शब्दमल्हार

वाचन संस्कृती क्षीण होत चालली, अशी ओरड सर्वत्र होत असताना असे वाटले की, वाचन हे आपले सामर्थ्य आहे आणि तेच आपण गमावून बसलो तर काय होणार? जे व्हायला नको तेच होणार. मग काय करायला हवे, तर वाचनासाठी, वाचकांसाठी चांगले नियतकालिक काढायला हवे. चांगल्या वाचकांचा शोध घेण्याबरोबरच त्यांच्याकडून लिहून घेतले पाहिजेे. जे अभ्यासपूर्ण लिहिताहेत त्यांच्यापर्यंत पोहोचून ते छापले पाहिजेे आणि समृद्ध वाचक, व्यासंगी वाचक तयार करण्यासाठी आपणच प्रयत्न करायला हवेत. नकारात्मक ओरडणार्‍यांच्या आवाजात आवाज मिळवण्यापेक्षा त्यांची ओरड कमी होईल, असे आपण काय करू शकतो या विचारातूनच ‘शब्दमल्हार’ प्रकाशनाच्यावतीने ‘शब्दमल्हार’ हे मासिक सुरू झाले. ‘आपल्या सामर्थ्यासह, आपल्या कल्याणासाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन फेब्रुवारी 2018 मध्ये ‘शब्दमल्हार’ हे मासिक मराठीतील ज्येष्ठ लेखिका डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते प्रकाशित झाले. त्यावेळी ख्यातकीर्त दिग्दर्शक राजदत्त, लेखिका वीणा देव, गायिका अनुराधा मराठे आणि अभिनेते डॉ.गिरीश ओक यांची विशेष उपस्थिती होती. त्यानंतर ‘शब्दमल्हार’ने वेगवेगळ्या उपक्रमांतून मासिक सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न चालवला आहे. साहित्याबरोबरच इतर सर्व कलांना बरोबर घेत त्यावरचे विचारमंथन आणि चिंतन वैविध्यपूर्ण लेखांद्वारा आजवर ‘शब्दमल्हार’मध्ये प्रकाशित झाले आहे. सर्व कलांचा आंतरसंबध शोधण्याचा आणि ती वीण घट्ट करण्याचा प्रयत्न या मासिकाद्वारे चालविला जातो.

शब्दमल्हार नियतकालिकातील लेखसंग्रह..

इतकेच लेख उपलब्ध आहेत..

पुढील लेख मिळवताना अनपेक्षित अडचण येत आहे. कृपया नंतर प्रयत्न करा..