फक्त गांधीजी

पुनश्च    दुर्गा भागवत    2021-07-08 14:00:03   

नुकतीच साबरमतीला गेले होते. तिथे गांधींच्या प्रार्थनास्थळाचे दर्शन घेतले. वाळू मऊ होती. सारे स्वच्छ होते. नदी वाकडी वळणे घेतलेली अशी कोरडी ठणठणीत पडली होती. पण गांधी तिथे नव्हते, म्हणून प्रार्थना नव्हती. पक्षीच बोलत होते, पण त्यांचे बोल कुणाला समजत नव्हते. नुकत्याच मी आत त्यांच्या वस्तू पाहिल्या होत्या. त्यांत एका पत्राचा लिफाफा होता. वर लिहिले होते, "महात्मा गांधी, भारत देश, जिथे असतील तिथे." ते वाचले आणि पोटात ढवळले.

"जहां हो वहां." जिथे असतील तिथे. गांधी कुठे असतील तेथे जाणारे ते पत्र त्यांच्या पर्यंत पोचले. पण आता मात्र गांधी असतील तिथे तर कुणी पोचू शकणारच नाही, पण इथेच राहिलेल्या त्यांच्या संदेशातल्या एकाही अक्षराजवळ आम्ही पोचू शकणार नाही. त्यांनी दिलेले आम्ही सारेसारे घालवून बसलो आहो. त्यांच्या-आमच्यांतले अंतर अतूट् झाले आहे. या साबरमतीच्या वाळूच्या चौकात त्यांची पावले कुठे राहिली आहेत आता? गांधी एकटेच गेले. आम्ही जगतो आहोत. स्वतःलाच स्वतःच्या कर्तृत्वाची महती पटवीत जगतो आहोत. खूप जगणार आहोत. मरतात फक्त गांधी आणि फुले.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


युगात्मा
प्रासंगिक

प्रतिक्रिया

  1. Prakash Burte

      3 महिन्यांपूर्वी

    प्रकाश बुरटे काल (28 जाने., 2024) महाराष्ट्र टाईम्स मधील दुर्गाबाई भागवत यांचा 'गांधी जिथे असतील तिथे' हा लेख आयुष्यात पहिल्यांदाच वाचला. खूप भावला. महात्मा गांधीजींवर पुन्हा एकदा वेगळ्या कोनातून प्रकाश पडल्याने मला ते खूपच छान दिसले. मूळ लेखाचे शीर्षक 'फक्त गांधीजी' असे आहे, हे कळले. दुर्गाबाईंची लेखणी खूप मऊसूत झाली आहे. आज तो लेख 'पुनश्च'वर पुन्हा वाचला. पुन्हा पहिल्या इतकाच गदगदलो आणि गहिवरलोही!

  2. Jayashree patankar

      3 वर्षांपूर्वी

    सहज सोपी शैली.या सहजतेनं गांधी जवळचे वाटतात.

  3. Rajshekhar Govilkar

      3 वर्षांपूर्वी

    ही बाजू खुपच महत्वाची होती पण दूसरी बाजू भयानकच होती

  4. Ramdas Kelkar

      3 वर्षांपूर्वी

    गांधीजी कडे पाहण्याची वेगळी दृष्टी दुर्गाबाईंच्या लेखाने नक्कीच मिळेल,सुंदर लेख

  5. Varsha Sidhaye

      3 वर्षांपूर्वी

    sundar lekh !

  6. Vrunda Jadhav

      3 वर्षांपूर्वी

    खूपच छान. गांधीजी पुन्हा आणखीन जास्त कळले. आताच्या पिढीने वाचायला हवे. इतक्या वर्षाने सुद्धा गांधीजीं च्या विरुद्ध बोलणाऱ्यांनी वाचले पाहिजे. जे सतत फाळनी ला गांधीजीना जबाबदार धरून बरळत असतात. किरण जोशी यांनी पण छान मुद्धे मांडले आहेत.

  7. Kiran Joshi

      3 वर्षांपूर्वी

    किती छान मांडले आहे दुर्गाबाईंनी.....विरोधकांनाही हेवा वाटावा असा भारतीय जनतेचा विश्वास व आशा आकांक्षा गांधीजींच्या भोवती केंद्रित झाल्या होत्या. आता गेल्यावर त्यांच्या चुका दाखवणारी मंडळी त्यावेळेचे सामाजिक, राजकीय संदर्भ समजून घेण्याची तयारी दाखवतात का? टीका करणे नेहमीच सोपे असते...पण आत्मपरीक्षण करून सत्याला सामोरे जाऊन स्वतः मध्ये बदल घडवून आणणे अवघड असते. अशा अवघड वाटेने जाणारेच महात्मा पदाला पोहोचू शकतात,दुस-यावर टीका करण्याचा अधिकार मग आपोआप प्राप्त होतो,लोक ही त्यांचे अनुसरण करू लागतात कारण त्यांनी एक आदर्श उभा केलेला असतो. बाकीच्यांना, आजच्या पिढीला त्यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen