भाग दुसरा - महाराष्ट्रांतील डाव्या-उजव्यांचें राजकारण


लोकांना हें कर्तव्याचरणाचे शिक्षण देणें हेंच समाजवादाचें शिक्षण होते. इंग्लंडांत बर्नार्ड शॉ, सिडने वेब, कीर हार्डी, लान्सबरी वगैरे आद्य समाजवाद्यांनी लंडनच्या, मँचेस्टरच्या कोपऱ्या-कोपर्‍यावर उभे राहून हें लोकशिक्षणाचें काम जवळजवळ पाऊणशे वर्षे सतत केलें होतें. दुसरे महायुद्ध चालू असतां हें शिक्षण इंग्लंडांत निकरानें दिलें जात होतें. काँग्रेसनें स्वातंत्र्यप्राप्ती पूर्वी या बाबतींत निर्बुद्धपणे वागून राजकीय लोकशिक्षणाचे काम कांहींहि केलें नव्हते. गांधींच्या संबंध राजकारणाचा एक दोषच असा होता की, त्या राजकारणांत बुद्धिमत्ता व विद्वत्ता यांना स्थानच नाहीं असा समज गांधींनी आपल्या अनुयायांचा करून दिलेला होता. स्वतः गांधी एकोणीसाव्या शतकांतील व त्यापूर्वीच्या ब्रिटिश राजकीय तत्त्वज्ञानातले पंडित होते. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



राजकारण

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen