पुनश्च

वि. स. खांडेकर ते पु. लं. देशपांडे आणि विंदा करंदीकर ते व. पु. काळे, अशा असंख्य दिग्गजांच्या लेखनाची सुरुवात ही विविध मासिके किंवा नियतकालिके यातूनच झाली होती. १५० वर्षांची परंपरा असलेल्या या नियतकालिकांनी मराठी रसिकांना विपुल व उत्कृष्ट साहित्य पुरवले. त्यातील आजही कालसुसंगत असलेल्या साहित्याचे डिजिटायजेशन करून इंटरनेटवर उपलब्ध करून देण्याचा उपक्रम आहे पुनश्च.

 

आजवर दोन हजार सभासदांनी पैसे भरून ज्यांचा डिजिटल रुपात आस्वाद घेतला आहे, असे दर्जेदार लेख मोबाईलवर किंवा पीसीवर वाचायला चोखंदळ वाचकांना नक्कीच आवडतील. कथा, इतिहास, अनुभवकथन, रसास्वाद, चिंतन, राजकारण आदी २७ साहित्य प्रकार आणि तब्बल १८६८ पासून दीडशे वर्षांचा कालखंड, एवढा मोठा पट मांडून, त्यातले निवडक साहित्य वेचून, रसिकांपर्यंत पोहोचवणे हेच पुनश्चचे लक्ष्य आहे. खालील लेखांवर एक नजर जरी फिरवली तरी विषयवैविध्याचा आणि दर्जाचा अंदाज सुजाण वाचकांना येऊ शकेल.

ऑनलाईन सभासदत्व घेण्यात काही अडचण आल्यास 9152255235 किंवा 9833848849 या क्रमांकांशी संपर्क करा.

बहुविध चे सभासदत्व* घ्या.

पुनश्च

‘साष्टांग नमस्कार’ आणि आचार्य अत्रे

प्र. के. अत्रे | 17 Jun 2026

अलौकिक प्रतिभा, उपजत विनोदबुद्धी यांसोबत मराठी आणि इंग्रजी नाटककारांचे संस्कार यातून निर्माण झालेले आणि प्रचंड यशस्वी ठरलेले नाटक साष्टांग नमस्कार याची जन्मकथा लेखक आचार्य अत्रेंच्याच शब्दांत वाचा.

आमची फौजदारीनिष्ठा

पु. ग. सहस्रबुद्धे | 17 Jun 2026

आपले हित आणि काळजी दुसऱ्यांनी करावी. हक्कांसाठी लढावे मात्र कर्तव्य सोयीस्कर विसरून जावे. हाच आपला धर्म आहे का? साठ वर्षांपूर्वी या प्रश्नाचा केलेला उहापोह वाचनीय आणि मननीय आहे.

खाऱ्या पाण्यावर शेती करता येईल!

प्रा. रंगनाथ कौलगुड | 17 Jun 2026

गरज ही शोधाची जननी आहे म्हणतात. त्याप्रमाणे अथक संशोधन आणि अविरत कष्ट या जोरावर खऱ्याअर्थाने निसर्गावर विजय मिळवून खाऱ्या पाण्यावर शेती फुलवता येते हे सिद्ध करून दाखवले.

सामना

मुक्ता मनोहर | 17 Jun 2026

कनिष्ठ मध्यमवर्गाचं आर्थिक दुबळेपण, त्यातून होणारी घुसमट, तत्व आणि वास्तव यातलं प्रचंड अंतर, या सगळ्यातून शेवटी विद्रोह करण्याचं धाडस दाखवणारी तरुणी या कथेत विलक्षण रंग भरते.
Install on your iPad : tap and then add to homescreen