तमाशाची 'गंमत'


अंक – सत्यकथा, डिसेंबर १९७९ मनोरंजन आणि विरंगुळा ही माणसाची नेहमीच गरज राहिलेली आहे. काळानुरुप मनोरंजनाची साधने बदलतात तेव्हा जुनी साधने विस्मरणात जातात, जुन्या कला लयाला जातात. अशा कला जपून ठेवणे, त्यांचा वारसा टिकवून ठेवणे आणि इतिहासाच्या खुणा सांभाळून ठेवणे हे पुढे जिकीरीचे होते आणि मग नव्याला कवटाळत जुन्याविषयी हळहळ व्यक्त करत त्याच्या आठवणी जागवणे हा एक छंद बनतो. आज मल्टीप्लेक्सच्या काळात आपण जुन्या  एकपडदा चित्रपटगृहांविषयी बोलतो ते याच भावनेतून. तमाशा आणि त्याच्या आठवणी हा असाच एकेकाळी अनेकांसाठी आठवणींचा हळवा कोपरा होता. १९८० साली अनंतराव पाटील यांनी जागवलेल्या त्यांच्या बालपणीच्या  काळातील तमाशाच्या या आठवणी- ‘तमाशा’ या शब्दाला आमच्याकडचा भारदस्त शब्द म्हणजे ‘गंमत’. साधारणतः वडीलधारी व भारदस्त माणसे तमाशाला हा शब्द वापरायची; एरवी पोरेटोरे व खेड्यातील  मंडळी तर ‘तमाशा’च म्हणायची. साधारणतः गावच्या जत्रेला, कुणाला नवसासायासाने मूल झाले तर गावात ‘गंमत’ आणायचे. उन्हाळ्यात खळी आटपली की गावातील मंडळी पावसाच्या पहिल्या सरीपर्यंत रिकामीच. त्याच काळात गावातील जत्रा, तमाशा, लग्नकार्ये उरकली जायची. अक्षय्यतृतीयेला गावच्या भवानीची जत्रा नदीच्या वाळंवटात तीन दिवस चालायची. त्याच काळात नदीच्या वाळवंटात ‘गंमत’ उभ्या राह्यच्या. पाटलांच्या, चौधरींच्या, महाजन मंडळींच्या  शेतात असे ‘गंमती’चे फड उभे राह्यचे. त्याकरता तरुण उत्साही मंडळी फाळा (वर्गणी) गोळा करायला उत्साहाने लागायची. खेड्यात पैशांची नेहमीच वानवा. घराघरागणिक एक रुपया फाळा मिळावयाला मंडळींना तीन-तीनदा चकरा मारायला लागायच्या. साधारण पन्नासेक रुपये जमले की चांगली ‘गंमत’ पर ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


सत्यकथा , अनुभव , पुनश्च , अनंतराव पाटील

प्रतिक्रिया

  1. ajaygodbole

      5 वर्षांपूर्वी

    अप्रतिम लेख.

  2. shriramclinic

      6 वर्षांपूर्वी

    फार सुंदर लेख

  3. Nilkanthkesari

      6 वर्षांपूर्वी

    छान... अर्थातच खुप सुंदर पण तमाशातील अस्सल गावरान विनोदाची झलक अजून थोडी दाखवायला हवी होती... असो..चांगल्या लेखाबद्दल धन्यवाद

  4. amarsukruta

      6 वर्षांपूर्वी

    वाह फार मस्त

  5. gondyaaalare

      6 वर्षांपूर्वी

    अगदी हुबेहूब चित्र रेखाटले आहे . ह्या फुकट वा स्वस्तातल्या करमणुकी आता गायबच झाल्या



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen