मूर्ख माणूस!

पुनश्च    व पु काळे    2019-03-27 06:00:37   

२५ मार्च हा व.पु. काळे यांचा जन्म दिवस. आज वपु असते तर ते ८८ वर्षांचे झाले असते. खरंच? काळाच्या संदर्भात ते खरे असेलही परंतु वपुंच्या लिखाणाच्या संदर्भात आपल्याला आनंद मधल्या 'आनंद कभी मरा नही करते' या संवादाच्या धर्तीवर 'वपु कभी आऊटडेटेड हुवा नही करते' असं म्हणावं लागल. मग  ८८ हा केवळ एक आकडा ठरतो. वपुंचे लेखन बुढ्ढीके बाल सारखे जीभेवर असताना आनंद देणारे आणि काही क्षणांत विरघळून जाणारे. ते जीभेवर असण्याचा काळ नेहमी कमीच राहणार. प्रस्तुतची कथाही वपुंच्या त्याच शैलीत आणि तसाच आनंद देणारी. जीभेवर सुविचारांचा गोडवा ठेवून जाणारी... ********** “मूर्ख माणसाची गाठ पडली तर काय करावं?” हा माझा प्रश्न. “त्याला टाळावं.” “त्याला तो किती मूर्ख आहे हे पटवून द्यावं.” “मूर्ख म्हणून सोडून द्यावं.” “एक झापड मारावी.” “अशा माणसाला मुद्दाम पार्टीला बोलवावं आणि त्याच्या मूर्खासारख्या वल्गना ऐकाव्यात. म्हणजे वेगळी करमणूक लागत नाही.” प्रश्न एक. उत्तरं अनेक. सुरेश भट म्हणतात त्याप्रमाणे, ‘एक साधा प्रश्न माझा. लाख येत उत्तरे, हे खरे, की हे खरे, की हे खरे, की हे खरे.’ सगळी उत्तरे खरी असली तरी आणखी एक वेगळं उत्तर उरतंच. ते उत्तर माझं. ते माझं उत्तर म्हणून वेगळे आहे, असं मला म्हणायचं नाही. तर या सर्व उत्तरात हे उत्तर अपवादच ठरणार आहे. याचं कारण मूर्खामूर्खातही अपवाद असतात. ‘टीटी’ म्हणून एक अपवाद आहे. ‘टीटी म्हणजे त्र्यंबक टिळक.’ टीटी इतका मूर्ख माणूस मी सध्याच्या जगात पाहिला नाही. मी तो कधी भेटेल याची वाट बघतो. कारण हा मूर्ख, येडपट माणूस मला आवडतो. कोणत्या कामाच्या संदर्भात हा प्राणी मला प्रथम भेटला ते आता आठवत नाही. पण ठरवलेलं काम संपल्यावर जाता ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


कालनिर्णय , कथा

प्रतिक्रिया

  1. sumedh17

      5 वर्षांपूर्वी

    जगात सर्वानी टी टी व्हायला काय हरकत आहे ?

  2. Aaidada

      5 वर्षांपूर्वी

    वेगळी कथा असे लोक आपल्याला का नाही भेटत असे वाटले वाचून ???

  3. manisha.kale

      5 वर्षांपूर्वी

    लेख छान आहे.

  4. milindKolatkar

      6 वर्षांपूर्वी

    जरा उशीरच झालाय नाही? आणि ही कथा इतरत्र आलेली नाही? काहीही काय? क्षमस्व. पण ते लंपनच्या भाषेत ते काय म्हणतात ते, म्हणजे आपण ते काय ते वपु पुरेसे अनुभवलेले दिसत नाहीत... :-) पहा: कथा: टी टी, पृ. १२७-१३१, चिअर्स, व. पु. काळे, १९८४. मेहता, पुणे. थोपु (fb) वर दोन-तीन उत्तम ग्रुप्स आहेत. व.पु.च्या वाढदिवशी मीच 'रंगपंचमी'चा परिचय करून दिला आहे. नक्की सामील व्हा, आणि वाचा...

  5. SachinBhoir

      6 वर्षांपूर्वी

    जगातला सर्वात सुखी माणूस हा टीटी सारखाच मूर्ख असावा...!!!

  6. Pradnya2711

      6 वर्षांपूर्वी

    खूप आवडली कथा.... वपुंची खूप पुस्तकं, कथा वाचल्यात.... पण ही नव्हती वाचली. धन्यवाद

  7. rajendraparadkar

      6 वर्षांपूर्वी

    लिखाण वेगळाच आनंद देऊन गेला. एखाद्या सुवासिक फुलासारखा..

  8. patankarsushama

      6 वर्षांपूर्वी

    सुंदर लेख

  9. TNiranjan

      6 वर्षांपूर्वी

    जबरदस्त..... ह्या कालनिर्णय वाल्या साळगावकरांचे आभार मानावे तितके कमीच. अहो, काय काय साहित्य त्यांनी कालनिर्णय च्या रूपाने देउन ठेवलंय ‌. ते असो. पण तुम्ही अगदी हुडकून काढून काही ना काही चांगलं देत असता. तुमचेही मनापासून आभार....



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen