अंक :अनुभव दिवाळी २०२१
अँगेला मर्केल या जर्मनीतल्या किंवा युरोपातल्याच नव्हे तर जगातल्या सर्वांत लोकप्रिय आणि कणखर नेत्या मानल्या जातात. ७५ टक्के जर्मन जनतेला त्या चान्सलरपदी रहाव्यात असं वाटत असतानाच त्या चान्सलर पदावरून पायउतार झाल्या आहेत. जर्मन जनतेची लाडकी आई असणार्या मर्केल यांच्या निवृत्तीनिमित्त..
अँगेला मर्केल यांनी १९९० साली राजकारणात प्रवेश केला. त्या काळचे चॅन्सेलर हेलमुट कोल यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतलं, तेव्हा त्यांची ओळख माझी मुलगी (माइन मेडशन) अशा शब्दात करून दिली. २०२१ साली सत्तेतून निवृत्त होत असताना जर्मन जनता त्यांना मुटी, म्हणजेच आई, अम्मा या टोपणनावाने ओळखते. मधल्या काळात राजकीय विरोधकांनी त्यांचं वर्णन संधीसाधू, साप अशा शेलक्या विशेषणांनी केलं होतं.
निष्पाप मुलगी, वत्सल आई की कावेबाज राजकारणी? मर्केल यांना समजून घेताना तारांबळ उडते.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .