स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर काँग्रेसचें विसर्जन करावें असें गांधींचे मत होतें असें मी ऐकलें आहे. मला तें वाचलेलें ओझरतें ठवते. पण काँग्रेसचें विसर्जन केल्यावर नेमके काय व्हावें याचें विवेचन गांधींनीं केलें नव्हतें अशी माझी पुसट आठवण आहे. गांधींची महत्त्वाच्या विषयांवरील सर्व मतें मला पटत नसत. खादी, ग्रामपुनर्घटना वगैरेंविषयीं गांधींच्यापेक्षां विनोबांचीं मतें अधिक शास्त्रशुद्ध आहेत. १९४१ सालीं डॉ. आंबेडकरांचा 'थॉटस् ऑन आकिस्तान' हा ग्रंथ वाचून मी फाळणीवादी झालों. तेव्हांपासून गांधींचें फाळणीविरोधी मत अखेरपर्यंत मला कधींच पटलें नाहीं. सरदार पटेल व त्याहिपेक्षां पं. नेहरू यांनीं अपवादात्मक मनोधैर्य दाखवून गांधींच्या विरोधास न जुमानतां फाळणी पत्करली. ही भारतावर खरोखर परमेश्वराची कृपा झाली.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .