fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

मदत पोहोचविण्याचे आव्हान – महाराष्ट्र टाईम्समहापुराचे संकट दिवसेंदिवस अक्राळविक्राळ बनत असताना सरकारी यंत्रणेच्या मर्यादा ठळकपणे समोर येत आहेत आणि त्याचबरोबर पूरग्रस्तांचा आक्रोश आणि संताप वाढत आहे. आभाळच फाटले आहे, तिथे ठिगळ कुठे आणि कसे लावणार, अशी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील परिस्थिती आहे. घरात घुसलेल्या संकटाशी लोक आपापल्या परीने सामना करीत आहेत.

स्थानिक प्रशासन, सामाजिक-राजकीय कार्यकर्ते आपापल्या यंत्रणा घेऊन मदत करीत आहेत. अवतीभवती आपल्यासाठी लढणारी, झुंजणारी माणसे पाहून संकटग्रस्त माणसांचे नीतिधैर्य वाढत असते. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील लोकही गेले आठवडाभर धैर्याने अस्मानी संकटाचा सामना करीत आहेत. परंतु सरकारी यंत्रणेने राज्यपातळीवरून ज्या तातडीने, आत्मीयतेने मदत करायला पाहिजे होती ती केल्याचे चित्र दिसले नाही. त्यामुळेच, हा असंतोष आहे.

त्यातूनच २००५च्या महापुराच्या काळात लोकांच्या मदतीसाठी धावलेल्या नेत्यांच्या आठवणी लोक काढत आहेत. एकीकडे सरकारी मर्यादा समोर येत असतानाच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा पूरपर्यटनाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने संतापाची लाट उसळली. एकीकडे शेकडो लोक मरणाच्या दाढेत असताना मंत्री हसत फोटो काढत आहेत, हे चित्र संतापजनक आहे. आधीच निष्क्रिय असलेल्या सरकारकडे अशा आभाळ कोसळण्याच्या प्रसंगात पुरेसे गांभीर्य नसल्याचे त्यामुळे समोर आले.

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

Leave a Reply

Close Menu