fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

हसण्यावारी – भाग ४

मैत्रिणीला पटवून कॉफी घ्यायला आलेला हा नायक तिच्याशी गोडीगुलाबीने बोलण्यात मश्गुल असलेला आपण पाहतो; आणि मग त्या मैत्रिणीच्या नजरेच्या रोधाने आपण खिडकीतून बाहेर पाहतो. मैत्रिणीच्या नजरेतले आश्चर्य आपल्याला क्षणभर जाणवतं आणि नजरेत भरतं, ते फूटपाथवरून जाणार्‍या त्या बाईच्या, तिच्या मुलांच्या स्वेटरकडे; मग तीच नजर पुन्हा या नायकाच्या पेहरावाकडे वळते, अन आपण म्हणून जातो- अरे चोरा !

स्वेटरचं डिझाईन सारखंच असतं,हा योगायोग आहे,असं नाही म्हणता येणार. हा ज्या तर्‍हेने लाडीगोडी करीत आहे, त्यावरून तिला आलेल्या शंकेचं खात्रीत रुपांतर व्हायचा हा पुरावाच नाही का…डोळे झाकून कॉफी प्यायला आलेला हा बोका- याचा गाफिलपणा पाहूनच आपल्याला हसू फुटतं !

मधुकर धर्मापुरीकर 

 

Leave a Reply

Close Menu