खोटाभाय अने मोटाभाय


खोटाभाय स्वतःच स्वतःसाठी चहा करत होते. त्यांनी अर्धा कप दूध आणि अर्धा कप पाणी पातेल्यात घातले. सबसिडी सरेंडर केल्याने महागात पडलेल्या गॅसची शेगडी पेटवून पातेले ठेवले. ‘पडणार’ या लोकप्रिय ब्रँडची दोन चमचे चहापत्ती  पातेल्यात घातली. तेवढ्यात बेल वाजली. चहाकडे पहावे की दार उघडायला जावे या संभ्रमात खोटाभाय पडले तेंव्हा त्यांना काही सेकंद वाटूनही गेले, किमान दार उघडण्यासाठी तरी घरी बायको असायला हवी होती. परंतु तो विचार त्यांनी लगेचच बाजूला सारला आणि ते दार उघडायला गेले. दारात मोटाभाय होते. अगदी पडेल चेहऱ्याने. खोटाभाय दारातून बाजूला होत म्हणाले, ‘आता एवढे सगळे पडले, तू आणखी चेहरा कशाला पाडतोस? ये, आत ये.’ मोटाभाय आत आले आणि सोफ्यात घुसल्यासारखे बसले किंवा बसल्यासारखे घुसले. ‘हे काय झालंय खोटाभाय?’ ‘आधी चहा पिवू, मग बोलू.’ ‘नको, मला सध्या काहीच गोड लागत नाही.’ ‘माझ्या हातचा चहा पी, मग बरं वाटेल. वाटल्यास साखर दुप्पट घालतो.’ खोटाभाय आत गेले. दूध वाढवावं की पाणी वाढवावं अशा संभ्रमात पडले, अखेर पातेल्यात पाणीच वाढवलं. उकळी आल्यावर दोन कपात चहा गाळला आणि ते कप बाहेर घेऊन आले. ‘घे, छान एक घोट घे, फ्रेश हो.’ मोटाभायनं चहाचा घोट घेतला. ‘अहाहाहाहा...खोटाभाय कधी कधी वाटतं तू चहाचाच धंदा सुरू ठेवायला हवा होता. एकदम कडक मिठी चाय. मूड बन गया.’ 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


विनोद , तंबी दुराई

प्रतिक्रिया

  1. Jayram

      4 वर्षांपूर्वी

    विनोदी ढंगाने छान मांडणीवाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen