निवडक सोशल मिडीया

आपल्या whatsapp वर अनेकदा अतिशय सुंदर सुंदर मेसेजेस fwd होऊन येतात.ते इतके छान असतात की त्याच्या निर्मात्याला आपण मनातल्या मनात सलाम ठोकतो. हल्ली तरी त्या मजकुराचे आईबाप कोण आहेत हे खाली लिहिलेलं असतं. पूर्वी तर बिचारे ते पोरकेच या मोबाईलवरून त्या मोबाईलवर फिरायचे. पण त्यात एक इश्यू होता. नंतर कधी आठवल्यावर ते पुन्हा वाचायला जावे तर मिळत नसत. आणि शिवाय सगळेच चांगले मेसेजेस आपल्याला fwd होऊन येतील याची काय शाश्वती? म्हणूनच बहुविध डॉट कॉम ने अशा सगळ्या मास्टर पिसेस चा एक अल्बम बनवला आहे. सोशल मिडीयावरील या सगळ्या 'अर्कांचा' अर्क. या ब्लॉग मध्ये तुम्हाला असे सगळे लेख एकत्र वाचायला मिळतील. शिवाय ते इथूनच तुम्ही शेअरही करू शकाल. त्यावर कमेंटही करू शकाल. आणि ती थेट त्या लेखकाला मिळेल बरं का.. कारण आम्ही त्या लेखकालाच त्या लेखाचे पालकत्व देणार आहोत. त्यामुळे तुम्ही थेट त्यांच्याशी संवाद साधू शकाल.

आपल्यालाही असा चांगला लेख कुठे मिळाला तर ९१५२२५५२३५ या क्रमांकावर fwd करा. निवडक लेखांना इथे प्रसिद्धी दिली जाईल. मात्र त्यात लेखकाचे नाव हवे. नसेल तर ते शोधल्याशिवाय आपल्याला तो इथे टाकता येणार नाही. हे सगळे लेख निःशुल्क आहेत. आपण फक्त नोंदणी करायची आहे. म्हणजे आपल्याला पुढील लेखांची नोटिफिकेशन येत राहतील आणि आलेला लेख कळेल.

बहुविध चे सभासदत्व* घ्या.

निवडक सोशल मिडीया

एकाच नाण्याच्या दोन बाजू

प्राजक्ता काणेगावकर | 13 Sep 2021

काळ्याभोर केसांचं कौतुक आपल्याला असतंच पण किंचित रुपेरी कड आल्याशिवाय वर्गात बोलायला आपल्यालाही आत्मविश्वास येत नसावा.

भाद्रपदात उमललेली प्रेमकथा - ६

रोहन नामजोशी | 12 Sep 2021

चॉकलेट सँडविच पलीकडच्या आयुष्यातले अनेक प्रश्न या गणेशोत्सवाने दोघांसमोर मांडले होते. त्याची उत्तरं दोघांना शोधायची होती.

शिशुसाहित्य आणि शिक्षण

राजीव तांबे | 06 Sep 2021

शिशू गटातील पहिल्या गटासाठी म्हणजे शून्य ते साडेतीन वर्षांच्या मुलांसाठी दोन प्रकारची पुस्तके अभिप्रेत आहेत. एक wordless Books. आणि दुसरी प्रत्येक पानावर सुमारे 95% चित्र आणि केवळ 5% मजकूर असणारी पुस्तकं.

द चेकलिस्ट मॅनिफेस्टो - अतुल गवांदे

सायली राजाध्यक्ष | 29 Aug 2021

ब-याचदा साह्य करणा-या इतरांना, रूग्णाच्या परिस्थितीच्या गांभीर्याची किंवा त्यांच्यापुढे उभ्या राहू शकणा-या समस्यांची अजिबात कल्पना नसते.

बोलीभाषांचा भाषाशास्त्राच्या दृष्टीने अभ्यास

राजेश कुलकर्णी | 17 Aug 2021

प्रत्यक्षात या बोलीभाषा आधीच अस्तित्वात असतात. त्यातलीच एक बोली विविध कारणांनी वरचढ होते व प्रमाणभाषा बनते.

अनुबंध: धर्म आणि संस्कृतींचे - परीक्षण

माधवी कुलकर्णी | 10 Aug 2021

भारताइतका बहुविध संस्कृती, परंपरा, धर्म, भाषा, जाती असलेला आणि तरीही लोकशाही टिकवून असलेला प्रचंड देश दुसरा नाहीच.
Install on your iPad : tap and then add to homescreen