fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

हसण्यावारी – भाग १

सध्याच्या लॉकडाउनच्या तणावाच्या काळात मनाला थोडा विरंगुळा देण्याचा पुनश्चचा प्रयत्न.

लोकसत्ताची हास्यरंग ही साप्ताहिक पुरवणी जुन्या वाचकांना आठवत असेल. त्यात श्री. मधुकर धर्मापुरीकर यांचे ‘हसण्यावारी‘ हे सदर २०११ साली प्रसिद्ध होत असे.

लेखकाने या सदरात इंग्रजी अंकांत प्रसिद्ध झालेली व्यंगचित्रे त्यांच्या अर्थासह उलगडून सांगितली आहेत.

**

 

(न्यू यॉर्कर’ मधून)

व्यंगचित्रातला हा बारमधला दिवस नक्कीच ‘ड्राय डे’ नंतरचा पहिलाच डे असणार ! कारण बारच्या सवयीच्या माणसाला एक दिवसाचासुध्दा विरह सहन होत नाही. शिवाय अस्वस्थता, तगमग, आत्मविश्वासाची कमी, जीवनव्यवहाराबद्दल उदासीनता, दु:खाची अपरिहार्यता-काय काय अनुभवातून-विचारातून-चिंतनातून तो दिवस गेलेला असतो-ड्राय डे चा ! अशा मन:स्थितीतून जेव्हा हा माणूस आणि त्याची मित्रमंडळी बारमध्ये ‘उतरतात’तेव्हा समुद्राच्या काठावरून लगबगीने उरतणारे पेंग्वीन आठवतात.

इथे असाच एक ‘पेंग्वीन’ दारातून येतो आहे-निकटचा, नेहमीचा; या सवयीमुळॆ झालेल्या जिव्हाळ्य़ाचा मित्र. आता कोरम पूर्ण झाल्याचे, त्यांच्या शर्टावरच्या स्पेलिंगची लिंक पाहून आपल्या लक्षात येते. जणू रमी झाल्याचा तो आनंद ! बारच्या नादाला लागलेल्या माणसाला, बीयरसोबत झुलायला मित्राची नितांत आवश्यकता असते आणि मग रंगतो तो सोहळा !

मधुकर धर्मापुरीकर 

This Post Has One Comment

Leave a Reply

Close Menu