व्यक्त होणे-एक गरज – राधिका वेलणकर -नातू

‘व्यक्त होणे’ किंवा ‘व्यक्त करणे’ हा वाक्प्रचार आपण सर्रास वाचतो,बोलण्यात वापरतो.काल अशाच एका मुलाखतीमध्ये हा शब्द ऐकला आणि का कोण जाणे मनाच्या कुठल्याशा कोप-यात तो दडून बसला. उगाचच घोळत राहिले त्या शब्दाभोवती आणि अचानक जाणवलं किती महत्त्वाचा शब्द आहे आपल्या आयुष्यातील!! प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या माध्यमातून व्यक्त होत असतो. कुणी कविता करतं.कुणी मनातलं गुज झरझर कागदावर उतरवतं, कुणी रंग-ब्रशच्या मदतीने मनाचं चित्र उभं करतं तर कुणी हातातील कौशल्याच्या जोरावर शिल्पकला, विणकाम करतं, कुणी गाणं म्हणतं तर कुणी बेभान होऊन नाचतं.कुणी आपल्या भावनांना संगीतातून वाट करून देतो तर कुणी छानसा पदार्थ बनवण्यात आपला मन रमवतं.प्रत्येकाच्या व्यक्त होण्याच्या किती त्या नाना तह्रा…..

माझ्या मते व्यक्त होते ती ‘व्यक्ती’ अशी साधी आणि सोपी व्याख्या आहे.माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा आणि आजच्या काळातल्या मोबाईल आणि वाय-फाय सोबतच express करणे ही प्राथमिक गरज आहे. प्रत्येकाची express करायची जागा वेगवेगळी असते.मनाच्या जवळची व्यक्ती असते.मग ते मित्र-मैत्रीण,आई-बाबा, नवरा-बायको,कोणीही असो. आणि हल्ली तर सोशल मीडियावर हे व्यक्त होण्याचं प्रमाण फारच वाढलंय.फेसबुक तर बिचारा ओपन केल्यावर आधी विचारतो ‘What’s in your mind?’ किंवा ‘Write something about yourself.’आपल्या मनातील भावनांचा निचरा होण्यासाठी हे खुप आवश्यक आहे.प्रत्येक वेळेला त्यासाठी शब्दांची गरज असतेच असे नाही.एखाद्या वेळी काहीही न बोलता फक्त अश्रूंचा बांध फुटला तरी मोकळा झाल्यासारखं वाटतं…रिलॅक्स वाटतं.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘अंतरंग’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘अंतरंग’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 2 Comments

  1. anaghav0871@gmail.com

    खुपच छान. व्यक्त होणं हे गरजेचच आहे. मन मोकळं होण महत्वाचं

  2. Rajashri1970

    खुप छान , लेख आवडला .आनंदी जीवनासाठी दिलेली गुरु किल्ली खरोखरच चांगली आहे .(व्यक्त होणे )

Leave a Reply