प्रिय रसिक

पाॅप्युलर प्रकाशनाच्या मराठी विभागाला चाळीस वर्षं पूर्ण झाली त्या वर्षी म्हणजे १९९२ साली दसऱ्याला 'प्रिय रसिक' मासिक सुरू केलं. गेली एकोणतीस वर्षं नियमितपणे प्रिय रसिकचे अंक निघताहेत. पाॅप्युलर प्रकाशनाच्या पुस्तकांबद्दल, लेखकांबद्दल आणि पाॅप्युलरच्या नव्वद वर्षांच्या वाटचालीबद्दल रसिक वाचकांना माहिती द्यावी या उद्देशाने हे मासिक सुरू केलं आहे.

पॉप्युलर प्रकाशनाचे हे प्रसिद्ध मासिक लवकरच बहुविधवर उपलब्ध होणार आहे....

बहुविध चे सभासदत्व* घ्या.

प्रिय रसिक

देवबाभळी अनुभवताना...

मानसी जोशी | 05 Nov 2021

देवबाभळीचा प्रयोग पाहताना प्रेक्षक असे काही अलगद त्यात गुंतुत जातात, नाटक संपल्यावर जेव्हा त्यांच्याच नकळत त्यांचे अश्रू गालावर घरंगळतात तेव्हा त्यांना याचा प्रत्यय येतो. अगदी तशीच प्रक्रिया माझीही या नाटकाबाबत अभिनेत्री म्हणून घडली.

गंगाधर गाडगीळ यांची कथा: समकालीनता, नवता आणि स्त्रीरूपे

राजेंद्र नाईकवाडे | 04 Nov 2021

गाडगीळांच्या कथा वाचताना त्यातील समकालीनतेविषयी, त्यातली नवतेविषयी आणि त्यातील अभिजातपणाविषयी कोणती वैशिष्ट्ये हाती लागतात, ह्याचा शोध काही निवडक कथांच्या आधारे (गाडगीळांच्या कथा, तलावातले चांदणे इत्यादी कथासंंग्रह) घेण्याचा प्रयत्न इथे केला आहे.

रानातल्या मातीचा टिळा लावलेली कविता

ना. धों. महानोर | 03 Nov 2021

खानदेशी जीवन पद्धती, कृषीजन संस्कृतीचं महत्त्व व सौंदर्य, गीतात्मक शब्दकळा, बोली हे भक्कमपणानं, साधेपणानं पण घनगर्द असं फक्त बहिणाबाईंच्या कवितेतून दिसतं.

साहित्य अकादेमी फेलोशिप २०२०चे मानकरी भालचंद्र नेमाडे

पॉप्युलर प्रकाशन | 02 Nov 2021

मराठी भाषेतील भालचंद्र नेमाडे यांच्या आजवरच्या साहित्यिक योगदानासाठी ही फेलोशिप जाहीर करण्यात आली आहे.

कविवर्य नारायण सुर्वे

पॉप्युलर प्रकाशन | 01 Nov 2021

नारायण सुर्वे यांच्या प्रतिभेचे विविधरंगी आविष्कार ऐसा गा मी ब्रह्म, माझे विद्यापीठ, जाहीरनामा, नव्या माणसाचे आगमन या त्यांच्या संग्रहातून आजही काव्य रसिकांना कधी मंत्रमुग्ध करतात, तर कधी अस्वस्थ करतात.

सेतू : मनात झंकारणारी मधाळ स्वरांची तार

जयश्री हरि जोशी | 31 Oct 2021

पाच राजहंस माझ्या पालखीला उचलती उंच आनंदमयात’ असा ऐंद्रिय सुखाचा उत्सव कवितेतून साजरा करणारे कविवर्य वसंत बापट - विश्वनाथ वामन बापट ह्यांचं २०२१ - २२ हे जन्मशताब्दी वर्ष.

आठवणींच्या गंधरेखा

गंगाधर गाडगीळ | 30 Oct 2021

गंगाधर गाडगीळ यांनी आठवणींच्या गंधरेखा’या पुस्तकातून त्यांचा ज्या साहित्यिकांशी निकटचा संबंध आला त्यांची व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत. या लेखातील कविवर्य विंदा करंदीकर यांच्याबद्दलच्या आठवणी खास ‘प्रिय रसिक’च्या वाचकांसाठी देत आहोत.

कविता - सेतू

वसंत बापट | 29 Oct 2021

वसंत बापटांनी शब्दांत पकडलेलं शरदामधल्या पहाटेचं रूप चित्रकार पद्मा सहस्रबुद्धे यांनी तेवढ्याच कलात्मकतेने आपल्या कुंचल्याने साकारलंय.पद्मा सहस्रबुद्धे यांनी रेखाटलेल्या काही अप्रतिम सुंदर मुखपृष्ठांपैकी सेतू हे एक आहे असं म्हणता येईल.

श्रद्धांजली : जयंत पवार

डॉ. चिं. श्री. कर्वे | 28 Oct 2021

मराठी रंगभूमीवर तसेच वाङ्मयक्षेत्रात नाटककार आणि कथाकार म्हणून जयंत पवार यांची एक वेगळी ओळख होती. गिरणगावातले कष्टकरी, कामकरी जीवन त्यांनी आपल्या नाटकांतून, कथांतून मांडले.

झाडावरचा पक्षी-माणूस : विश्राम बेडेकर

अंजली कीर्तने | 27 Oct 2021

बोटीनं दूरदेशी चाललेली भावोत्कट हॅर्टा, देखणा, मनस्वी चक्रधर आणि अस्वस्थ वातावरणात फुललेली त्यांची ही झपाटणारी विफल प्रेमकहाणी. तेव्हा आवडली होती हॅर्टा. मला वाटे चक्रधर म्हणजे बेडेकरच. मी ठरवलं होतं, मोठं झाल्यावर लेखकाला जाब विचारायचा, “तुम्ही हॅर्टाशी इतक्या कठोरपणे का वागलात?’’

देवबाभळी नाट्यसंहितेला साहित्य अकादेमी युवा पुरस्कार!

पॉप्युलर प्रकाशन | 26 Oct 2021

"हे नाटक नाही.हा एक साक्षात्कार आहे. नाटककाराने, दिग्दर्शकाने, गीतकाराने, कलावंतांनी, प्रकाशयोजनाकाराने, संगीतकाराने आणि निर्मात्याने घडवलेला इंद्रायणीकाठी नेणारा! इतके निर्मळ, सोज्वळ, उत्कट, आणि लयकारी नाटक गेल्या दशकात दुसरे झाले नाही! या नाटकाने माझे आयुष्य वाढवले.

दृश्यकला

गुलाम मोहम्मद शेख | 29 Aug 2021

सुप्रसिद्ध चित्रकार गुलाम मोहम्मद शेख यांनी संपादित केलेल्या दृश्यकला या ग्रंथाला जागतिक कीर्तीचे चित्रकार पद्मविभूषण के. जी. सुब्रमणियन यांचे आशीर्वाद लाभले आहेत.

साडेतीन दशकांचा समृद्ध सहवास

संगीता बापट | 25 Aug 2021

कविवर्य वसंत बापट यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात २५ जुलै २०२१ या दिवशी होते आहे.या निमित्ताने त्या काळातल्या आठवणी जागवण्याचा हा प्रयत्न आहे.

नाट्यवेडा व्हायरस : शेखर ताम्हाणे

संपदा जोगळेकर- कुलकर्णी | 05 Jul 2021

मिश्किलपणा हा शेखरदादांचा जगण्याचाच स्थायीभाव होता.तालमींना वातावरण हलकं करण्याची जणू त्यांची जबाबदारी होती. अतिशय प्रासंगिक विनोद करून स्वत:चं पोट गदगदा हलेस्तोवर हसण्याची सवय त्यांना होती.

सूर्याची पिल्ले : एक विनोदी नाटक

प्रतिमा कुलकर्णी | 03 Jul 2021

मी फार मोजकीच नाटकं केली आहेत. तरीही, मी केलेल्या नाटकांपैकी सूर्याची पिल्ले हे आजच्या घडीला तरी माझं सर्वात लाडकं नाटक आहे.

चाळीस वर्षांपूर्वी

प्रतिभा मतकरी | 02 Jul 2021

लोककथा’ ७८चा नेमका फॉर्म त्याला बरेच दिवस सापडत नव्हता - तरीही त्यातून रंगभूमीवर नवीन काय काय करून पाहता येईल, याच्या शक्यता तो चाचपून पाहतच होता.
Install on your iPad : tap and then add to homescreen