महा अनुभव दिवाळी २०२१

महा अनुभव, दिवाळी २०२१ (युनिक फीचर्स)

मुख्य संपादक : सुहास कुलकर्णी

प्रकाशक : आनंद अवधानी

संपादक : गौरी कानेटकर 

सहायक संपादक : प्रीति छत्रे

सहयोगी संपादक : नंदकुमार मोरे, अन्वर हुसेन, डॉ. शंतनू अभ्यंकर 

मुखपृष्ठ : सुभाष अवचट

 

बहुविध चे सभासदत्व* घ्या.

महा अनुभव दिवाळी २०२१

उग्ररूपा

मुकुंद कुळे | 23 Nov 2021

आईने लहानपणी मला सांगितलेली शंकर-पार्वतीची ही गोष्ट. ती ऐकून कसलं भारी वाटलं होतं मला. त्यानंतर अनेक दिवस माझ्या डोळ्यांसमोर एकच चित्र उभं राहायचं- पार्वतीने आपल्या पंजात वाघाचं मुंडकं पकडलंय आणि ते ती जमिनीवर घासतेय.. आईने सांगितलेल्या त्या कथेचा प्रभाव माझ्या मनावरून कधीच पुसला गेला नाही.

निर्भय वायर

नितीन ब्रह्मे | 23 Nov 2021

कॉर्पोरेट आणि सत्ताधारी या दोघांच्याही नियंत्रणापासून मुक्त, फक्त वाचकांप्रती जबाबदारी मानणारं समांतर आणि परिणामकारक माध्यम आजही उभं राहू शकतं, हे ‘द वायर’ या न्यूज पोर्टलने सिद्ध करून दाखवलं आहे. पत्रकारितेतली नवी वाट चालणार्‍या या प्रयोगाची गोष्ट.

बाय बाय : अँगेला मर्केल

निळू दामले | 22 Nov 2021

अँगेला मर्केल या जर्मनीतल्या किंवा युरोपातल्याच नव्हे तर जगातल्या सर्वांत लोकप्रिय आणि कणखर नेत्या मानल्या जातात. ७५ टक्के जर्मन जनतेला त्या चान्सलरपदी रहाव्यात असं वाटत असतानाच त्या चान्सलर पदावरून पायउतार झाल्या आहेत. जर्मन जनतेची लाडकी आई असणार्‍या मर्केल यांच्या निवृत्तीनिमित्त..

मधमाशा पाहाव्या पाळून..

सुचिता पडळकर | 22 Nov 2021

मधमाशा म्हणजे कीटकांच्या दुनियेतील कुतूहलाचा खजिना. त्यांच्याबद्दलचं ज्ञान मिळावं, त्यांचा स्नेह मिळावा यासाठी केलेल्या धडपडीची ही गोष्ट.

गंगोचं पोर

भीष्म साहनी | 21 Nov 2021

मागील तीन दिवसांपासून काळे निळे ढग आकाशात दिसत होते. त्यांच्या छायेत उष्णतेने आळसावलेली पृथ्वी आपले पहिले उच्छ्वास सोडत होती. आणि शहरभरातील मुलं आणि वृद्ध पहिल्या पावसाचा आनंद लुटण्यासाठी उतावीळ झाले होते. हा दिवस नोकरीवरून काढलं जाण्याचा नव्हता

पॉपअप

मेघश्री दळवी | 21 Nov 2021

आता हा पॉपअपचा खेळ मला मनापासून आवडायला लागला होता. घरी असताना का नाही आला तो? सही टाइमपास झाला असता. बाकीचे गेम्स फिके पडले असते याच्यापुढे. हळूच आजूबाजूला बघत मी पर्याय निवडला इन्सब्रुक. होऊन जाऊदे मस्त स्कीइंग शिवानीबरोबर...

जन्मरहस्याची जन्मकहाणी

डॉ. शंतनु अभ्यंकर | 20 Nov 2021

मानवी जीव कसा फळतो, नेमका कुणामुळे फळतो आणि आईच्या गर्भात तो कसा वाढतो याचं कोडं मानवाला आदिम काळापासून पडलेलं आहे. इसवीसनापूर्वीपासून त्या त्या काळातले शास्त्रज्ञ, त्या काळातल्या ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने ते कोडं उलगडण्याचा प्रयत्न करत आले आहेत. त्या प्रयत्नांची ही सुरस कहाणी.

पॉल सॅलोपेक: मानवाच्या पाऊलखुणांवरून चालताना

प्रीति छत्रे | 20 Nov 2021

एक गोष्टीवेल्हाळ पत्रकार एका दीर्घ पायी प्रवासाला निघाला आहे. अश्मयुगीन मानवाच्या स्थलांतराचं मर्म त्याला जाणून घ्यायचं आहे. त्याच्यासमोर कोणतं जग उलगडतं आहे? एका ध्यासाची ही न संपलेली विलक्षण गोष्ट.

कथा : रन आऊट

प्रदीप चंपानेरकर | 18 Nov 2021

कुठे तरी अनोळखी प्रदेशात मी.. धूसर वातावरण. कुणीतरी मला हाका मारत होतं. आवाज तर संदीपचा होता. मागे वळून पाहिलं, तर संदीपच होता. पन्नास वर्षांपूर्वी हे जग सोडून गेलेला माझा भाऊ मला म्हणत होता,

सेल्फ पोर्ट्रेट्स नावाची प्रयोगशाळा

सुभाष अवचट | 18 Nov 2021

व्यक्त होण्याची उर्मी ही चित्रकलेची प्रेरणा असते. हजारो वर्षांपासून माणूस स्वत:च्या मनातील विचारांना मूर्त रूप देण्यासाठी चित्रांचा आधार घेत आला आहे. स्वत:चा शोध घेण्याची प्रक्रिया न संपणारी असल्याने चित्रकार सतत नव्याचा शोध घेण्याची धडपड करत असतात. अनेक चित्रकारांना सेल्फ पोर्ट्रेट करून नव्या वाटा सापडल्या आहेत.

अगाथा अँड हर ‘लिटर ग्रे सेल्स’

राजेश्वरी देशपांडे | 18 Nov 2021

अगाथा ख्रिस्ती. रहस्यकथांची अनभिषिक्त महाराज्ञी अशी तिची जगभरातील ओळख. तिच्या लेखन कारकिर्दीची शताब्दी साजरी होत असताना तिच्या वाङ्मयाचे काहीसे निराळे आकलन करणारा हा लेख.

बहिणाई माझी लाडाची, लाडाची..

अनिल अवचट | 18 Nov 2021

तरल संवेदनशीलता, निसर्गाशी एकतानता आणि असामान्य कल्पनाशक्ती लाभलेल्या कवयित्री बहिणीबाई चौधरींची गाणी गेली सत्तर वर्षं भल्याभल्यांना भुरळ घालत आली आहेत. बहिणाई एवढी लाडाची का आहे, सांगताहेत अनिल अवचट.

कोरोना कल्लोळाचे १७० दिवस

मुकुंद कुलकर्णी | 18 Nov 2021

निळं आकाश, सळसळणारा पिंपळ, खिडकीतून झेपावणारा गच्च लाल फुलांचा ट्युलिप आणि ‘हसीन’ नजाकतीत जुनी पानं झटकणारा बदाम, त्यावर फुदकणारे पक्षी आणि माझी घार रोज बघतो आणि वाटतं, ‘जिंदगी कितनी खुबसूरत है, आईये आप की जरूरत हैं।’
Install on your iPad : tap and then add to homescreen