दक्षिण ध्रुवावर झेंडावंदन


अंटार्क्टिका खंडावरील मैत्री संशोधन केंद्रात साजरा झालेला प्रजासत्ताक दिन म्हणजे तेथील वास्तव्यातील परमोच्च बिंदू ! भारतीय संशोधन मोहिमेत 'डॉक्टर' म्हणून या खंडावर जाऊन, वर्षभर राहून आलेल्या डॉ. मधुबाला चिंचाळकर यांनी आपल्यासाठी लिहिलेली ही लेखमाला-

सुमारे वर्षभरासाठी ‘मैत्री संशोधन केंद्र’ हे माझे घर आणि येथील सगळे सदस्य माझे कुटुंबीय झाले! मी अंटार्क्टिकात पोहोचले ते जानेवारी महिन्यात. तेव्हा तिथे उन्हाळा होता. आकाशात सूर्य दिवस-रात्र तळपत होता! (Midnight Sun) ही गोष्ट तर माझ्यासाठी खूपच अद्भुत होती. इकडे दिवसाची वेळ कशी ठरत असेल बरं; मला मोठं कुतूहल वाटलं! या अशा एकेक अनाकलनीय गोष्टी हळूहळू उलगडत होत्या. रेखांशानुसार एखाद्या जागेची प्रमाणवेळ ठरते. अंटार्क्टिका खंडातील कुठल्याही संशोधन केंद्राचे घड्याळ त्यानुसारच लावले जाते. ‘मैत्री’ केंद्राची वेळ आपल्या भारतातील प्रमाणवेळेच्या साडेपाच तास मागे आहे. घड्याळाच्या काट्यावर दिनचर्या आखली जाते. दिवस-रात्र लख्ख सूर्यप्रकाश असल्याने रात्री झोप लागणं जरा कठीणच.. शरमाचर ओअॅसिस या खडकाळ भागात उभारण्यात आलेल्या ‘मैत्री’ केंद्राच्या सभोवताली आहे मैलोन् मैल पसरलेली पांढरीशुभ्र बर्फाची चादर! येथे ‘विंटरींग’ सभासदांना राहण्यासाठी २५ खोल्या आहेत. लीडरची किंवा प्रमुखाची खोली व ऑफिस; तसेच दिवाणखाना, स्वयंपाकघर, जेवणासाठी टेबलखुर्च्या आहेत; शिवाय वॉशबेसिन आणि स्वच्छतागृहेही (bathrooms) आहेत. ‘मैत्री’मध्ये फक्त दोनच पदे! लीडर आणि मेंबर्स! सगळे मेंबर्स तितकेच महत्त्वाचे, कारण सुतार, वेल्डर, स्वयंपाकी, शास्त्रज्ञ, डॉक्टर.. सगळ्यांची कामं सारखीच महत्त्वाची. सगळ्यांनी आपापले काम करून एकमेकांना मदतही करायची! उन्हाळ्यात ( ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अनुभव कथन , बालसाहित्य , विज्ञान- तंत्रज्ञान

प्रतिक्रिया

  1. purnanand

      5 वर्षांपूर्वी

    सुंदर लेख ! त्याच बरोवर antarctica भेट यावर डॉ .दत्तप्रसाद दाभोलकर यांचा अक्षर दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला लेख त्याकाळातील वास्तवता दाखवणारी आहे [ स्व.राजीव गांधी पंत प्रधान असताना ] त्या पेक्षा आताचे वातावरण व वर्णन अधिक सुखावह वाटते.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen