कॅशलेस क्रांतीचा शिलेदार


तोच तोच इतिहास मुले किती दिवस वाचणार, म्हणून महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने अवांतर वाचनमालेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील पुस्तकाचा समावेश केला. विद्यार्थ्यांना वर्तमान कळावे यासाठी धडपडणारे हे सरकार, भविष्यात अवांतर वाचनमालेत नीरव मोदी या नावाचा आणखी एक मोती किंवा मणी गुंफेलच. म्हणून भविष्यातील पुस्तकांसाठीचा हा धडा आताच लिहून ठेवून, त्याला आपल्या परीने हातभार लावण्यासाठीचा हा एक प्रयत्न -: 

नीरव मोदी- कॅशलेस क्रांतीचा शिलेदार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या कल्पनेतील ‘कॅशलेस भारत’ या संकल्पनेचा सर्वात मोठा प्रणेता, सर्वात मोठा पाठीराखा, तसेच भारतीय संस्कृती आणि मुल्यांचा प्रचारक म्हणून नीरव मोदी यांचे नाव इतिहासात नोंदले गेले आहे. नीरव म्हणजे कोणताही रव अर्थात कसलाही आवाज नसलेली शुद्ध शांतता. कोणताही आवाज होऊ न देता प्रचंड मोठी रक्कम देशातून बाहेर कशी न्यावी, याबाबतचा वस्तूपाठच नीरव मोदी यांनी घालून दिला. एवढेच नव्हे तर त्यांनी ज्या बँकांमधून हे पैसे काढून नेले, त्या बँकांनासुध्दा हे पैसे नेताना आवाज आला नाही.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


तंबी दुराई , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

 1. amarpethe

    4 वर्षांपूर्वी

  वसूल

 2. vaishalichavan

    4 वर्षांपूर्वी

  बेष्टम्बेष्ट !

 3. Kiran Joshi

    4 वर्षांपूर्वी

  मस्तच! धमाल!!

 4. adityalele55

    4 वर्षांपूर्वी

  jeete raho aur likhte raho Tambi Durai ! hasun hasun bejaar !वाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर [email protected] या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.