संपादक आहात ?

आपण जर एखाद्या नियकालिकाचे संपादक आहात किंवा होऊ इच्छिता तर आपण अगदी योग्य ठिकाणी आला आहात. बहुविध डॉट कॉम हे तुमच्यासाठीच आहे. सुमारे चार हजार वाचक प्रत्यक्षपणे आणि ५८ हजार वाचक अप्रत्यक्षपणे यात सहभागी झालेले आहेत. तुम्हीही तुमच्या वाचकांना यात सहभागी करुन घेऊन शकता.


बहुविध.कॉम काय आहे?

हे एक डिजिटल व्यासपीठ आहे ज्यावर तुम्ही तुमचे साहित्य इ-स्वरुपात होस्ट करु शकता, ( उदाहरणार्थ नियतकालिक, न्यूजलेटर, एखाद्या विशिष्ट विषयात रस असलेल्या समूहासाठीचा मजकूर वगैरे ) ते कोणी वाचावे हे ठरवू शकता. यात उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सुविधांमुळे तुम्ही तुमच्या सभासदांकडून ऑनलाईन वर्गणी घेऊ शकता. हा मजकूर टेक्स्ट, ऑडिओ अथवा व्हीडिओ असा कोणत्याही माध्यमात असू शकतो.


बहूविध.कॉम कशासाठी आहे?

साहित्य हा ‘व्यवहार’ आहे, तो कोणासाठीही आतबट्ट्याचा होऊ नये ही आमची तळमळ आहे. कारण उत्तम साहित्य, लेख निर्माण करण्यासाठी लेखकांची प्रतिभा खर्ची पडते आणि ते मिळविण्यासाठी संपादकांनाही श्रम करावे लागतात. या प्रतिभेचे मोल आणि श्रमाची किंमत देऊनच त्याचा आस्वाद घेतला जाऊ शकतो. बहुविध हे अशांसाठीचेच व्यासपीठ आहे. या व्यासपीठावरील वाचकांनीही हा विचार उचलून धरलेला आहे. कारण त्यातूनच दर्जेदार साहित्याचा प्रसार होऊ शकतो.

महाराष्ट्रात केवळ पुण्यातच ३००-४०० प्रकाशन संस्था आहेत. तसे पाहिले तर या सगळ्यांचा ‘वाचक- ग्राहक’ एकच आहे. त्यांनी एकत्र मिळून विक्रीव्यवस्थेसाठी एक कार्यालय केले तर त्याचा व्यवस्थापकीय खर्च विभागला जाईल असा विचार पुढे आला होता, पण त्यासाठी कोणी तयार झाले नाही. मात्र अशी सामुहिक व्यवस्था सर्वांसाठी सोयीची असते, हे लक्षात घेऊन आम्ही हा पुढाकार घेतला आहे. मराठीत कित्येक मासिके आहेत ज्यांना आपली इ-आवृत्ती (पीडीए नव्हे) काढावी असे वाटते, पण त्यासाठी खर्च येतो. वाचक अशा साहित्यासाठी पैसे मोजायला तयार असतात परंतु पैसे घेण्याची ऑनलाइन व्यवस्था करणेही खर्चिक असते. त्यासाठी तंत्रज्ञानात मोठी गुंतवणूक करावी लागते. (आणि बरेच वेळा हे तंत्रज्ञान समजून घेणेही कटकटीचे असते.) बहूविध.कॉम आपल्यासाठी या सर्व सोयी उपलब्ध करुन देत आहे.


बहूविध.कॉम चे फायदे काय आहेत?

सदस्य किती आहेत, ते काय वाचतात? त्यातले नियमित वाचक किती आहेत? कोण आहेत? हे सगळे आपल्यला कळू शकते. लेखावर आलेल्या प्रतिक्रिया दिसतात, त्यांना उत्तर देता येते.


बहूविध.कॉम कोणासाठी आहे?

-तुमचे एखादे नियतकालिक असेल, जे तुम्हाला इ स्वरुपात सदस्यांना सशूल्क/ मोफत द्यायचे आहे.

- तुम्हाला स्वतःची एक online community असावी असे वाटते. त्यात प्रवेश देणे, न देणे यावर नियंत्रण हवे असे वाटते, सगळ्यांशी एकाच वेळी संवाद साधावा असे वाटते. विचारांच देव घेव व्हावी असे वाटते. गरज पडल्यास या community मध्ये प्रवेश सशुल्क करता यावा असे वाटते.

थोडक्यात, साहित्य हा प्रतिभेचा असला तरीही तो व्यवहार आहे याची जाण निर्माण करणे हा आपला सर्वांचा हेतू असला पाहिजे. त्यासाठीचे हे डिजिटल पाऊल आहे.


* आपल्यालाही आपले साहित्य बहुविध डॉट कॉम वर प्रसिद्ध व्हावे असे वाटत असेल तर [email protected] वर संपर्क साधा. *

संपादकांसाठी अटी आणि शर्ती -

एक सर्वसंमत शहाणपण सांगते की आपण आपल्या वाचक/श्रोते/दर्शकांसाठी आपले साहित्य पुरवीत आहोत. त्यामुळे आपली बांधिलकी ही प्रामुख्याने आपल्या वाचक/श्रोता/दर्शकाशी आहे. तरीही आम्हाला ज्या गोष्टी अस्वीकारार्ह वाटतात त्या खाली देत आहोत. आपण बहुविध.कॉम हे तंत्र व्यासपीठ जबाबदार, निवडक आणि संपादित साहित्य प्रसृत करण्यासाठी बनवलेले आहे. त्यावरील साहित्याने समाजात आनंद पसरवणे आणि समाजाची अभिरुची उंचावणे अपेक्षित आहे. जे जे साहित्य हा अपेक्षित हेतू साध्य करणारे असेल त्याचे इथे स्वागत आहे. तरीही काही मुद्दे खाली देत आहोत ज्यांना नियतकालिकांचे चालक बांधील असतील. हे व्यासपीठ वापरताना आपण खात्री देत आहात की खालीलपैकी कोणतेही साहित्य तुमच्याकडून प्रसृत होणार नाही.

१. कोणत्याही प्रकारे copyright कायद्याचे उल्लंघन करणारे साहित्य. जसे की इमेजेस, व्हिडीओ, ऑडीओ क्लिप्स. जे वापरणार आहात त्याचे हक्क आपल्याकडे आहेत याची खात्री करून वापरा.
२. अनधिकृतपणे कोणाविषयीची माहिती ( नाव, मेल आयडी, पत्ता वगैरे ) इथे वापरली जाणार नाही.
३. भावना चेतवणारे, अश्लील साहित्य किंवा शिवराळ भाषा
४. इतरांची निंदा नालस्ती करणारे, वैयक्तिक चारित्र्यावर चिखलफेक करणारे, तसेच धमकावणारे साहित्य
५. समाजात तेढ, तिरस्कार निर्माण करणारे साहित्य
६. बेकायदेशीर कारवाया करावयास उद्युक्त करणारे किंवा अशा कारवाया सुचवणारे साहित्य
७. देश, धर्म, जात, आर्थिक स्थिती यावरून असहिष्णुता पसरवणारे साहित्य
८. अशी माहिती पुरवणारे साहित्य ज्याची सत्यासत्यता तपासून बघता येणार नाही.
९. असे कुठलेही साहित्य जे या तंत्र व्यासपीठाचे संचालक आहेत त्यांना आक्षेपार्ह वाटेल.
१०. अशा साहित्यावर बंधन आणण्याचे पूर्ण अधिकार या व्यासपीठाच्या संचालकांना आहेत.
११. सर्व नियतकालिकांचे संचालक वरील सर्व नियमांचे वाचन करून पालन करतील अशी अपेक्षा आहे. त्यांनी हे नियम जरी वाचले नसतील तरीही त्यांनी हे व्यासपीठ वापरणे म्हणजेच या नियमांशी ते बांधील आहेत हे सिद्ध होतं.

Install on your iPad : tap and then add to homescreen