सहल झाली गगनाची


डी. एस. हायस्कूल, सायनची मुलं शंकर महादेवन अकॅडमीमध्ये संगीत आणि गायन शिकतात. या मुलांना बेंगलोरला जाऊन कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली. मात्र त्याच वेळेला अतिवृष्टीमुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आणि रस्त्याने जाणंही  शक्य नव्हतं. अशावेळी त्यांनी विमानाने जावं अशी कल्पना पुढे आली. आणि ही मुलं बेंगलोरला जाऊन कार्यक्रम सादरसुद्धा करून आली. त्यांचा हा अनुभव आम्ही ऐकला आणि शब्दांकित केला.

डी. एस. हायस्कूल, सायन ही मुंबईतील नामवंत शाळा. या शाळेत मागच्या दोन वर्षांपासून शंकर महादेवन अकॅडमीच्या माध्यमातून इच्छुक विद्यार्थ्यांना गायन, संगीत याचं शिक्षण दिलं जातं. टाटा ट्रस्टच्या आर्थिक सहकार्याने ‘इन्स्पायर इंडिया’ अंतर्गत राबवला जाणारा हा उपक्रम देशभरातील ४०० उच्चभ्रू शाळांमध्ये राबवला जातो. मात्र यामध्ये डी एस  हायस्कूल सायन ही अशी एकमेव शाळा आहे, जिथे बहुतांश मुले कष्टकरी वर्गातील पालकांची आहेत. शंकर महादेवन अकॅडमीचा ‘संगम २०१९’ हा वार्षिक संगीत महोत्सव यावर्षी बेंगलोर येथे ११ ऑगस्टला होता. या महोत्सवात पंडित अजय चक्रवर्ती आणि कौशिकी चक्रवर्ती यांच्यासमोर गायन सादरीकरणासाठी डी. एस.  हायस्कूलच्या १८ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यामुळे आपली कला एवढ्या नामवंत गायक आणि गुरूंसमोर सादर करता येणार म्हणुन मुलं खूपच खूश होती. गाण्याचा रियाज, सराव रोज सुरू होता. बेंगलोरला जाण्यासाठी या विद्यार्थ्यांची  मुंबई ते बेंगलोर रेल्वे प्रवासाची तिकीटेसुद्धा बुक केली होती. पण मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली. रेल्वेचं वेळापत्रकसुद्धा कोलमडलं. यामुळे हा प्रवास रद्द करावा लागणार होता. ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अनुभव कथन , बालसाहित्य

प्रतिक्रिया

  1. Ranjit.dalvi

      5 वर्षांपूर्वी

    छान..लहान मुलांच्या दृष्टीने पाहण्यात वेगळीच मजा आहे

  2. bookworm

      5 वर्षांपूर्वी

    फारच छान व ह्रुद्य!!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen