आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!

तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

बहुविध आणि पुनश्च विषयी विविध वृत्तपत्र/नियतकालिकात प्रसिद्ध झालेले लेख


  1. दिवाळी अंकांच्या संपादकांना ‘बहुविध’कडून मदतीचा हात
    महाराष्ट्र टाइम्स - २७ जुन, २०२०

    'करोना'ची साथ आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळं इतर अनेक क्षेत्रांसह साहित्य क्षेत्रापुढंही आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. दिवाळी अंकही यास अपवाद नाहीत. 'करोना'ने विविध प्रकारची संकटे आपल्या जगण्यापुढे उभी केली आहेत. मराठी संस्कृतीचे एक महत्त्वाचे अंग असलेल्या दिवाळी अंकांपुढेही यावेळी अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीत अनेकांनी डिजिटल स्वरूपात दिवाळी अंक प्रकाशित करण्याचे ठरवले आहे. अत्यंत मेहनतीने आकाराला येणारे हे अंक केवळ हौसेचा मामला ठरू नयेत यासाठी ' बहुविध.कॉम' या डिजिटल प्लॅटफॉर्मने मदतीचा हात पुढे केला आहे.


  1. ‘पुनश्च’ आम्ही केले, ‘बहुविध’ तुम्ही करा!
    साधना साप्ताहिक - १८ मे, २०१९

    सध्या विविध माध्यमांतून माहितीचा लोकांवर अक्षरशः भडिमार होत आहे. अगदी अमेझॉन प्राइम किंवा नेटफ्लिक्ससारख्या सशुल्क डिजिटल वाहिन्याही हवे तेवढे साहित्य दर्शकाला पुरवण्यास सज्ज आहेत. मात्र या सर्व माध्यमांमध्ये चांगले काय आहे, दर्जेदार काय आहे, कुठले साहित्य उपयुक्त आहे- हे सांगणारे कुणीच नाही. त्यामुळे यूजरचा 70 टक्के वेळ ब्राऊझ करण्यात जातो आणि प्रत्यक्षात हाताशी काहीच लागत नाही. या डिजिटल समुद्रात बुडलेल्या माणसाला कुणी तरी असा माहीतगार मित्र हवा आहे की, जो त्याला सांगेल,-मी सांगतो, तू हे वाच, तू हे ऐक, तू हे बघ. आणि नेमकं हेच क्युरेटिंगचं काम बहुविधवरील संपादक आपापल्या कॅटेगरीत करत आहेत. पुनश्चपासून सुरू झालेला हा प्रवास एका अशा बिंदूपाशी आला आहे की, जिथे आज विविध कॅटेगरींच्या 7 उपनद्या उत्पन्न झालेल्या दिसतात. पण आम्हाला अशा असंख्य उपनद्यांची शक्यताही जाणवत आहे. मग त्यांचे विषय विभिन्न असतील. ...


  1. मराठी वाङ्मयातील निवडक वेचक ‘पुनश्च’
    लोकसत्ता - २५ एप्रिल, २०१८

    वाचकांची अभिरुची वाढवणारे डिजिटल नियतकालिक आधुनिक युगातील मनोरंजन आणि माहितीच्या भडिमारात वाचन संस्कृती लोप पावण्याची भीती पुस्तकांच्या डिजिटल आवृत्त्यांनी खोटी ठरवली असून उलट या नव्या माध्यमामुळे मराठी वाङ्मयाचा परीघ विस्तारू लागला आहे. एकीकडे छापील स्वरूपाची वाङ्मयीन नियतकालिके एकेक करून बंद होत असली, तरी ‘पुनश्च’ हा त्याचा डिजिटल अवतार जगभरातील चोखंदळ मराठी वाचकांमध्ये लोकप्रिय ठरू लागला आहे. ठाण्यातील तरुण उद्योजक किरण भिडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘पुनश्च’ हे मराठीतील पहिले सशुल्क डिजिटल नियतकालिक सुरू केले असून अवघ्या सहा महिन्यात शेकडो वाचकांनी शंभर रुपये वार्षिक वर्गणी भरून साहित्य पंढरीच्या या आधुनिक वारीत सामील होणे पसंत केले आहे. ...


  1. उत्तम लेखांचा ‘पुनश्च’ अनुभव घ्या
    नवाकाळ - २० एप्रिल, २०१८

    31 मार्चला ‘पुनश्च’ सुरू करून बरोबर सहा महिने झाले. गेल्या जूनपासून या उपक्रमाची जुळवाजुळव सुरू होती. खरंतर नियतकालिक सुरू करण्याचा किडा माझ्या डोक्यात कॉलेजात असल्यापासून वळवळत होता. पण करियर, स्पर्धा परीक्षा तयारी यात तो शांत झाला. पण पूर्ण मेला नाही. धुगधुगी होती. पुढे कितीतरी वर्षांनी माधवबाग मध्ये मला ती हौस भागवायला मिळाली. तिथे आम्ही पेशंट्ससाठी ‘आरोग्यसंस्कार’ मासिक काढायचो. प्रामुख्याने आरोग्यविषयक लेख त्यात असायचे. पेशंट्स साठी पुस्तकेही प्रकाशित केली. हे सगळं 9 वर्ष सुरू होतं. त्यामुळे असं म्हणता येईल की प्रकाशन व्यवसायातील उमेदवारी माझी तिथे झाली. ...

Install on your iPad : tap and then add to homescreen