पुतळे पडले, पळा..पळा..


लोक आपल्याला पाडत आहेत. झुंडीच्या झुंडी आपल्यावर चालून येत आहेत हे पुतळ्यांना कळलं आणि आपापल्या चौथऱ्यांसह ते आतून हलले, जागा सोडून निघाले, सुरक्षित जागा शोधू लागले. हे असं चौथरा सोबत घेऊन भटकणं शक्य नाही, गल्लीबोळांमधून वाट काढताना, लपताना चौथरा आडवा येतो, अडचणीचा ठरतो असं त्यांना वाटू लागलं. अंगापेक्षा हा बोंगाच मोठा आहे हे बऱ्याच पुतळ्यांच्या पहिल्यांदाच लक्षात आलं. काही पुतळे चौथऱ्यावर आधार देऊन उभे केले होते, त्यांनी लगेचच स्वतःला चौथऱ्यांपासून मोकळं करून घेतलं आणि स्वतंत्र झाले. काही पुतळ्यांचे पाय चौथऱ्याच्या दगडातच कोरलेले होते, त्यांना चौथऱ्यापासून वेगळं होता येत नव्हतं त्यामुळं ते करवादले होते. एखादा आजारी रूग्ण दगावल्यावर त्याचा बिछाना जसा केविलवाणा दिसतो तसे पुतळ्यांपासून स्वतंत्र झालेले चौथरे दिसत होते. एका चौथऱ्यानं तर न राहवून, गहिवरून पुतळ्याचा हात धरून त्याला थांबवण्याचाही प्रयत्न केला. "अरे नको ना जाऊस. तुझ्यामुळं माझी किंमत होती, मी एकटा असल्यावर मला कोण विचारणार?"

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


राजकारण , तंबी दुराई

प्रतिक्रिया

 1.   2 आठवड्या पूर्वी

  खूप छान लेख

 2. Rdesai

    2 वर्षांपूर्वी

  मार्मिक लेख !

 3. mugdhabhide

    4 वर्षांपूर्वी

  वैचारिक बेस बदलणार नाही aani घाई घाईत चौथऱ्यांची मात्र अदलाबदल झाली होती kiti marmik

 4. bookworm

    4 वर्षांपूर्वी

  मस्त लेख!

 5. amarpethe

    4 वर्षांपूर्वी

  छान

 6. adityalele55

    4 वर्षांपूर्वी

  नेहमी प्रमाणे दर्जेदार . तंबी दुराई तुमचे लेख हे जागतिक पातळीचे असतात . तुमच्या लेखांचं इतर भाषांमध्ये भाषांतर व्हायला पाहिजे. मराठी मधील एक हिरा जगालाही समजला पाहिजे. मनापासून इच्छा आहे अशी .

 7. milindraj09

    4 वर्षांपूर्वी

  उत्तम

 8. kamatgirish

    4 वर्षांपूर्वी

  नेहमीप्रमाणेच खुसखुशीत पण अंतर्मुख करणारा

 9. SHASHI1945

    4 वर्षांपूर्वी

  Quite juvenile.not up to Tambien Dusri standardवाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर [email protected] या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.