fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

यशवंत आणि रेहाना

 

शिनशिनाकी बुबलाबू या गंमतीशीर सिनेमाची नायिका रेहाना, मासिकाच्या मुखपृष्ठावर.
याचं नाव विचित्र असलं तरी जुन्या सिनेमांच्या चाहत्यांना सी. रामचंद्रचं संगीत आणि ‘तुम क्या जानो तुम्हारी याद में’ सारखी अजरामर गाणी आठवत असतील.

अंक- यशवंत, १९५२

पोस्ट आवडल्यास जरूर शेअर करा. आणि व्हॉट्सअॅपवर अशा पोस्ट्स मिळवण्यासाठी 9833848849 या क्रमांकावर फक्त Hi असा व्हॉट्सअॅप मेसेज करा.

This Post Has One Comment

 1. तूम क्या जानो, तुम्हारी याद मे हम कितना रोये

  शिनशिनाकी बुबला बू ह्या सिनेमाची प्रिंट उपलब्ध नाही. पण हे गाणं साधना बोस नावाच्या नटीवर चित्रित झालं होतं. लताने हे गाणे अगदी मृदू आवजात म्हटले आहे… परछाईंया चित्रपटातील कटते है दुख मे ये दिन.. या गाण्यासारखे…

  या सिनेमाचे नाव गमतीशीर आहे..”शिनशिनाकी” या व्यक्तिरेखेचे काम रेहानाने केले होते आणि “बुबला बू,” या व्यक्तिरेखेचे काम रंजन या नटाने केले होते. याची साधारण स्टोरी अशी की रेहानच्या वडिलांचा “तैशी” नावाच्या माणसाने खून केलेला असतो. त्याचा बदला घेण्याची रेहानाचे स्वप्न असते. “तैशी” मरतो तेव्हा रेहाना त्याच्या मुलाच्या मागे लागते. रंजन हा डाकू तिच्या योजनेत सामील होतो.

  सी. रामचंद्र यांनी या सिनेमात, जाझ आणि लॅटीन अमेरिकन संगीताचा प्रयोग केला होता.

  सिनेमाला सेन्सॉरने U प्रमाणपत्र दिले होते. पण त्याच वर्षी म्हणजे १९५२ साली भारत सरकार ने Indian Cinematography Act मध्ये सुधारणा करून सेन्सॉरने पास केलेल्या प्रमाणपत्राचे पुनर्विलोकन करण्याचे अधिकार प्राप्त करून घेतले. त्याचा वापर करून सरकारने या सिनेमावर बंदी आणली त्याचे कारण असे दिले की ““The film has a low moral tone and accords glamour and heroism to criminals, treating sacred subject irreverently and it is against the interests of public decency and morality.” (या सिनेमात वाईट प्रवृत्तींचे उदात्तीकरण केले आहे.)

  संतोषी फिल्म्स या कंपनीने अपील केले आणि सिनेमावरील बंदी उठली.

  पण नुकसान व्हायचे ते होऊन गेले.

  ह्या गाण्याची जन्मकथा आगळीवेगळी आहे. गीतकार पी.एल. संतोषी हे हिंदी चित्रपट सृष्टीतील बडे प्रस्थ होते…ते या चित्रपटाची नायिका रेहानाच्या प्रेमात पडले होते… ती त्यांना दाद देईना.. एके दिवस ते तिच्या घरी गेले. ती घरी असून देखील तिच्या नोकराने ती घरी नाही असा निरोप दिला. दिवसभर संतोषी तिच्या घराबाहेर बसून होते. तरी देखील तिने दरवाजा उघडला नाही. रात्री संतोषी तिच्या घराबाहेर झोपले. सकाळी नोकराने निरोप दिला की त्या बाहेर आहेत आणि कधी येतील माहित नाही.. निराश होऊन संतोषी घरी आले आणि त्या अवस्थेत त्यांनी हे गाणे लिहिले..

Leave a Reply

Close Menu