वयम्

शालेय वयोगटातील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, त्यांना दर्जेदार साहित्य वाचायला मिळावे, यासाठी ‘वयम्’ हे मासिक जून, २०१३ पासून प्रसिद्ध होत आहे. ‘वयम्’चे बोधवाक्य आहे- ‘वाचनातून विचार, विचारातून विकास’. ठाण्याच्या लॅबइंडिया कंपनीचे अध्यक्ष श्रीकांत बापट हे ‘वयम्’चे प्रकाशक आहेत. त्यांच्या आर्थिक पाठबळातून ‘वयम्’ सुरू झाले आहे.

 

‘वयम्’ च्या सल्लागार मंडळात आहेत- डॉ. अनिल काकोडकर, कुमार केतकर, डॉ. आनंद नाडकर्णी, अच्युत गोडबोले, डॉ. उदय निरगुडकर, राजीव तांबे, श्रीकांत वाड. ‘वयम्’च्या मुख्य संपादक शुभदा चौकर आहेत. ज्येष्ठ सुलेखनकार अच्युत पालव आणि नामवंत चित्रकार निलेश जाधव ‘वयम्’चे कलात्मक बाजू सांभाळतात.

बहुविध चे सभासदत्व* घ्या.

वयम्

छत्रीछप्पर मुर्दाबाद!

अनंत काणेकर | 30 Jun 2022

छत्री घेण्याचा उद्देश पावसाळ्यात स्वत:चा पाण्यापासून बचाव करणं हा आहे असं पुष्कळांना वाटतं, पण ती केवळ स्वत:ची फसवणूक आहे. छत्रीशिवाय आपण पावसात जितके भिजतो तितकेच, किंबहुना बरेच वेळा थोडे अधिकच छत्री असताना भिजतो. त्याशिवाय ती हरवली, मोडली, उडाली किंवा उलटी झाली म्हणजे नाना प्रकारचा मनस्ताप होतो तो वेगळाच.

न दिसणारं आणि न फुलणारं फूल

मकरंद जोशी | 24 Jun 2022

उंबराचं फूल दिसत नाही, कारण त्याचं फळ हेच फुलाची भूमिकाही बजावतं. त्यामुळे आता व्हॉट्सअॅपवर कोणी दुर्मीळ उंबराचं फूल (!) म्हणून फॉरवर्ड पाठवला तर लगेच डिलीट करा आणि कुणी विचारलं की उंबराचं फूल पाहिलंय का, तर बिनधास्त ‘हो’ म्हणून सांगा.

अत्यंत बुद्धीमान

मेघना जोशी | 13 Jun 2022

हळूहळू काय झालं माहीत नाही, प्राण्यांच्या आई-बाबांना वाटायला लागलं की, माझं पिल्लूच सर्वांमध्ये सर्व बाबतीत पुढे असलं पाहिजे. त्याच्यापुढे कोणीही जाता कामा नये. म्हणून त्या आई-बाबांचीच चढाओढ लागली.”

छोटी छोटी ध्येय

डॉ. शुभांगी दातार | 10 Jun 2022

ध्येये ठरवली की त्यामध्ये नियोजन, शिस्त, सातत्य, सराव, समाधान, आत्मविश्वास अशा अनेक गोष्टी शिकता येतात. यश आल तर समाधान मिळत. अपयश आलं की दुसरा मार्ग शोधता येतो.

मानवनिर्मित जंगल

मेधा आलकरी | 06 Jun 2022

जंगलकन्या डॉ. कीर्ती कारंथ- मध्यंतरी एका जंगलकन्येची बातमी वाचली. तिचं नाव आहे डॉ. कीर्ती कारंथ. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ने २०१५ या वर्षातील “जग बदलू पाहणाऱ्या” १५ महिलांची नावं जाहीर केली. त्यात हे भारतीय नाव आहे, याचा मला खूप अभिमान वाटला. गेली २५ वर्ष कीर्ती, गळ्यात दुर्बिण आणि कॅमेरा लटकवून जंगल भटकते, नोंदी घेते, निष्कर्ष काढते. अभ्यासातून, वन्य प्राण्यांचं आणि माणसांचं हित कसं जपावं याचा समतोल साधण्याच तंत्र तिला जमलय. म्हणून हा पुरस्कार. तिच्या ह्या शास्त्रशुद्ध नोंदीच्या आधारे पर्यावरण संवर्धनाच्या योजना राबवल्या जातात.

जरा थांबा! दुर्बीण ‘तयारी’करत आहे...

श्रीराम शिधये | 30 May 2022

‘नासा’ने ‘एल२’पाशी एक शोधक यान या शतकाच्या सुरुवातीलाच पाठवलं होतं. पण त्या सर्वांपेक्षा आता पाठविण्यात आलेली दुर्बीण महत्त्वाची आहे. याचं कारण ती महास्फोट झाल्यानंतरच्या काळातल्या घडामोडी ‘पाहू’ शकणार आहे.

निसर्ग नवल- मरणात यांच्या जग सजते...

मकरंद जोशी | 13 May 2022

रेशमाच्या पतंगांपासून रेशीम मिळवायचे तर त्यासाठी कोष गरम पाण्यात टाकावे लागतात, त्यानंतरच हा धागा सुटा होतो. यामध्ये त्या कोषातील पतंगाची अळी मरण पावते. जेव्हा रेशमाची मागणी वाढली आणि त्यातील आर्थिक फायदा लक्षात आला, त्यानंतर मग रेशमाचे धागे बनवणाऱ्या अळ्यांची ‘लागवड’ करायला सुरुवात झाली. आता जगभरात वेगवेगळ्या जातीच्या पतंगांच्या अळ्या वाढवून त्यांच्यापासून रेशीम मिळवले जाते.

मिशन एक्स

सुरेश वांदिले | 09 May 2022

“याचा अर्थ, करोना विषाणूला हरवण्याचं जैवशास्त्रीय तंत्र त्यांनी अवगत केलं. याचा दुसरा अर्थ, हा करोना विषाणू कितीही रूपांतरं करू लागला तरी प्रा. सारा या जैवशास्त्रीय तंत्राचा वापर करून आणखी प्रभावी लस शोधू शकतात,” तेजोमयी म्हणाली.

महामानव

मंजिरी हसबनीस | 12 Apr 2022

भगवान महावीरांनी सदैव अहिंसेचा प्रचार केला आणि तरीही ते महावीर कसे ? तर सदैव ते स्वतःमधील मोहाशी लढले. इंद्रियांवर विजय प्राप्त करून ते जिन (जिंकणारे) झाले आणि त्यांनी जो धर्म स्थापन केला, तो जिनांचा धर्म म्हणून जैन होय.

वेगळेपणाचे गुपित!

विद्याधीश केळकर | 08 Apr 2022

ही सगळी माहिती आपल्याला समजली कशी? माणसाच्या पेशीच्या आत असणाऱ्या छोट्याशा DNAबद्दल आपल्याला इतक्या सगळ्या गोष्टी कशा काय माहिती झाल्या? याला कारण आहे, १९९० साली जगभरातल्या संशोधकांनी एकत्र येऊन सुरू केलेला Human Genome Project (ह्युमन जीनोम प्रोजेक्ट!) या प्रोजेक्टचा उद्देश होता, मानवी शरीरातील प्रत्येक अन् प्रत्येक जीनचा अभ्यास करणं, प्रत्येक जीनचं कार्य शोधून काढणं आणि मानवी DNA चा संपूर्ण Sequence म्हणजेच Nucleotidesची मांडणी शोधून काढणं. जवळपास १३ वर्षं हा अभ्यास चालू होता.

सहजशोध- आइसक्रीमचा कोन

सोनाली कोलारकर-सोनार | 04 Apr 2022

आइसक्रीम विक्रेत्याचे नाव कोणी आर्नोल्ड सांगत तर कोणी अल्बर्ट ! आणि वॅफल विकणाऱ्याचे अर्नेस्ट ! तर या दोघांनी काय केलं की जेव्हा आइसक्रीमच्या पेपर प्लेट्स संपल्या तेव्हा त्याला वॅफल गुंडाळले आणि त्याच्या कोनावर ठेवून दिला आइसक्रीममचा गोळा ! खाणार्यांना इतकी मजा आली ! आइसक्रीम वितळू लागले की, ते या कुरकुरीत वॅफल कोनासोबत खाता येत होते आणि फारच चविष्ट लागत होते.

‘दिव्य’दृष्टी दुर्बीण

श्रीराम शिधये | 29 Mar 2022

ही दुर्बीण तयार करण्यासाठी एकंदर १० अब्ज अमेरिकी डॉलर खर्च झाले. त्यातला सगळ्यात मोठा वाटा हा अमेरिकेचा. पण युरोपीय स्पेस एजन्सी आणि कॅनेडियन स्पेस एजन्सी यांनीही हातभार लावला आहे. ही दुर्बीण एरिना नावाच्या रॉकेटमधून अवकाशात पाठवण्यात आली. आपल्या सूर्याच्या विरुद्ध दिशेला आणि पृथ्वीपासून १५ लाख किमी अंतरावर ठरलेल्या ठिकाणी (म्हणजेच L2 Lagrange Point या ठिकाणी) ती ३० दिवसांचा प्रवास करून जाणार आहे.

का? का? का?

डॉ. बाळ फोंडके | 17 Mar 2022

सूर्यप्रकाशात सात निरनिराळ्या रंगांचा प्रकाश असतो. त्यातल्या जांभळ्या किंवा निळ्या रंगाच्या प्रकाशात जास्त उष्णता असते. साहजिकच जास्त ऊर्जा असलेले किरण जास्त प्रमाणात विखुरले जातात. त्यामुळे आकाश नीळं दिसतं. पण इतर रंगांचे किरणही विखुरले जात असतात, फक्त त्याचं प्रमाण कमी असतं. ज्या वेळी सूर्य आपल्या डोक्यावर असतो तेव्हा त्याला वातावरणातून धरतीपर्यंतचा प्रवास करताना कमी अंतर पार करावं लागतं. त्यामुळे निळ्या रंगांचे किरणच जास्त विखुरलेले दिसतात, पण सूर्यास्ताच्या किंव्हा सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरणांना वातावरणातून आधिक अंतर पार करावं लागतं. साहजिकच ते अंतर पार करेपर्यंत निळ्या रंगांचे किरण विखरून गलेले असतात. लाल किंवा शेंदरी रंगांच्या किरणांच विखुरणंच जास्त दिसतं. आकाश त्याच रंगांनी न्हाहून निघतं.

शिक्षणाचा नवा फंडा, कधीतरी घालतो गंडा

वसुंधरा देवधर | 14 Mar 2022

स्मार्ट पद्धतीने शिकणाऱ्या स्मार्ट मुलांनी अशा फसवेगिरीला बळी पडू नये, म्हणून या टिप्स. हे माध्यम वापरताना अज्ञानाने किंवा अनवधानाने फशी पडू नका.

तिसऱ्या लुगड्याची गोष्ट : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले

शुभदा चौकर | 10 Mar 2022

मुलींच्या शिक्षणासाठी सारे अवमान सहन करीत भिडे वाड्यात मुलींची शाळा काढणारी ही क्रांतिज्योती म्हणजे स्त्रीच्या अस्मितेचा प्रथमोद्गार आहे. त्यांना विसर कधीच पडू नये.

त्या होत्या म्हणून...

शुभदा चौकर | 07 Mar 2022

या कोर्नेलीया सोराबजी जेव्हा बॉम्बे युनिव्हर्सिटीत प्रवेश घ्यायला गेल्या तेव्हा विद्यापीठाच्या कागदपत्रांत सर्वत्र फक्त He असे सर्वनाम होते. त्यात He/She असा बदल करावा लागला होता. मुंबई युनिव्हर्सिटीत पहिल्या आलेल्या या मुलीला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने स्कॉलरशिप द्यायला नकार दिला होता, कारण मुलींना स्कॉलरशिप देण्याची पद्धतच नव्हती. तरी या जिद्दी मुलीला तिच्या आई-वडिलांनी पैसे जमा करून ऑक्सफर्डला शिकायला पाठवले आणि ती तिथेही पहिली आली.

निसर्ग नवल- रंग माझा (का ?) वेगळा...

मकरंद जोशी | 04 Mar 2022

सध्या भारतातील वेगवेगळ्या प्राणिसंग्रहालयांमध्ये जितके पांढरे वाघ आहेत त्यांचा हा ‘मोहन’ पूर्वज आहे. पांढऱ्या नर वाघाची जोडी पांढऱ्याच वाघिणीबरोबर जमली तर त्यांची सगळी पिल्ले मात्र काळी-पिवळी म्हणजे ‘नॉर्मल’ रंगाची होतात. पण पांढऱ्या वाघाचा जोडीदार काळा-पिवळा वाघ असेल तर मात्र होणाऱ्या पिल्लांमध्ये काळे-पांढरे पिल्लू नक्की जन्माला येते.

महत्त्व विज्ञानदिनाचं!

श्रीराम शिधये | 27 Feb 2022

रामन परिणामाचा उपयोग रासायनिक रेणूंची रचना समजण्यासाठी होतो. त्यामुळेच रामन यांच्या शोधानंतरच्या दहाच वर्षांत दोन हजारपेक्षा जास्त संयुगांची रचना निश्चित करण्यात आली. २०१३ साली तर अमेरिकन केमिकल सोसायटीने रामन परिणामचा समावेश ‘इंटरनॅशनल हिस्टॉरिक केमिकल लँडमार्क’मध्ये केला! रामन यांच्या संशोधनाचं महत्त्व असं अनन्यसाधारण आहे.

भाषाप्रभू कुसुमाग्रज

प्रवीण दवणे | 23 Feb 2022

मातृभाषेतून अध्ययन व्हावे हा कुसुमाग्रजांचा आग्रह होता. आज मराठी भाषा व शिक्षणातील मराठी माध्यम यांची पराकोटीची पिछेहाट होत आहे. तो वि.वा.शिरवाडकर यांच्या चिंतेचा विषय होता. इंग्रजी भाषा व या भाषेची महती ते जाणून होते, परंतु मातृभाषेला दूर लोटून इंग्रजीची आराधना करणे हे भविष्यातील अनेक प्रश्नांना निमंत्रण देणारे आहे, हे वि.वा.शिरवाडकरांनी अनेकदा सांगितले आहे. ते म्हणतात- ‘मराठीवरील संकट हे तिच्या शब्दकोशावरील वा साहित्यावरील संकट नाही. ते महाराष्ट्राच्या अस्मितेवरील, मराठीपणावरील आणि येथील एकमेकांच्या भवितव्यावरील संकट आहे. समाजाची प्रगती वा क्रांती स्वभाषेच्या किनाऱ्यावरच पेरता येते.’

‘माझे किशोरवय’- डॉ. अनिकेत सुळे

अंजली कुलकर्णी- शेवडे | 14 Feb 2022

कुठल्याही प्रश्नाचं उत्तर शोधताना ‘आपल्याला उत्तर आलं पाहिजे’ हा त्याचा हट्ट असतो आणि ‘उत्तर असंच का आलं’ हे शोधून काढणं हा माझा अट्टहास असतो! किशोरवयात लाभलेले शाळेतले आणि सराव-वर्गातले शिक्षक, खगोल मंडळ, पुस्तकं आणि अर्थातच आई-बाबांचं मार्गदर्शन या सगळ्यामुळे माझ्या पुढच्या कारकिर्दीचा भक्कम पाया रचला गेला, असं नक्कीच म्हणता येईल!

फेब्रुवारीच लहान का?

मेघश्री दळवी | 10 Feb 2022

मात्र नक्की गडबड कशाने होते आहे, हे ज्युलियस सीझर या सम्राटाच्या बरोब्बर लक्षात आलं. एकीकडे चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या भ्रमणावरून वर्ष, तर दुसरीकडे पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे ऋतू. मग दोघांचा ताळमेळ कसा राहणार? तेव्हा त्याने चांद्र वर्ष सोडून फक्त सौर वर्षाचा आधार घ्यायचं ठरवलं. त्यातूनच तयार झालं ज्युलियन कॅलेंडर, इ. स. पूर्व 46मध्ये. अर्थात नुसतं केलं नि झालं एवढं सोपं नव्हतं ते. त्यातल्या प्रत्येक महिन्यात 30 की 31 दिवस बसवायचे याचा भरपूर काथ्याकूट झाला. त्यातच फेब्रुवारीला पुन्हा एकदा 28 दिवस मिळाले. आता तेवीसचे अठ्ठावीस झालेले बरं मानायचं, की अजूनही आपण पिटुकलेच हे बघायचं, यात तो फेब्रुवारी चक्रावून गेला असेल!

हिम आणि हुडहुडी

मंजिरी हसबनीस | 07 Feb 2022

राक्षस मानवी शक्तीला मनोमन शरण गेला आणि त्याने तिथून पळ काढला. पीटर झोपडीतून सहीसलामत बाहेर पडला. सर्व गावकऱ्यांनी त्याचं लगेच कौतुक केलं. या आपल्या लढ्याचं स्मरण म्हणून पीटर दर थंडीत हिममानवाची ही प्रतिकृती तयार करत असे. गावकरीही तसे करू लागले. आणि मग गावागावातून गल्लीबोळात हिममानव– स्नो-मॅन बनवले जाऊ लागले. असा झाला या स्नो-मॅनचा जन्म!

दुधाचा फुगा

राजीव तांबे | 01 Feb 2022

“दुधात पाणी, प्रथिनं आणि स्निग्ध पदार्थ याचं मिश्रण असतं. दूध गरम होऊ लागलं की, त्यातले स्निग्ध पदार्थ दुधाच्या पृष्ठभागावर येऊन तरंगू लागतात. मग त्याचा एक पापुद्रा तयार होतो...”

आरशाची गोष्ट

विद्या डेंगळे | 22 Jan 2022

घरी गेल्यावर माझ्या कानावर पडलं की, माझ्यामुळे तिला त्या कुत्र्याचे पैसे द्यावे लागले. मी खजील झालो आणि माझ्या आरशातल्या मित्राला भेटायला गेलो. तो होता तिथे आरशात. मी जीभ बाहेर काढली. मान वळवली आणि त्यानेही ते सर्व केलं.माझा मित्र तिथे होता हे पाहून मला आनंद झाला, पण थोडाच वेळ

कालमापन

मंजिरी हसबनीस | 19 Jan 2022

आश्चर्य म्हणजे अमेरिकेच्या अनेक भागांत ग्रेगोरिअन कॅलेंडरपेक्षा भारतात प्रचलित असलेली चांद्र कालगणनापद्धती अधिक स्वीकारार्ह मानतात. खासकरून तिथल्या पारंपरिक पद्धतीने शेती करणारे शेतकरी हीच चांद्र कालगणना पद्धती वापरतात.
Install on your iPad : tap and then add to homescreen