Warning: Use of undefined constant LINKEDIN_CLIENT_ID - assumed 'LINKEDIN_CLIENT_ID' (this will throw an Error in a future version of PHP) in /home/bahuvidh/public_html/post_details.php on line 93

Warning: Use of undefined constant LINKEDIN_CALLBACK_URL - assumed 'LINKEDIN_CALLBACK_URL' (this will throw an Error in a future version of PHP) in /home/bahuvidh/public_html/post_details.php on line 93
मंत्रालयातील उंदरांची झाडाझडती - तंबी दुराई - बहुविध.कॉम - निवडक, उत्तम, आशयघन व संपादित मजकुर चोखंदळ वाचकांसाठी

मंत्रालयातील उंदरांची झाडाझडती


मंत्रालयात ३ लाख १९ हजार ४०० उंदीर असल्याचं माहिती अधिकारात जाहीर झाल्यापासून मंत्रालयातील उदरांमध्ये खळबळ माजली होती. आपला नेमका आकडा मंत्रालयातील अधिकाऱ्यांना कोणी सांगितला, आपल्या बातम्या बाहेर कोण फोडतो यावरून हमरातुमरी सुरू होती. मुख्यमंत्र्यांच्या कक्षात राहणाऱ्या आणि त्यामुळे आपसूकच नेतृत्व करणाऱ्या गलेलठ्ठ उंदरानं दोन पायांवर उभं राहात आणि शेपटी उंचावत सगळ्यांना खडसाऊन विचारलं, ‘कोणी दिली ही अंतर्गत माहिती?’

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


तंबी दुराई , उपहास

प्रतिक्रिया

  1. राहुल सदाशिव खरात

      4 वर्षांपूर्वी

    अतिशय समर्पक आणि कालसुसंगत लेख. उंदराच्या संवादातून सरकारच्या भोंगळ कारभाराचे धिंडवडे काढण्यात लेखक यशस्वी झाला आहे. मुळात सरकारने उंदीर प्रकरणात जी काय माहिती सादर केली तीच मुळात हास्यास्पद आहे. खरेतर या प्रकरणाकडे किती लक्ष द्यायचे हे सरकार आणि विरोधी पक्ष दोघांनाही कळायला हवे होते. राज्यसमोर अनेक गंभीर प्रश्न असताना सगळ्यांनीच याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून राज्यातील जनतेचे औट घटकेचे मनोरंजन केले पण त्यामुळे राज्याची आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांची देशपातळीवर अब्रू जायची ती गेलीच. राज्याचा सामान्य प्रशासन विभाग मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत आहे तर अर्थमंत्रालय सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आहे ही दोन्ही खाती सध्या सलाईनवर आहेत . शिक्षण आणि सांस्कृतिक खाते विनोद तावडे यांच्याकडे आहे त्यांच्या कारकिर्दीत शालेय आणि उच्च शिक्षण क्षेत्रात झालेले गोंधळ अभूपूर्व असून त्यामुळे महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राचे अवमूल्यन झाले आहे. एकूणच सध्या राज्यपातळीवर शासन, प्रशासन , अर्थ आणि शिक्षण क्षेत्रात सगळंच आंनदी आनंद असून राज्य दिवळखोरीच्या वाटेवर आहे. याचे या तिन्ही मंत्र्यांना कसलेच सोयी सुतक नाही. या लेखाने उंदीर प्रकरण या तिन्ही खात्यांशी जोडून या खात्यांच्या अपयशावर प्रकाश टाकला आहे. याबाबत लेखक निश्चितच अभिनंदनास पात्र आहेवाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.