Warning: Use of undefined constant LINKEDIN_CLIENT_ID - assumed 'LINKEDIN_CLIENT_ID' (this will throw an Error in a future version of PHP) in /home/bahuvidh/public_html/post_details.php on line 93

Warning: Use of undefined constant LINKEDIN_CALLBACK_URL - assumed 'LINKEDIN_CALLBACK_URL' (this will throw an Error in a future version of PHP) in /home/bahuvidh/public_html/post_details.php on line 93
डॉ.अमरापूरकर आणि एन्डोस्कोपी - संकलन - परवाच्या मुसळधार पावसात, प्रसिद्ध पोटविकार तज्ज्ञ, आंतरदुर्बिण तज्ज्ञ डॉ.अमरापूरकर उघड्या गटाराच्या मेनहोलमध्ये पडून वाहून गेले... एवढा किमती जीव काय गटारात वाहून जावा? असा कसा वाहून जावा? बहुविध.कॉम - निवडक, उत्तम, आशयघन व संपादित मजकुर चोखंदळ वाचकांसाठी

डॉ.अमरापूरकर आणि एन्डोस्कोपी


वर्ष दोन वर्षांपूर्वी... दक्षिण मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलात, एका वैद्यकीय परिषदेत डॉ.अमरापूरकर सांगत होते,

 "मित्रहो,आता तंत्रज्ञान अधिक पुढं गेलंय, एंडोस्कोपीच्या पुढं आलीये आता 'कॅप्सूल एन्डोस्कोपी' …म्हणजे एंडोस्कोप तोंडाद्वारे पोटापर्यंत आता सरकावण्याची गरज नाही.."

"काही एम.एम.डायमीटर असलेली एक कॅप्सूल फक्त गिळायची.. हो फक्त गिळायची... ती प्रवास करेल, अन्ननलिकेतून जठरात, जठरातून छोट्या आतड्यात, मोठ्या आतड्यात आणि थेट गुदद्वारापर्यंत..."

"मुख्य म्हणजे कॅप्सूलमध्ये असेल एक कॅमेरा, जो छायांकित करेल पोटाच्या आतलं सारं गौडबंगाल

घेईल फोटो प्रत्येक भागाचा आतून, जमवेल काही जीबी डेटा, दुसऱ्या दिवशी गुदद्वारातून बाहेर पडेपर्यंत.."

"..आपण ती कॅप्सूल विष्ठेतून मिळवायची आणि मिळवायचा इत्यंभूत डेटा जो देईल ए टू झेड निदान..."

"मित्रहो,आता येणारे दिवस कॅप्सूल एंडोस्कोपीचे आहे.. 

ऍसिडिटी असो,अपचन असो,गॅस असो.. वा असो पोटात एखादी गाठ

आतड्याचा टीबी असो वा असो मुळव्याधानं लावलेली वाट

तोंडातल्या अल्सरपासून पोटाच्या कँसरपर्यंत

साऱ्यांचाच रहस्य खोलेल ही कॅप्सूल...

येणारे दिवस असतील कॅप्सूल एंडोस्कोपीचे"

परवाच्या मुसळधार पावसात, प्रसिद्ध पोटविकार तज्ज्ञ, आंतरदुर्बिण तज्ज्ञ डॉ.अमरापूरकर उघड्या गटाराच्या मेनहोलमध्ये पडून वाहून गेले... एवढा किमती जीव काय गटारात वाहून जावा? असा कसा वाहून जावा?

डॉक्टरांनी शेवटच्या क्षणी, डोळ्यांनी टिपलं असेल सारं...

गुदमरतांना जीव पाण्यात, उघड्या डोळ्यांनी बघितलं असेल सारं सारं..

पडता पडता दिसला असेल त्यांना, खुणेचा बांबू

ज्यानं सांगितलं असेल ओरडून, "इथं उघडं गटार आहे..."

बांबूच्या टोकाला बांधलेल्या, खुणेच्या भगव्या झेंड्यानंही सांगितलं असेल, "येथे गटार उघडं आहे..."

या पंचतारांकित शहराच्या खालून वाहून जातांना त्यांनी भोगली असेल सारी सारी घुसमट

प्लास्टिक,थर्मोकोल यांच्यासह साऱ्या व्यवस्थेचा तुंबलेला गाळ

वाहत जातांना ड्रेनेज लाईनमधून त्यांनी बघितला असेल ड्रेनेज आणि ड्रिंकिंग लाईनचा समांतर प्रवास

त्यासोबत प्रवास करणारे फायबर-ऑप्टिकचे नेटवर्क

मॉल,हॉटेल,इमारती,सभागृह कॉलेज,मंदिर..अगदी सचिवालय... विधानसभा

यांच्या खालून प्रवास करतांना त्यांना कळलंच असेल, 

'पाणी कुठं कुठं मुरतंय'

छातीवर स्वप्नांचे इमले उभे करणाऱ्या, 

मुंबईच्या पोटात काय काय आहे?

हे सारं टिपलंच असेल त्यांच्या तज्ज्ञ डोळ्यांनी

कदाचित निदानच केलं असेल त्यांनी - 'मुंबई का तुंबते? शहरं का तुंबतात?

कारण ते तज्ज्ञच होते हो...

आता वरळीच्या किनाऱ्यावर सापडलेल्या, त्यांच्या मृतदेहाचं करा पोस्टमार्टम

मिळवा सारा सारा डेटा.. कारण जाता-जाता त्यांनी या शहराची एन्डोस्कोपी केलीये..

हो डॉ.अमरापूरकरांनी केलीये अगदी'कॅप्सूल एन्डोस्कोपी'... **********

- संकलन

Google Key Words -  Endoscopy Capsule , Capsule Indoscopy, Dr. Deepak Amrapurkar,Mumbai's top gastroenterologist, gastroenterology, Missing in Mumbai Flood.


प्रासंगिक , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. shripad

      2 वर्षांपूर्वी

    मनाला चटका लावून जाणारी दुःखद घटना!

  2. अनुराधा देशपांडे

      4 वर्षांपूर्वी

    Dr. नीतू मांडके आणि वैद्य माधव साने यांसारख्या जगप्रसिद्ध हृदयरोग तज्ञांवर जसा हृदयरोगाने हल्ला केला तसाच काहीसा हा दैवदुर्विलास ...वाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.