तेही एक बरंच झालं!

वयम्    अनिल अवचट    2019-11-09 10:00:14   

‘मुलींनी आम्हांला खूप शिकवलं. वेळोवेळी त्या मत मांडायच्या, प्रतिक्रिया द्यायच्या, त्यावेळी आमचे कान आम्ही उघडे ठेवले होते. पोरांना काय कळतंय, अशा भावनेने ग्रस्त नव्हतो... तेही एक बरं झालं!’.... संवेदनशील पालकांचं मन:स्पर्शी मनोगत!... प्रत्येक पालकाला आपापल्या मनात डोकावायला लावेल असं!

काही घटना आठवतात- खूप वर्षांपूर्वी घडलेल्या आणि लिहिलेल्याही. बरं वाटतं. फार विचारपूर्वक वागत नसलो तरी बरं वागलो, जगलो. यशो मुक्ता लहान होत्या. लिहायला पाटी वापरायच्या. आम्ही त्यांच्यासाठी पेन्सिलीचा पुडाच आणून ठेवला होता.  तो आईने कपाटात ठेवला होता.  एकदा यशो म्हणाली, आयल, मला दोन पेन्सिली देना.  एक लिवायला आन् एक खायला. अजून त्या प्रसंगाचे हसू येते. आज मी त्याचे विच्छेदन करून पाहतो. ‘खायला पेन्सिल मागण्याचा संकोच नव्हता. कारण आम्हांला माहीत होतं,  ती कॅल्शियमची  कमतरता आहे आणि पेन्सिल हा कट केलेला दगडाचा तुकडा आहे.  त्यातून इन्फेक्शन जाणार नाही.  म्हणजे आमचा दृष्टिकोन वैज्ञानिकही होता आणि परंपरेला धरूनही होता.  दुसरे, पेन्सिल खायला मोकळेपणाने मागत होती. मुलींना आमची कसलीही भीती वाटत नव्हती.  किती छान, त्यांचं हे वाढण्याचं वय. त्या अनिर्बंध वाढत होत्या- कुठल्याही दडपणाशिवाय! तिसरं म्हणजे तिची भाषा बघा. अगदी आमच्यासारख्या मध्यमवर्गीय घरात खास ग्रामीण भाषा उगवलेली.  त्यांना सांभाळायला लक्ष्मी होती. तिच्याकडून पोहोचली असावी ही भाषा. शिवाय कार्पोरेशनच्या शाळेतल्या वर्गमैत्रिणी. पण लक्षीचा (आम्ही लक्ष्मीला लक्षी म्हणायचो.) परिणाम जाऊन जास्त काळाचा. तिच्या बोलण्यात ठसकाही होता. आम्ही ती भाषा मुलींच्या तोंडी येऊ नये म्हणून ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. Shubhada Vaknalli

      3 वर्षांपूर्वी

    आपण मुलांना वाढवतो असं म्हणायची पद्धत आहे; पण खरं तर तीच आपल्याला वाढवत असतात. आपल्यातला पालक घडवतात.

  2. undirwadkarsiddhesh

      5 वर्षांपूर्वी

    प्रत्येक पालकाने वाचावा असा लेख. अनिल अवचट यांच्या सहज सोप्या लेखनाने समृद्ध

  3. Jayantgune

      5 वर्षांपूर्वी

    Tear raising.

  4. mahapokharan

      5 वर्षांपूर्वी

    छान लेख!सहज पालकत्व शिकवून जातो.

  5. Meenalogale

      5 वर्षांपूर्वी

    खूप सुंदर.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen