हॅपिनेस मिनिस्ट्रीसाठी काही टिप्स!


राज्यात हॅपिनेस मिनिस्ट्री अर्थात आनंद मंत्रालय किंवा आनंदासाठीचं एक वेगळं खातं स्थापन करण्यासबंधी महाराष्ट्र सरकार गंभीरपणे विचार करत आहे. राज्यातल्या सरकारचा कालावधी संपता संपता जनतेला अच्छे दिन आणण्यासाठीचं हे एक स्वागतार्ह पाऊल असून लोकांना आता आनंदी राहणं भाग पडणार आहे. आपणे एवढे प्रयत्न केले तरी लोक आनंदी दिसत नाहीत, लोकांच्या चेहऱ्यावर हास्याची एकही रेषा नाही, ते सतत महागाईविषयी तक्रारी करत असतात. खड्ड्यांविषयीचं रडगाणं गात असतात. भ्रष्टाचाराविषयी ओरडत असतात. काँग्रेसच्या साठ वर्षांचा हिशोब नंतर बघू, आधी तुमच्या चार वर्षांचा हिशोब द्या, असं म्हणत असतात. यावर आनंद मंत्रालय स्थापन करणे हा खरेच एकमेव  उपाय दिसतो आहे. सर्व महत्वाच्या खात्यांची जबाबदारी खुद्द मुख्यमंत्र्यांकडेच ठेवण्याची सध्याची पद्धत असल्याने नव्या आनंद मंत्रालयाचा कारभारही स्वतः मुख्यमंत्रीच पाहतील अशी अपेक्षा आहे. या खात्यातर्फे काय करता येईल याची सध्या चाचपणी शासकीय पातळीवर केली जात असेलच, तेव्हा त्या चाचपणीला मदत व्हावी यासाठी या काही सूचना-

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


तंबी दुराई

प्रतिक्रिया

 1. seemadighe

    5 वर्षांपूर्वी

  खूप छान

 2. vaishalichavan

    5 वर्षांपूर्वी

  भारी... ?

 3. Siddheshwar

    5 वर्षांपूर्वी

  सरकारच्या नाकर्तेपणाच उत्तमरीत्या विडंबन केले आहे,तुम्ही खूप भारी लिहिता,मला तुमचे लेख नेहमीच आवडत आले आहेत

 4. adityabapat

    5 वर्षांपूर्वी

  लेख वाचताना लागलेली तीन चार मिनिटे खूप 'आनंदा'त गेली. वाचताना जॉर्ज ऑरवेलच्या '1984' ची वारंवार आठवण झाली.

 5. Sandeep pachange

    5 वर्षांपूर्वी

  छान

 6. Nav1406

    5 वर्षांपूर्वी

  संघ आणि भीडे गुरूजी यांचा नामोल्लेख केला नाही तर बिदागी मिळत नाही हे सूज्ञास सांगणे न लगे.

 7. Manjiri

    5 वर्षांपूर्वी

  मस्त लेख

 8. maheshbapat63

    5 वर्षांपूर्वी

  विनोदी लेख होता कि काय?

 9. dhananjaynewadkar

    5 वर्षांपूर्वी

  असे काही मंत्रालय स्थापनेचा विचार सरकारचा असेल तर ,खरोखरच सरकारची कीव करावी लागेल, परंतु फक्त टीका करणे या अर्थाने लेख असेल तर तंबी दुराई यांचे इतर अनेक लेख उच्च दर्जाचे आहेत, हा अतिशय निराशाजनक, या फोरम वर फक्त दर्जेदार व माहितीयुक्त लेखांची अपेक्षा,

 10. bhushanpathak

    5 वर्षांपूर्वी

  एखाद्या बातमीच्या सखोल विचारात ना जाता, वरकरणी एकांगी मत आहे लेखकाचं। निगेटिव्ह विचार दर्शवण्याच्या पेक्षा काही चांगल वाचायला मिळेल असं वाटलं होतं। पण भ्रम निरास।। अतिशय नैराश्याग्रस्त लेख।।

 11. bhushanpathak

    5 वर्षांपूर्वी

  एकतर्फी उपरोधिक लेख। कुठल्याही गोष्टीत नेहमी काहीतरी उणीव काढण्याची नैराश्याग्रस्त सवय आहे काही लोकांना, ती नाहीच जाणार। शिवाय, लेखमागे आपले राजकीय मत लपले असल्याची दाट शंका येते।

 12. vasant deshpande

    5 वर्षांपूर्वी

  छान जमलाय(नेहमीप्रमाणे!). बोचकारे काढणारा विनोद अजिबात नाही(अर्थात नामनिर्देशित राजकीय नेत्यांना हे पटणे कठीण आहे, तरी त्यांना त्ऋतीय वर्षाच्या वर्गात घालावे म्हणजे ते आनंदी आनंद गडे म्हणत बाहेर येतील!)[email protected]

 13. Ulhas vaishampayan

    5 वर्षांपूर्वी

  सुमार दर्जा!अपेक्षाभंग झाला.

 14. avadhoot

    5 वर्षांपूर्वी

  सुंदर चिमटे

 15. avadhoot

    5 वर्षांपूर्वी

  भन्नाट

 16. Mannishalohokare

    5 वर्षांपूर्वी

  अप्रतिम ! ! ! चिमटे चापट्या आणि गुदगुल्या व्वा ! ! ! ! !

 17. Namratadholekadu

    5 वर्षांपूर्वी

  वा, खूपच छान लेख. शाब्दिक चिमटे, उपहासगर्भ शैलीने आम्हा वाचकांना आनंदी राहण्याचा एक उत्तम मार्ग मिळाला. सर्वसामान्यांच्या मनातील दुःखाला हसरी किनार देण्याचे कौशल्य आहे आपल्या लेखनात.?

 18. gondyaaalare

    5 वर्षांपूर्वी

  फार छान , किमान आजच्या आनंदी राहण्याच्या एका तासाची सोय झाली .

 19. Anjalisjoshi

    5 वर्षांपूर्वी

  छान ?

 20. Makarand

    5 वर्षांपूर्वी

  आनंदी आनंद गडे उघड्याघरी आले ××× अशातली गत पण राजकारणी इतके निब्बर आहेत की उपरोधाचे तीर ही उपयोगी ठरणार नाहीत.

 21. Jayshree

    5 वर्षांपूर्वी

  लोकांची मुस्कटदाबी करुन आनंदी ठेवण्याचा प्रयत्न ... असो बघूयात जमतंय का आपल्याला हे सोंग

 22. asiatic

    5 वर्षांपूर्वी

  मस्तच. तंबी दुराई यांच्या नेहमीच्या शैलीत ताज्या घटनांचा संदर्भ आणि घेतलेले चिमटे यामुळे मजा आलीय.

 23. ShantanuTathe

    5 वर्षांपूर्वी

  हा हा हा

 24. bookworm

    5 वर्षांपूर्वी

  आनंद पोटात माझ्या माईना..... धम्माल!

 25. Shubhada

    5 वर्षांपूर्वी

  सर्व घटनांचा उचित परामर्श. आजचा दिवसच आनंदी जाईलवाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen