वयम्

वयम्

शालेय वयोगटातील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, त्यांना दर्जेदार साहित्य वाचायला मिळावे, यासाठी ‘वयम्’ हे मासिक जून, २०१३ पासून प्रसिद्ध होत आहे. ‘वयम्’चे बोधवाक्य आहे- ‘वाचनातून विचार, विचारातून विकास’. ठाण्याच्या लॅबइंडिया कंपनीचे अध्यक्ष श्रीकांत बापट हे ‘वयम्’चे प्रकाशक आहेत. त्यांच्या आर्थिक पाठबळातून ‘वयम्’ सुरू झाले आहे.

‘वयम्’ च्या सल्लागार मंडळात आहेत- डॉ. अनिल काकोडकर, कुमार केतकर, डॉ. आनंद नाडकर्णी, अच्युत गोडबोले, डॉ. उदय निरगुडकर, राजीव तांबे, श्रीकांत वाड. ‘वयम्’च्या मुख्य संपादक शुभदा चौकर आहेत. ज्येष्ठ सुलेखनकार अच्युत पालव आणि नामवंत चित्रकार निलेश जाधव ‘वयम्’चे कलात्मक बाजू सांभाळतात.

वयम् नियतकालिकातील लेखसंग्रह..

Close Menu