सॉरी आणि थँक यू

वयम्    शुभदा चौकर    2019-08-05 16:05:36   

सॉरी आणि थँक यू ह्या शब्दांचा उपयोग आपण रोजच्या जीवनात बऱ्याचदा करतो.  याच  सॉरी आणि थँक यू विषयीचे हे संपादकीय- वयम् मित्रांनो, दोन बहिणी आणि त्यांचा बाबा एका सुपरमार्केटमध्ये शॉपिंगला गेलेले असतात. मोठी बहीण पुस्तकात रमलीये. धाकटी वैतागून तिच्या हातातल्या पुस्तकावर फटका मारते आणि तिचे पुस्तक खाली पडते. मोठी बहीण धाकटीला ओरडते- ‘अगं, हे काय?’ बाबाची पाठ असते. पण त्या चाणाक्ष बाबाला लक्षात येते काय झाले असेल ते. तो त्या धाकटीला सांगतो-, ‘सॉरी म्हण ताईला.’ धाकटी म्हणते- ‘मी नाही म्हणणार जा!’ बाबा परत सांगतो, ‘तिला सॉरी म्हण.’ धाकटी जाम हट्टी असते. ती तिथे फतकल मारून आडवी होते. आरडाओरडा करते, पण सॉरी म्हणायचे टाळते.’ बाबा काही संयम सोडत नाही. तो तिला परत परत समजावून सांगतो, अगदी शांतपणे. पण ही धाकटी ढिम्म! हे दृश्य बघणारी एक बाई त्या बाबाला सांगते- “एक चापटी मार तिला, म्हणजे ऐकेल.” पण बाबाचा आवाज चढत नाही. तो गुडघ्यावर बसतो आणि त्या छोटीच्या नजरेला नजर देऊन तिला समजावतो- “अगं, सॉरी म्हणणं फार सोपं असतं. हे बघ, आधी एक दीर्घ श्वास घे आणि सोड. आता ओठ उघड. घशातून उच्चार कर- सॉरी असा. की झालं काम! फार कठीण नाहीये गं हे! म्हणून बघ तर!!” ती ऐकते. त्यासरशी तिला मोकळे वाटते. मोठी बहीण आणि बाबा दोघेही तिची दिलगिरी स्वीकारतात. बाबा तिचे कौतुक करतो.  इतक्यात एक बाई मोबाइल फोनवर बोलत बोलत येते आणि बेदरकारपणे त्या तिघांच्या मधून जाताना त्या धाकटीला जोरात धक्का मारते. त्यासरशी ही धाकटी म्हणते, “हिने मला असा कसा धक्का मारला. आता तिने दिलगिरी व्यक्त केली पाहिजे.” तिचं बाबा म्हणतो, “हो गं. मी सांगतो तिला.” तो तिच्याकडे जातो. तिला समजावून सांगतो की, तू माझ्या मु ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मनसंवाद , बालसाहित्य , वयम् - संपादकीय

प्रतिक्रिया

  1. डॉ. उज्ज्वला दळवी

      5 वर्षांपूर्वी

    सुंदर झाला आहे लेख. प्रत्येक मुद्दा गोष्टिरूपाने मांडायची खुबी आवडली. तात्पर्यातून अनपेक्षितपणे वेगळाच संदेश मिळाला. सुरेख ?



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen