त्यांच्याबद्दलचे सार्थ प्रेम आणि अभिमान आपण हर तऱ्हेने प्रकट करतोच. परंतु त्या काळात छायाचित्रणाची कला अस्तित्वात नसल्याने शिवाजी महाराजांचे दृश्यरूप कसे असेल त्याची कल्पना मात्र आपल्याला विविध चित्रकारांनी काढलेल्या चित्रांवरुनच करावी लागते. अशा चित्रांचा, त्यांच्या सत्यासत्यतेचा धांडोळा घेणारा हा खुद्द महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदारांचा  लेख. छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे. पुनश्चच्या प्रकृतीनुसार, एका वेगळ्याच विषयाला हात घालणाऱ्या लेखाचे हे पुनःस्मरण आणि महाराजांचे  पुण्यस्मरण- ********** आपल्याकडे पुष्कळ घरांतून श्रीशिवाजीमहाराजांचे घोड्यावर बसलेले मोठ्या आकाराचे रंगीत चित्र आढळते ते राजा रविवर्म्याचे होय. काही युरोपियन ग्रंथांतून ऑर्म नांवाच्या इतिहासकाराने दिलेले आणि युरोपांतून मिळविलेले श्रीशिवाजीराजांचे चित्र प्रमाण धरून आणि त्या चित्रांतील चेहऱ्याची ठेवण जुळती ठेवून, आपल्या कल्पनेची भर घालून चित्रे तयार करून प्रसूत केली आहे. पुढे श्रीशिवाजीमहाराजांच्या चरित्राकडे लक्ष अधिकाधिक लागत गेले. त्यांच्याविषयींची भक्ती वाढत गेली तशी छत्रपतींची अनेक चित्रे लोकांपुढे आली. श्रीशिवाजीमहाराजांचे संपूर्ण चरित्र चित्रमय करून छापण्याची कल्पना मनांत आल्यावर स्वतः चित्रकार असलेले देशभक्त राजेसाहेब बाळासाह ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , श्रीसरस्वती

प्रतिक्रिया

  1. किरण भिडे

      6 वर्षांपूर्वी

    निश्चित...त्या विशेषांकात असे वेगळे भरपूर लेख मिळाले आहेत. एकेक आणूया पुनश्चवर...

  2. Lakhan

      6 वर्षांपूर्वी

    लेख आवडला. लेखकाने इच्छा व्यक्त केल्या प्रमाणे विश्वसनीय शिवचित्रांचा उत्कृष्ट संग्रह गेल्या पाच दशकांत महाराष्ट्र सरकारने अथवा शिवप्रेमींनी अथवा इतिहास संशोधकांनी काढला असल्यास त्याबद्दलची माहिती पुनश्च कडून मिळावी अशी विनंती. उपरोक्त विशेषांकात असाच माहितीपूर्ण लेख असेलच त्यामुळे इतरही लेख वाचावयास मिळवा.

  3. asiatic

      6 वर्षांपूर्वी

    अतिशय माहितीपूर्ण लेख. ऐतिहासिक साधनांचा उपयोग व सत्यतेची पडताळणी करण्याची रीतही यात आपोआप आली आहे.

  4. bookworm

      6 वर्षांपूर्वी

    वाः वाचून थक्क झालो.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen