तावडे आणि मनाचं दार...


रात्री विनोद तावडे घरी आले परंतु नीट बोलले नाही, नीट जेवले नाहीत म्हणून वर्षा तावडे काळजीत होत्याच, त्यानंतर ते नीट झोपलेसुद्धा नाही. सतत या कुशीवरुन त्या कुशीवर वळत होते. वर्षा तावडे सतत विचारत होत्या, ‘काय झालं. झोप नीट न यायला? एवढ्या मोठ्या राज्यात अशा छोट्या छोट्या गोष्टी होतच असतात.’ तरीही तावडे झोपेनात तेंव्हा वर्षा तावडे उठल्या आणि कपाटाचं दार उघडून त्यांनी त्यातला ‘मनाला दार असतंच’ हा आपला कविता संग्रह काढला. ‘मी वाचते काही कविता, तू शांत झोप त्या ऐकत ऐकत..’ त्या तावडेंना म्हणाल्या  ‘बोचरी जोडव्याची तार येता विकासाच्या आड तारेलाच दे वळण मानू नकोस कधी हार’ कविता संग्रहातील या ओळी ऐकून तावडेंची झोप पारच पळाली. ‘नको गं, विकास हा शब्द सुद्धा आता मला ऐकावासा  वाटत नाही, तू झोप मनाची दारं बंद करून, माझ्यासाठी आशेचं एखादं दार उघडतं का ते पाहतो मी उद्या सकाळी.’ दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच तावडेंनी मुख्यमंत्र्यांना फोनवर गाठण्याचा प्रयत्न केला, परंतु ते नॉट रिचेबल होते. तावडे अस्वस्थ झाले, मग स्वतःशीच पुटपुटले, ' वर्षा...' आतून बायको धावत आली. ‘काय हवंय? कशाला आवाज दिलास?’ तावडे म्हणाले, ‘अगं तुला आवाज नाही दिला. म्हटलं, आपण थेट ‘वर्षा’वर जाऊनच विचारावं, सकाळी सकाळीच गाठावं त्यांना.’ लगेचच तावडे उठले आणि गाडी काढून वर्षावर पोचले. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


राजकारण

प्रतिक्रिया

 1. आदित्य लेले

    2 आठवड्या पूर्वी

  नेहमी प्रमाणे फक्त एक बाजू ठोकून काढणारा. यांना विचारावं तर सांगणार कि सत्ताधाऱ्यांवर वचक असला पाहिजे म्हणून केंद्रातल्या सरकार वर परखड लिहितो . पण महाराष्ट्रात हे नियम बदलतात , कारण इकडे यांचे बोलविते धनीच सत्तेत असतात , मग काय विरोधनकावर आगपाखड. असो. चालायचंच.

 2. atmaram jagdale

    3 आठवड्या पूर्वी

  ठिक आहे

 3. kaustubh09

    3 वर्षांपूर्वी

  मस्तच.

 4. bookworm

    3 वर्षांपूर्वी

  खमंग आणि खुसखुशीत!

 5. Shirishumre

    3 वर्षांपूर्वी

  तंबी द ग्रेट...

 6. amitvdatar

    3 वर्षांपूर्वी

  झक्कास.. एकदम मस्त..

 7. gadiyarabhay

    3 वर्षांपूर्वी

  भन्नाट. नेहमीसारखा

 8. mahapokharan

    3 वर्षांपूर्वी

  छान लेख!

 9. Meenalogale

    3 वर्षांपूर्वी

  आवडला.

 10.   3 वर्षांपूर्वी

  मस्त

 11. Pragati

    3 वर्षांपूर्वी

  छान!!

 12. Rajendra Kadu

    3 वर्षांपूर्वी

  मला बहुविध चे सभासद व्हायला आवडेलवाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen