खरेदी


“झाली की १५-२० वर्षे”

“व्वा, शेवटचा कधी बाहेर काढला आठवतो का?”

“झाली असतील ४-५ वर्षे. मुलीच्या लग्नाच्या वेळी काढला होता बहुतेक”

“आता कुठे असतो.”

“माळ्यावर असेल बहुदा. हिला माहित असेल.”

“मग नेहमी लागत नाही घर वॅक्युम करायला?”

“अहो तो वापरण फार कटकट आहे हो! मी तर हिला म्हणतो मी त्यापेक्षा झाडू मारीन व पुसून घेईन.”

“पण मग घेतला कशाला?”

“अहो एक वर्ष दिवाळीत हिला पाडव्याची ओवाळणी म्हणून घातला.”

“म्हणजे तुम्ही आपण होऊन घातली ओवाळणी?”

“नाही चार महिने आधी हिच्या बहिणीकडे घेतला होता. तिनेच तो सेल्समन आमच्याकडे पाठवला. मेव्हणी म्हणाली जाळ्या जळमटे फार छान निघतात.”

“काय सांगता मग नसतील जाळ्या जळमटे तुमच्या घरात?”

“नाही हो कोणीही तो वापरायला नको म्हणत्तात. फार उस्तवार करायला लागते त्याची. सुरवातीला मुलं भांडायची तो वापरायला. मग उत्साह गेला. आता हीच मला म्हणते कधीतरी अहो तो वॅक्युम क्लीनर लावून जाळ्या काढून द्या ना.”

“मी म्हणतो तिला तूच कर. तर म्हणते कशी हे पुरुषांचं काम आहे.”

“म्हणजे तुमच्याच अंगावर पडलं म्हणायचं.”

“मी नाही म्हणतो. त्यापेक्षा कुंचा घेतो आणि स्टूल घेऊन सोयीचं होतं.”

“मेव्हणी वापरते का?”

“नाही विचारलं कधी. तिला काही विचारायची सोय नाही तिने काहीतरी नवीन घेतलेलं असतं आणि इकडे वाटतं आपल्याकडेही असावी ती वस्तू.”

“बरं आता ते जाऊन ध्यात.”

“ही व्यायामाची सायकल दिसते आहे तुमच्याकडे. करता की नाही व्यायाम.”

“नाही हो टॉवेल वाळत घालतो तिच्यावर.”

“काढूयात त्यावरचा टॉवेल? अरेच्चा टॉवेलच्या ओलीमुळे गंजून गेली आहे हो. सायकल.”

“अहो मुलांसाठी आणली पण वापरतील तर शपत.”

“बरं आणली तेव्हा मुलगा किती वर्षाचा होता.”

“होता. ५-६ वर्षांचा. अहो तेव्हा मीच वापरणार होतो. ही पण म्हणली मी पण करीन व्यायाम. पण राहूनच गेले.

“आता वापरून बघुयात का?”

“अहो त्याची चेन पण तुटली ती बसवलीच नाही.”

“बरं ते जाऊ ध्यात. हे काय आहे.”

“रोनाल्डचा फूड प्रोसेसर.”

“त्याचं काय करता. यात कणिक मळली जाते, काकडी गाजराचे काप होतात.अजून काय काय बरंच होतं.”

“अरे व्वा वहिनींना त्रास कमी झाला असेल नाही.”

“अहो आम्ही फक्त दाण्याचा कूट करतो त्यात. ही सुरवातीला वापरायची. पण पुढे म्हणायला लागली तो धुवायचा कहार होतो. त्यापेक्षा परातीत कणिक भिजवणे सुटसुटीत होते. थोडे हात दुखतात हिचे पण मिक्सरचे भांडे आणि ब्लेड धुण्यापेक्षा बरे पडते.”

“मग घेताना लक्षात आले नाही. अहो तो सेल्समन हिच्या मैत्रिणीने पाठवला तिने फार कौतुक केले मग आम्हीपण घेतला.”

“ती मैत्रीण वापरते का?”

“काय की बुवा?”

“हे बघा ही म्हटली आणा. आपलं काम पैसे देणं आहे. मी विचारत नाही का? कशाला?”

“बरं ते जाऊन ध्या. तुमचा लग्नातला सूट आहे?”

“शेवटचा कधी घातलात?”

“आमच्या लग्नात.”

“म्हणजे किती वर्षे झाली.”

“दहा.”

“मध्ये कधी घालून बघितला? पाच वर्षांपूर्वी मेव्हणीच्या लग्नात. पण बसला नाही.”

“म्हणजे तुमच्या लग्नाच्या दिवशी फक्त घातला.”

“नाही मग एकदा कंपनीत सेमिनारला घातला. बसं इतकाच.”

“काय किंमत होती? त्या काळात दहा हजार असेल.”

“मग वहिनींचा लग्नातला शालू त्या अजून वापरतात.?”

“नाही. तो शालू प्रत्येकवेळी घातला तर लोक काय म्हणतील? म्हणून प्रत्येक लग्नात नवी साडी घेते.”

“म्हणजे शालू एकदाच वापरला. होय ना?”

“म्हणजे वापरला पण ज्या लग्नात नवीन माणसे असतात तेव्हाच वापरते. ते काय आहे ना दरवेळी तोच तोच शालू वापरला तर इतर बायका हसतील असे तिला वाटते.”

“शालू आणि कोट कुठे आहेत?”

“वॉर्डरोब मध्ये.जागा अडवातायत.”

“बरं ते जाऊ ध्यात. हा क्रोकरी सेट छान आहे. कधी घेतला?”

“फार वर्षे झाली. कधी वापरले जातात?”

“एकदाच वापरला. मोलकरणीने त्यातला एक बाउल फोडला. ३६ पीस होता. आता ३५ पीस राहिलेत.”

“मग दुसरा बाउल आणायचा ना.”

“अहो तसाच मिळत नाही ना. मग ही म्हणाली मोलकरणींच्या राज्यात नकोच वापरायला.”

“मग कुणाच्या राज्यात वापरणार?”

“हो ना तो प्रश्नच आहे. ही म्हणते क्रोकरी वापरली की धुवायचे काम हिलाच करावे लागते. मोलकरिणीचा भरवसा ननाही कधी फोडतील ते. मग ही म्हणते नकोच वापरायला. आठ हजाराचा सेट पडून आहे.”

“शो केसमध्ये छान दिसतो पण.”

“हो ना आलेल्या पाहुण्यांना फार आवडतो. सगळे म्हणतात छान आहे. पण बाउल फुटल्यापासून हिचे मनच उडाले आहे.”

“बरं, अजून काय काय आहे जे वापरात नाही असे.”

“खूप, राईस कुकर आहे, ओव्हन, पोळ्या लाटायचे मशीन, कॉफी मशीन, स्युईंग मशीन अजून काय काय आहे बघायला लागेल. ”

“व्वा चालू द्यात. चला निघतो मी.”

 

उगाच हसू नका. तुमच्या घरात काही वेगळे नाही. तुम्हाला विचारले तर तुमची उत्तरे देखील हीच असणार. पण तुम्हाला सांगतो तुम्ही फार बरे. काही काही जण तर अक्खी कार घेऊन ठेवतात आणि महिन्यातून एकदा काढतात battery चार्ज करण्यासाठी. काही महाभाग सेकंड होम देखील असेच उगाच तळेगावला घेतात. काही महाभाग फार्म हाउस घेतात कोकणात आणि पाच वर्षात एकदा जातात तर रस्ताच विसरलेले असतात. प्लॉट शोधत बसतात आणि पाच वर्षांपूर्वीच्या खुणा शोधत बसतात. तुम्ही फार बरे. थोडक्यात आहे अजून. असो. येतो. चहा पुढच्या घेऊ.

लेखक- श्रीकांत कुलकर्णी 

९८५००३५०३७ 


सोशल मिडीया , श्रीकांत कुलकर्णी

प्रतिक्रिया

 1. sumitra jadhav

    3 महिन्यांपूर्वी

  खूप आवडलेले पण सोशल मीडियावर असल्याने नाहीसे झालेले लेख एकत्र करून खूप महत्वाचे काम करत आहात. लेख खूपच चांगला आहे.

 2. maheshbapat63

    4 वर्षांपूर्वी

  नेहमीचीच समस्या। मी ठरवले आहे 4 वस्तु बाहेर काढायच्या मगच नवी आवश्यक वस्तू आणायची। एका वर्षात घर खूप वाटू लागलं।

 3. किरण भिडे

    4 वर्षांपूर्वी

  धीरज जी, सोशल मिडिया सदरात असे लेख आपण archive करतो जे whatsapp/facebook वर खूप चालले. काही महिने/वर्षांनी थोडं अप्रूप वाटतं ते लेख पुन्हा बघताना...

 4. shriramclinic

    4 वर्षांपूर्वी

  हा लेख WhatsApp आणि फेसबुक वर अनंत वेळा आलाय. इथे येणं अपेक्षित नव्हते

 5. Sharadmani

    4 वर्षांपूर्वी

  मस्त लेख आहे. आजवर खरेदी या विषयात महिलांना अकारण लक्ष्य केले आहे. पण पुरुषही या विषयात काही कमी नाहीत असे माझे निरीक्षण आहे.

 6. Manjiri Vaidya

    4 वर्षांपूर्वी

  हे सगळं वाचून माझं बरंच बरं आहे असं वाटून राह्यलंय ब्बा. :) बाकी लग्नातल्या खरेदीबद्दल न बोललेलंच बरंय. मस्त लिहिलंय.

 7. anudeep

    4 वर्षांपूर्वी

  लेख छान आहे

 8. Pravin

    4 वर्षांपूर्वी

  Apratimch.khup kahi sangun , shikoun gelat.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen