fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

हसण्यावारी – भाग २

Say hallo to the nice pale face,children!

लहान मुलांना शिकविण्यापूर्वी, त्यांना नवीन संस्कारांची ओळख करून देण्यापूर्वी त्या मुलांची प्रकृती ओळखणं गरजेचं असतं. त्यांची समज किती-कितपत आहे, याचा अंदाज न घेता दिलेलं शिक्षण वाया जाण्याचीच शक्यता अधिक असते. तसं इथं झालेलं आहे, वन्य जमातीतल्या शाळेत ‘पोष्टिंग’  झालेली ही तरूण शिक्षीका पोरांची सहल घेऊन निघाली आहे. त्यांची छान रांग करून रांगेने रस्त्याच्या बाजूने ही सहल चाललेली आहे. आणि त्या सहलीला ओलंडून घोड्यावरून जाणारा तो ‘रॉबिनहूड’. शिक्षीकेने सहज-स्वाभावीक तर्‍हेने मुलांना सांगितलं आहे, ‘मुलांनो, त्या गोर्‍या तरूणाला नमस्कार करा..’

पण पोरं मुळातच डांबरट ! बाईंच्या या सुचनेपूर्वीच सगळ्यांनी त्यांच्या तर्‍हेने त्या घोडेस्वाराला तीरकमठ्याची सलामी दिली आहे की ! घोड्यावरून दौडत जाताना,कित्येकदा घोडेस्वार घोड्याच्या धावण्यामुळे उचलल्या जातो-तेवढयाच क्षणाचा खुबीने उपयोग करून या नेमबाजांनी वरच्यावर झेललं आहे की- कशाचं आलंय हॅलो !

मानवी स्वभावातला बेरकीपणा दाखविण्यासाठी व्यंगचित्राइतकं टोकदार हत्यार कोणतं नसेल !

मधुकर धर्मापुरीकर 

 

Leave a Reply

Close Menu