मेंदूतील सवय

कळतं पण वळत नाही ही म्हण तुम्हाला माहीत असेलच आणि तुमचा तो रोजचा अनुभवही असेल. आजच्या माहितीच्या युगात आपल्याला माहिती खूप असते पण त्या माहितीचा रोजच्या जीवनात उपयोग होतोच असे दिसत नाही. रोज व्यायाम आवश्यक आहे हे आपल्याला पटलेले असते पण तो होत नाही. राग अनावर होता नये याची जाणीव असते पण तरीही तो अनावर होतोच. नखे खायची नाहीत असे मनोमन ठरवलेले असते पण नकळत बोटे तोंडात जातातच. हे सर्व सवयीने घडते. आपला स्वभाव हीदेखील मनाची प्रतिक्रिया करण्याची सवयच असते. चहा,तंबाखू,इंटरनेट ही व्यसने म्हणजे देखील सवयच असते. आपली विचार करण्याच्या पद्धतीची ही एक सवय होऊन जाते,त्यामुळेच मनाची लवचिकता कमी होते,आपण सवयीने एक चाकोरीबद्ध आयुष्य जगत राहतो. ही सवय लागते म्हणजे नक्की काय होते हे कोडे मेन्दूतज्ञांना देखील पडते आणि त्याचे उत्तर ते शोधत आहेत. 

आधुनिक तंत्रज्ञान वापरून मेंदूचे गूढ उकलले जात आहे,त्यामुळे अनेक जुन्या प्रश्नांची नवीन ,शास्त्रीय उत्तरे मिळत आहेत. सवयी आणि अंतर्मन यांचा काही संबंध आहे का हा असाच एक प्रश्न. ज्ञानेश्वरानी जाणीव आणि नेणिव असे शब्द वापरले होते. ही नेणिव म्हणजे फ्रॉइडने सांगितलेले अनकॉन्शस माईंड. हे अनकोशन्स, म्हणजेच जाणिवेच्या कक्षेत नसलेले मन म्हणजे काय, यावर मेंदूतील कार्ये समजून घेताना प्रकाश पडू लागला आहे. या विषयावर खूप संशोधन होते आहे, ते इंटरनेटवर आणि पुस्तकांतून जगासमोर येत आहे. पण ती माहिती बऱ्याच वेळा शास्त्रीय भाषेत आणि समजायला थोडीशी अवघड असते. आता ही अडचण दूर होणार आहे. तुम्हाला ती माहिती मराठीत आणि सोप्या भाषेत वाचायला मिळणार आहे. या माहितीचा उपयोग रोजच्या जीवनात होण्यासाठी काही सोप्या टीप्सही येथे दिल्या जातील. स्वप्नांचा आणि अंतर्मनाचा काही संबंध आहे का, भीतीदायक स्वप्नांचा ससेमिरा कसा दूर करायचा, आपल्याला अचानक अकारण उदास वाटू लागते ते का, एकाचा राग दुसऱ्यावर का काढला जातो अशा अनेक प्रश्नांची चर्चा काही उदाहरणे घेऊन येथे केली जाईल. सवयी बदलण्यासाठी काय करायचे, सजगतेचे म्हणजे माईंडफूलनेसचे आणि सवयीचे काय नाते आहे याची मेन्दू संशोधनाने मिळणारी उत्तरे येथे मिळतील. 

बहुविध चे सभासदत्व* घ्या.

मेंदूतील सवय

Install on your iPad : tap and then add to homescreen