‘विंटर टीम’मध्ये मी!

वयम्    शुभदा चौकर    2020-03-18 16:07:44   

२०१६-१७ साली अंटार्क्टिकात जाणाऱ्या ३६व्या भारतीय संशोधन मोहिमेत माझी एक वैद्यकीय अधिकारी म्हणून निवड झाली. माझ्यासाठी हा एक अद्भुत योगायोगच म्हणावा लागेल! अंटार्क्टिकात जाणाऱ्या मोहिमेतील सदस्यांबरोबर, डॉक्टरचा समावेश असत़ोच! संशोधन केंद्रात सुमारे वर्षभर राहणाऱ्या सगळ्या सदस्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची देखभाल करण्याची जबाबदारी पूर्णपणे त्या डॉक्टरची असते. ऑक्टोबर २०१६ मध्ये एका छोट्याशा जाहिरातीने माझे लक्ष वेधले- ‘३६व्या भारतीय शास्त्रीय संशोधन मोहिमेसाठी डॉक्टरांची आवश्यकता आहे!’ डॉक्टरांच्या मुलाखती १६ नोव्हेंबर २०१६ला ‘पृथ्वी विज्ञान भवन’ (Ministry of Earth Sciences) दिल्ली येथे होत्या. मी मुलाखतीसाठी गेले. तिथे मला अनेक प्रश्न विचारण्यात आले- ‘अंटार्क्टिकाबद्दल मला काय काय माहिती आहे? तेथील हवामान, भूभाग इकडच्यापेक्षा कसे वेगळे आहेत? स्वतःच्या कामाव्यतिरिक्त इतर सदस्यांना मदत करून संशोधन केंद्राच्या इतर कामात आनंदाने सहभागी होण्याची तयारी आहे का?’  हा प्रश्न प्रत्येक सदस्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. कारण हिवाळ्यात आठ महिने या खंडाचा उर्वरित जगापासून संपर्क तुटतो. विमान किंवा जहाज येऊ-जाऊ शकत नाही; जणू काही आपली टीम अंतराळातच एखाद्या स्पेस स्टेशनवर वास्तव्य करत असते! मुलाखतीतच मला पूर्ण कल्पना देण्यात आली की, मोहीमेतील ‘मैत्री’ संशोधन केंद्रातील आयुष्य खूप खडतर असते. ह्या मोहिमेत, तेथे इतर पुरुष सदस्यांसमवेत, (माझ्याबरोबर ह्या टीममध्ये कोणीही महिला सदस्य नसल्याने मला सगळ्या पुरुष सदस्यांबरोबर जमवून घेऊन) वर्षभर राहावे लागेल! आणि हो, मध्येच परत येता येणार नाही!  कारण हिवाळ्यात सुमारे आठ महिने आमचा मुख्य भूमीशी संपर्क तुटेल! आतापर्यंत माझ्या मनाचा दृढनिश् ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अनुभव कथन , विज्ञान- तंत्रज्ञान

प्रतिक्रिया

  1. asmitaphadke

      5 वर्षांपूर्वी

    छान लेख.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen