मोदींच्या ‘अवतारा’वरून पेटले  प्रतिक्रियांचे युद्ध


(तंबी दुराई यांजकडून ) - भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी, ‘नरेंद्र मोदी हे विष्णूचा ११वा अवतार आहेत’ असे ट्विट केल्याने पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्यावर वारेमाप संतापलेले आहेत. वाघ यांच्यावर पक्षाकडून मोठी कारवाई होण्याची शक्यता असून, मुळात भगवान विष्णू हेच नरेंद्र मोदी यांचा ११वा अवतार असल्याची पक्षाची भूमिका असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.  या संबंधी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष श्री अमित शहा यांनी अवधूत वाघ यांच्या ट्विटशी पूर्णपणे असहमती दर्शवली. ‘वाघ यांचे हे विधान अज्ञानमूलक असून (शहा यांनी अज्ञानमूलक हाच शब्द उच्चारला का याबाबत संपादकीय विभागाने संबंधित प्रतिनिधीला वारंवार खोदून विचारले तेव्हा त्याने याबाबत अधिक बोलण्यास नकार दिला) त्यांनी हिंदू पुराणांचा नीट अभ्यास केलेला नाही, हे यावरून दिसून येते’ असे ते म्हणाले.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


उपरोध

प्रतिक्रिया

 1. Rajiv Kulkarni

    2 वर्षांपूर्वी

  परत रविवारचा लोकसत्ता... दोन फुल एक हाफ वाचतोय असे वाटते.... छान 👌👌👌👌लिहीत राहा.... आम्ही वाचन करत राहू... आपल्याच भाषेत पूर्वी तुम्ही लिहिलंय छापेंगे तो और लिखेंगे... और लिखेंगे तो और वाचेंगे 😄😄😄😄😂😂😂

 2. ulhas

    5 वर्षांपूर्वी

  तंबी तुम्ही फारच मनाला लावून घेतलेले दिसतय.Be cool man! दशावतारा नंतर पुन्हा सुरवात होते पहिल्या पासून..१४/१९ हे दोन अवतार मोदी भक्तांनी स्वतः साठी ठेवले .तिस-या (वराह)पासून कोण? हे स्वातंत्र्य लोकांना आहेच. करपशनच्या महासागरात बुडलेली व्यवस्था,बुडीत कर्ज,गटांगळ्या खाणारी अर्थव्यवस्था, ड्रँगनशी ,मगरींशी लढण्यास तयार असणारी पण रोडावून ठेवलेली संरक्षण दले ह्यावर मात करण्यास पहिले दोन अवतार लागणार. कूर्म गती शिवाय पर्याय नाही आता प्रश्न राहिला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा! भाजपच्या प्रवक्त्यास ते स्वातंत्र्य आहे असे दिसते. पुरोगाम्यांनी मनाचा मोठेपणा दाखवायला काय बरं हरकत आहे?तुमच्या व्हिसल ब्लोईंगने आता वाघांची मुस्कटदाबी झाली तर त्याची जबाबदारी घ्यावी लागेल. आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून कोणी लोकमान्यांना " तो मिशावाला टिळक म्हणतो,तर कोणी तुपट चेह-याचा फडणविस म्हणतो " हे लोक चालवून घेतातच ना? असो लिहिते रहा,आम्हालाही व्यक्त व्हायला मिळते. "श्रीकांता कमळाकांता हे छान केले...."

 3. rajashreejoshi

    5 वर्षांपूर्वी

  खुसखुशीत

 4. ashutoshk

    5 वर्षांपूर्वी

  आणि रांगा कुणाचा अवतार?किंग जॉर्ज का??

 5. arush

    5 वर्षांपूर्वी

  खुमासदार मिश्किल हास्य चेहर्‍यांवर फुलवणारा. मी मोदी समर्थक आहे पण व्यक्तिपूजा चूकच

 6. asmitaph

    5 वर्षांपूर्वी

  मस्त लेख ! नेहमीप्रमाणे !!

 7. 9322496973

    5 वर्षांपूर्वी

  झकास. विनोदी राजकारण म्हणाव की राजकारणातील विनोद म्हणाव. काही म्हणा तंदु(री) मस्तच तंदु(री) = तंबी दुराई

 8. Ranjit.dalvi

    5 वर्षांपूर्वी

  मार्मिक..

 9. adityalele55

    5 वर्षांपूर्वी

  सुधारणा : "निखील वागळे "

 10. adityalele55

    5 वर्षांपूर्वी

  हाहा ! हा अवतार वगैरे म्हणणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे . बाकी शाळेत मराठी मध्ये एक धडा होता " महापुरुषांचा पराभव ", त्याचा सारांश असा की कोणत्याही मोठ्या नेत्याचा पराभव हे त्याचे विरोधक करत नाहीत तर त्याचेच आंधळे समर्थक करत असतात. त्यावरून तरी मोदी समर्थाकांनी शिकावे आणि आपलया नेत्याला स्वतःच्या चुकीच्या विधानांमुळे आणि चुकीच्या कृत्यांमुळे होणाऱ्या परिणामांपासून वाचवावे. बाकी तंबी दुराई "कुमार केतकर ", "निखिल वाघ " वगैरे प्रवृत्तींचा कितवा अवतार आहेत हा पण संशोधनाचा विषय आहे . असो !

 11. Ajinkya17

    5 वर्षांपूर्वी

  Dear tambiji... Best article after a long time.. Every sentence has a punch. JABARDAST !!

 12. arya

    5 वर्षांपूर्वी

  खुसखुशीत . खास तंबी शैलीतला लेख...

 13. तंबी दुराई

    5 वर्षांपूर्वी

  Sure. i want to convey the same.There are other personalities in India. Thanks.

 14. Mukund Parelkar

    5 वर्षांपूर्वी

  Mr. Tanbi Durai, Please go to other subjects now. Whether the money has covered your eyes so that you can see like HORSE only BJP, Hindu. there are other personalities in India.

 15. संदीप

    5 वर्षांपूर्वी

  भंगार लेख

 16. rgaoli

    5 वर्षांपूर्वी

  मोदी हे विष्णू चे ११ वे अवतार आहे आणि राफेल हे त्यांचे वाहन आहे.

 17. shriramclinic

    5 वर्षांपूर्वी

  भारीये

 18. Ajay malwade

    5 वर्षांपूर्वी

  सुंदर ...मार्मिकवाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen